'दूध पंढरी'वर २५ कोटी कर्ज, संकलनही दहा टक्क्यांवर 

सोलापूर ः ‘आधी दूध आईचे, मग दूध पंढरी’चे अशी गोड साद घालत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण दुधाचे वितरण करणारी ‘दूध पंढरी’ अर्थात सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आता आर्थिकदृष्ट्या पुरता अडचणीत आला आहे. सुमारे २५ कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असताना दूध संकलनही अवघ्या १० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे संघाच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. 

राज्यातील ज्या काही मोजक्या आणि नावाजलेल्या दूध संस्था आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ‘दूध पंढरी’चा उल्लेख होतो. पण गेल्या काही वर्षांपासून संचालक मंडळाची मनमानी, प्रशासनाची सैल झालेली मूठ आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे संघाला चांगलंच महागात पडल्याचं दिसतं आहे. ‘दूध पंढरी’ हे फक्त नावच दूध व्यवसायासाठी पुरेसे होते. पण या नावाला डाग लागेल, असे काम दूधपंढरीत झाल्यानं संघ मोडकळीस आला, हे वास्तव आहे. 

गाई आणि म्हशीच्या दुधासाठी ‘दूध पंढरी’ची ओळख सांगितली जाते. पण त्यातही गाईच्या दुधाचे संकलन सर्वाधिक होते. काही वर्षापूर्वी ‘दूध पंढरी’चे रोजचे संकलन प्रतिदिन तब्बल ४ लाख ८० हजार लिटर इतके होते. पण आज हेच संकलन प्रतिदिन अवघ्या ४८ ते ४९ हजार लिटरवर म्हणजे जवळपास १० टक्क्यांपर्यंत संकलन खाली आले आहे. आजही ‘दूध पंढरी’च्या दुधावर ग्राहकांचा विश्‍वास आहे, पण संचालक मंडळाने मात्र विश्‍वास गमावल्याने प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे. 

कर्जासाठी जागा विकण्याचा पर्याय 
सध्या दूध संघावर सुमारे २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. कर्ज फेडीपोटी संघाच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता विक्रीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी संघाला मुंबईसह काही प्रमुख शहरातील जागा विक्रीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तसा तो घेतल्याचे समजते. पण या जागेच्या विक्रीवरही काही नेतेमंडळी आपला डोळा ठेवून आहेत. अर्थात, आता प्रशासकीय मंडळ आले आहे. तेच सर्वस्वी निर्णय घेणार आहे. ते नेमके काय आणि कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे. 

दुधात राजकारणाचे पाणी 
जिल्हा दूध संघावर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच नेते मंडळींचा भरणा आहे. त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी अधिक आहेत. संघाचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार दिलीप माने हे सहा महिन्यांपूर्वीच अध्यक्ष झाले, ते सध्या शिवसेनेत आहेत, पण पूर्वाश्रमीचे ते काँग्रेसचे नेते आहेत. तर श्री. माने यांच्या आधी तब्बल १५ वर्षे आमदार प्रशांत परिचारक हे अध्यक्ष होते. ते सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत, असे असले तरी पूर्वाश्रमीचे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. त्यांच्यासारखी अनेक मंडळी संचालक मंडळात आहेत. आज या सर्व नेत्यांनी सोईच्या राजकारणासाठी पक्ष बदलले. पण दूध संघ कसा वाढेल, टिकेल, यासाठी ते काहीच करू शकले नाहीत. केवळ संघात आपली सत्ता कशी टिकेल, यावर राजकारण मात्र करत राहिले. 
(क्रमशः) 

News Item ID: 
820-news_story-1615473929-awsecm-530
Mobile Device Headline: 
‘दूध पंढरी’वर २५ कोटी कर्ज, संकलनही दहा टक्क्यांवर 
Appearance Status Tags: 
Mukhya News
milk milk
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi 25 crore loan on dudh pandhari Maharashtra
Author Type: 
Internal Author
सुदर्शन सुतार
दूध पूर सोलापूर कर्ज प्रशासन व्यवसाय राजकारण भाजप काँग्रेस आमदार प्रशांत परिचारक
Search Functional Tags: 
दूध, पूर, सोलापूर, कर्ज, प्रशासन, व्यवसाय, राजकारण, भाजप, काँग्रेस, आमदार, प्रशांत परिचारक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
25 crore loan on dudh pandhari
Meta Description: 
25 crore loan on dudh pandhari
‘आधी दूध आईचे, मग दूध पंढरी’चे अशी गोड साद घालत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण दुधाचे वितरण करणारी ‘दूध पंढरी’ अर्थात सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आता आर्थिकदृष्ट्या पुरता अडचणीत आला आहे.Source link

Leave a Comment

X