Take a fresh look at your lifestyle.

दिवाळी प्रकाशाचा सण, मग आम्ही अंधारात कसे राहणार?

0

आरेगाव, जि. यवतमाळ : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात मग आम्ही शेतकऱ्यानं हा आनंद का साजरा करू नये? नैसर्गिक संकट तर येत-जात राहतात. त्याशिवाय आमचं जगणंच नाही. म्हणून येणारे सणसोहळे साजरे करूच नये का, असा सवाल भोजला (ता. पुसद) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय दिनकर राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे यंदा सोयाबीन गमावल्यानंतरही दिवाळी कुटुंबाला आनंद देण्यासाठी पूर्वीच्या उत्साहात साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यवतमाळची ओळख शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून असली, तरी येथील शेतकरी पीक उत्पादकता वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग करत असतात. नैसर्गिक प्रकोपांना सातत्याने या जिल्ह्यास सामोरे जावे लागते, 

 कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, मध्येच रोग-किडींचा हल्ला आदी कारणांनी शेतकऱ्यांसमोरील आव्हान कायम असते. यंदाही शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकटांनी पिच्छा पुरविला आहे. पुसद तालुक्यातील भोजला शिवारात संततधार पावसामुळे सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले. उत्पादकता आणि उत्पन्नही प्रभावित झाले. मात्र त्यानंतरही गावातील शेतकऱ्यांनी दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. संकट तर आमच्या जीवनाचा भागच झाला आहे. म्हणून का जगणं अन्‌ त्यातील आनंद सोडायचा, अशी प्रतिक्रिया गावातील बहुतांशी शेतकऱ्यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली. 

गावातील श्री. राऊत हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी अशा चौघांचा समावेश आहे. तीन एकर कोरडवाहू शेती असलेले संजय राऊत हे दगड, मातीच्या घरात राहतात. घराला डागडुगीची गरज आहे. परंतु शेतीच्या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणाची तजवीज आणि दैनंदिन गरजा भागवाव्या लागत असल्याने घराच्या दुरुस्तीसाठी पैसा त्यांना यंदा जोडता आला नाही. हंगामात नुकसान झाले की मायबाय सरकार भल्या मोठ्या मदतीचा आव आणते अन् हाती थोडेफार पैसे पडतात. हे तर आमच्यासाठी असं ठरत की राजा उदार झाला अन् हाती भोपया देला. असं दर हंगामातच होत पण यंदा तर राजा आमच्या जिल्ह्यासाठी उदारही झाला नाई.

जून ते ऑगस्ट मईन्यात पावसानं खंड दिला नाही म्हणून २५ टक्के मिळणाऱ्या विमा भरपाईतून आमचा जिल्हा वगळला. गेल्या दोन वर्षांत शिवार पिकलं नाई म्हणून कर्जाची परतफेड करता आली नाही. हे कर्ज आता दोन लाखावर पोचलं आहे. यंदा तीन एकरांत पेरलेल्या सोयाबीनपासून पाच पोते उत्पादकता झाली. लागवडीचा खर्च झाला २७ हजार रुपये त्याची भरपाई पण हे पाच पोते इकून होणार नाई. थकीत दोन लाखाच्या कर्जाचा बोजा अंगावर तसाच आहे, हे संकट का यंदाचंच हाये का? दर हंगामातच हे भोग आमाले भोगावे लागतात. शेतकऱ्याचा जनमच त्यासाठी झाला आहे. म्हणून का जगणं सोडायचं का? आमच्यासाठी दिवाळीच महत्त्व आहे, चिल्ल्यापाल्यांच्या आनंदासाठी तर सण साजरा करावा लागतेच ! नवे कपडे, गोडधोड, फटाके हे लेकरासाठी आणणारचं आहे. दिवाळी प्रकाशाचा सण मग आम्ही अंधारात कसे राहणार !

प्रकाशपर्व साजरे करू…
गावातीलच पंडित ठाकरे यांनी देखील पाच एकरावर सोयाबीन लागवड केली होती. अवघे पंधरा पोतेच उत्पादन झाले. बाजारात भावही गडगडले. अशी संकट तर येतच राहतात. म्हणून का कुटुंबाच्या आनंदासाठी सण साजरा करायचा नाही का असे ते सांगतात. उमेश चौधरी यांना अडीच एकरातून आठ पोते तर रमेश भोसले या दोन एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला केवळ सात पोती सोयाबीन झाले. सात एकर जमीन असलेल्या विनोद ठाकरे यांना तीन पोत्यांचा उतारा आला. परंतु त्यानंतरही खचून न जाता उमेद कायम ठेवत प्रकाशपर्व साजरे करू असा निर्धार भोजला गावातील या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
 
News Item ID: 
820-news_story-1635912604-awsecm-733
Mobile Device Headline: 
दिवाळी प्रकाशाचा सण, मग आम्ही अंधारात कसे राहणार?
Appearance Status Tags: 
Mukhya News
भोजला (ता. पुसद, जि. यवतमाळ) : घरासमोर कुटुंबीयांसमवेत शेतकरी संजय राऊत.भोजला (ता. पुसद, जि. यवतमाळ) : घरासमोर कुटुंबीयांसमवेत शेतकरी संजय राऊत.
Mobile Body: 

आरेगाव, जि. यवतमाळ : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात मग आम्ही शेतकऱ्यानं हा आनंद का साजरा करू नये? नैसर्गिक संकट तर येत-जात राहतात. त्याशिवाय आमचं जगणंच नाही. म्हणून येणारे सणसोहळे साजरे करूच नये का, असा सवाल भोजला (ता. पुसद) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय दिनकर राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे यंदा सोयाबीन गमावल्यानंतरही दिवाळी कुटुंबाला आनंद देण्यासाठी पूर्वीच्या उत्साहात साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यवतमाळची ओळख शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून असली, तरी येथील शेतकरी पीक उत्पादकता वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग करत असतात. नैसर्गिक प्रकोपांना सातत्याने या जिल्ह्यास सामोरे जावे लागते, 

 कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, मध्येच रोग-किडींचा हल्ला आदी कारणांनी शेतकऱ्यांसमोरील आव्हान कायम असते. यंदाही शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकटांनी पिच्छा पुरविला आहे. पुसद तालुक्यातील भोजला शिवारात संततधार पावसामुळे सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले. उत्पादकता आणि उत्पन्नही प्रभावित झाले. मात्र त्यानंतरही गावातील शेतकऱ्यांनी दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. संकट तर आमच्या जीवनाचा भागच झाला आहे. म्हणून का जगणं अन्‌ त्यातील आनंद सोडायचा, अशी प्रतिक्रिया गावातील बहुतांशी शेतकऱ्यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली. 

गावातील श्री. राऊत हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी अशा चौघांचा समावेश आहे. तीन एकर कोरडवाहू शेती असलेले संजय राऊत हे दगड, मातीच्या घरात राहतात. घराला डागडुगीची गरज आहे. परंतु शेतीच्या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणाची तजवीज आणि दैनंदिन गरजा भागवाव्या लागत असल्याने घराच्या दुरुस्तीसाठी पैसा त्यांना यंदा जोडता आला नाही. हंगामात नुकसान झाले की मायबाय सरकार भल्या मोठ्या मदतीचा आव आणते अन् हाती थोडेफार पैसे पडतात. हे तर आमच्यासाठी असं ठरत की राजा उदार झाला अन् हाती भोपया देला. असं दर हंगामातच होत पण यंदा तर राजा आमच्या जिल्ह्यासाठी उदारही झाला नाई.

जून ते ऑगस्ट मईन्यात पावसानं खंड दिला नाही म्हणून २५ टक्के मिळणाऱ्या विमा भरपाईतून आमचा जिल्हा वगळला. गेल्या दोन वर्षांत शिवार पिकलं नाई म्हणून कर्जाची परतफेड करता आली नाही. हे कर्ज आता दोन लाखावर पोचलं आहे. यंदा तीन एकरांत पेरलेल्या सोयाबीनपासून पाच पोते उत्पादकता झाली. लागवडीचा खर्च झाला २७ हजार रुपये त्याची भरपाई पण हे पाच पोते इकून होणार नाई. थकीत दोन लाखाच्या कर्जाचा बोजा अंगावर तसाच आहे, हे संकट का यंदाचंच हाये का? दर हंगामातच हे भोग आमाले भोगावे लागतात. शेतकऱ्याचा जनमच त्यासाठी झाला आहे. म्हणून का जगणं सोडायचं का? आमच्यासाठी दिवाळीच महत्त्व आहे, चिल्ल्यापाल्यांच्या आनंदासाठी तर सण साजरा करावा लागतेच ! नवे कपडे, गोडधोड, फटाके हे लेकरासाठी आणणारचं आहे. दिवाळी प्रकाशाचा सण मग आम्ही अंधारात कसे राहणार !

प्रकाशपर्व साजरे करू…
गावातीलच पंडित ठाकरे यांनी देखील पाच एकरावर सोयाबीन लागवड केली होती. अवघे पंधरा पोतेच उत्पादन झाले. बाजारात भावही गडगडले. अशी संकट तर येतच राहतात. म्हणून का कुटुंबाच्या आनंदासाठी सण साजरा करायचा नाही का असे ते सांगतात. उमेश चौधरी यांना अडीच एकरातून आठ पोते तर रमेश भोसले या दोन एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला केवळ सात पोती सोयाबीन झाले. सात एकर जमीन असलेल्या विनोद ठाकरे यांना तीन पोत्यांचा उतारा आला. परंतु त्यानंतरही खचून न जाता उमेद कायम ठेवत प्रकाशपर्व साजरे करू असा निर्धार भोजला गावातील या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
 
English Headline: 
agriculture news in marathi Farmers Diwali festival of light
Author Type: 
External Author
विनोद इंगोले / गिरिधर ठेंगे : अ‍ॅग्रोवन वृत्तसेवा
सोयाबीन दिवाळी यवतमाळ yavatmal शेतकरी आत्महत्या forest कोरडवाहू शेती farming संजय राऊत sanjay raut शिक्षण education सरकार government
Search Functional Tags: 
सोयाबीन, दिवाळी, यवतमाळ, Yavatmal, शेतकरी आत्महत्या, forest, कोरडवाहू, शेती, farming, संजय राऊत, Sanjay Raut, शिक्षण, Education, सरकार, Government
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Diwali, farmer
Meta Description: 
Diwali, farmer
यंदा सोयाबीन गमावल्यानंतरही दिवाळी कुटुंबाला आनंद देण्यासाठी पूर्वीच्या उत्साहात साजरी करणार असल्याचे अल्पभूधारक शेतकरी संजय दिनकर राऊत यांनी सांगितले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X