दिवाळीमुळे हळदीला उठाव

पुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे. फराळ आणि प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल्स, रेस्टारेंट्समधूनही उठाव मिळत आहे. त्यामुळे देशभरातील बाजारात हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. पुढील काळात हळदीच्या दरात जास्त तेजी-मंदीची शक्यता नाही, असे जाणकारांनी सांगितले.

दिवाळीमुळे सुकामेवा आणि मसाल्यांना मागणी वाढली आहे. तसेच हळदीला उठाव राहिल्याने आवकही झाली. देशातील महत्त्वाच्या हळद बाजारांत सोमवारपासून हळदीच्या दरात काहीशी सुधारणा झाली. राज्यातील काही बाजार समित्या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बंद होत्या. मात्र नांदेड आणि वसमत बाजार समित्यांत हळदीच्या दरात ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढ झाली होती. ई-रोड बाजार समितीत हळदीची आवक ३ हजार ८०० पोत्यांची आवक होती. निजामाबाद बाजारात एक बजार पोत्यांची आवक होऊन दरात काहीशी सुधारणा नोंदली गेली. 

बाजारातील सूत्रांच्या मते देशातील महत्त्वाच्या हळद खरेदी केंद्रांवर माल भरपूर आहे तसेच निजामाबाद पट्ट्यात डिसेंबरपासून नवीन हळदीची आवक होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे बाजार समित्यांत हळदीच्या दरात जास्त तेजी-मंदीची शक्यता कमीच आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या पावसाने महाराष्ट्रातील पिकाला मोठा फटका बसला. तसेच हळद उत्पादक पट्ट्यात अनेक ठिकाणी सततचा पाऊस, मूळकूज आणि कीड-रोगाने उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. सूत्रांच्या मते देशात यंदा हळद उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे.

…असे आहेत दर
बाजार समित्यांत हळदीची आवक ही गेल्याकाही दिवासांत वाढली. मात्र मागणी चांगली राहिल्याने दरात सुधारणा होऊन ४५०० ते ८६९९ रुपयांपर्यंत प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला. महाराष्ट्रात सरासरी दर ५५०० ते ८५०० रुपयांदरम्यान मिळाला. तर तमिळनाडूत हळदीला ६००० ते ८६९९ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

प्रतिक्रिया…
देशातील विविध भागांत हळद पिकाला पावसाचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. यंदा देशातील हळद उत्पादनात १० ते १२ टकक्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे. सध्या दिवाळीमुळे दरात २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पुढील काळात दर पुन्हा स्थिर राहतील, अशी शक्यता आहे.
– शुभम झावर, हळद व्यापारी आणि उद्योजक, निजामाबाद, तेलंगणा

News Item ID: 
820-news_story-1635912850-awsecm-707
Mobile Device Headline: 
दिवाळीमुळे हळदीला उठाव
Appearance Status Tags: 
Tajya News
turmeric powder_1.jpgturmeric powder_1.jpg
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Rise in turmeric demand for Diwali
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
दिवाळी हळद पुणे नांदेड nanded वसमत बाजार समिती agriculture market committee महाराष्ट्र maharashtra ऊस व्यापार तेलंगणा
Search Functional Tags: 
दिवाळी, हळद, पुणे, नांदेड, Nanded, वसमत, बाजार समिती, agriculture Market Committee, महाराष्ट्र, Maharashtra, ऊस, व्यापार, तेलंगणा
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rise in turmeric demand for Diwali
Meta Description: 
Rise in turmeric demand for Diwali
दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे. फराळ आणि प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल्स, रेस्टारेंट्समधूनही उठाव मिळत आहे. त्यामुळे देशभरातील बाजारात हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X