‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये देणार ः पाटील

कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यंदा गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन एफआरपी नुसार ३०५६ रुपये दर एकरकमी दिला जाईल. हा दर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वाधिक आहे’’, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली.

 पाटील म्हणाले, ‘‘बिद्री साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ या गत गळीत हंगामात ६ लाख ८० हजार ४२७ मे. टन उसाचे गाळप करून ८ लाख ६५ हजार ६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा १२.७२ टक्के मिळाला. त्यानुसार कारखान्याची एफआरपी ३०५५.१७ रुपये इतकी होते. मात्र कारखान्याने ही रक्कम ३०५६ रुपये इतकी देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने कायमपणे एकरक्कमी एफआरपी दिली. इतर कारखान्यांच्या तुलनेत नेहमीच १०० ते १५० रुपये जास्त राहिली. यंदाही ही प्रथा कायम राखली जाईल.’’

 या वेळी संचालक गणपती फराकटे, प्रवीणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडिराम मगदूम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, के. ना. पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांनी केले. आभार कार्यकारी संचालक के. एस. चौगुले यांनी मानले.

News Item ID: 
820-news_story-1634823620-awsecm-556
Mobile Device Headline: 
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये देणार ः पाटील
Appearance Status Tags: 
Section News
‘Dudhganga Vedganga’ will pay a lump sum of Rs. 3056: Patil‘Dudhganga Vedganga’ will pay a lump sum of Rs. 3056: Patil
Mobile Body: 

कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यंदा गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन एफआरपी नुसार ३०५६ रुपये दर एकरकमी दिला जाईल. हा दर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वाधिक आहे’’, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली.

 पाटील म्हणाले, ‘‘बिद्री साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ या गत गळीत हंगामात ६ लाख ८० हजार ४२७ मे. टन उसाचे गाळप करून ८ लाख ६५ हजार ६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा १२.७२ टक्के मिळाला. त्यानुसार कारखान्याची एफआरपी ३०५५.१७ रुपये इतकी होते. मात्र कारखान्याने ही रक्कम ३०५६ रुपये इतकी देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने कायमपणे एकरक्कमी एफआरपी दिली. इतर कारखान्यांच्या तुलनेत नेहमीच १०० ते १५० रुपये जास्त राहिली. यंदाही ही प्रथा कायम राखली जाईल.’’

 या वेळी संचालक गणपती फराकटे, प्रवीणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडिराम मगदूम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, के. ना. पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांनी केले. आभार कार्यकारी संचालक के. एस. चौगुले यांनी मानले.

English Headline: 
Agriculture news in marathi, ‘Dudhganga Vedganga’ will pay a lump sum of Rs. 3056: Patil
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कोल्हापूर पूर floods कागल साखर
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, कागल, साखर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
‘Dudhganga Vedganga’ will pay a lump sum of Rs. 3056: Patil
Meta Description: 
‘Dudhganga Vedganga’ will pay a lump sum of Rs. 3056: Patil
कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यंदा गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन एफआरपी नुसार ३०५६ रुपये दर एकरकमी दिला जाईल. हा दर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वाधिक आहे’’, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X