Take a fresh look at your lifestyle.

दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

0
दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
 29 May,2019:

दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

आम्ही कास्तकार, मुंबई: राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असताना मॉन्सूनचा पाऊसही लांबणीवर गेलाय. राज्यात मॉन्सून जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं आता कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला परवानगी देण्यात आलीये.

राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीच्या तरतुदीसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून वित्त विभागाला त्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यास आज (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाची परवानगी मिळाली आहे. या कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगासाठी ३० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता यासाठी टेंडर्स मागवले जाणार आहे. टेंडर निघाल्यानंतर केंद्राच्या परवानग्या मिळवून, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाला अंतिम रूप दिले जाऊ शकते.

गेल्या आठवड्यात मॉन्सून अंदमानात दाखल झाला असला तरी त्याला केरळमध्ये यायला उशीर होणार आहे. शिवाय राज्यातही यावर्षी मान्सून पूर्व पावसाच्या सरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच कोसळणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळं राज्य सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे.


कृषी, वित्त, तेजी मंदी, पिक सल्ला, जोडधंदा माहिती मिळविण्यासाठी आजच आम्ही कास्तकार चॅनल सबस्क्राईब करा. लिंकवर क्लिक करा – http://youtube.com/AmhiKastkar
X