देशाचे कापूस उत्पादन ३३० लाख गाठींपर्यंतच 

जळगाव : देशाचे कापूस उत्पादन ३६० ते ३७५ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) होईल, असा अंदाज सुरुवातीला विविध संस्थांनी व्यक्त केला होता. आता देशाचे उत्पादन ३२५ ते ३३० लाख गाठीच येईल, असा अंदाज जाणकारांनी जळगाव येथे आयोजित बैठकीत व्यक्त केला आहे. 

या बैठकीला खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, असोसिएशनचे जीवन बयस, ज्ञानेश्‍वर भामरे, मुंबई येथील अरुण चौरसिया, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी संचालक अरुण खेतान, असोसिएशनच्या पीक समितीचे सदस्य अरविंद जैन, व कृषी विभागातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कापूस उत्पादन, गुलाबी बोंड अळी, मागणी, पुरवठा आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. 

उत्तरेकडे प्रथमच बोंड अळीचा उपद्रव 
उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थानात मिळून १४ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. तेथे दर वर्षी ५० लाख गाठींचे उत्पादन येते. पण यंदा तेथे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रथमच दिसून आला आहे. यामुळे तेथे पीक मोडण्यात आले आहे. सप्टेंबरमध्येच तेथे कापूस खरेदी वेगात झाली. तेथे १० लाख गाठींनी उत्पादन कमी येईल, असा अंदाज बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

महाराष्ट्रात मोठी घट 
महाराष्ट्रात चीन, अमेरिकेच्या तुलनेत अधिकची कापूस लागवड केली जाते. देशात सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. पण यंदा महाराष्ट्रातील पिकाला अतिवृष्टी व गुलाबी बोंड अळीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत कमी उत्पादन गेले अनेक वर्षे येत आहे. यंदाही महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत पाच ते सात लाख गाठींनी उत्पादन कमी होऊन ते ७५ लाख गाठी एवढेच येईल. यात खानदेशचा वाटा १५ लाख गाठी एवढा राहील. तर गुजरातमध्ये ८० ते ८२ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. कारण तेथील लागवड २२ लाख हेक्टर एवढी असून, दोन वर्षे लागवडीत सतत घट झाली आहे, असेही जाणकारांनी सांगितले. 

कापूस लागवडीत मोठी घट 
देशातील कापूस लागवड सात लाख हेक्टरने घटली आहे. लागवड १२४ लाख हेक्टरवर झाली आहे. शिवाय नैसर्गिक समस्यांचा फटका कापूस पिकाला सर्वत्र बसला आहे. उत्तर, मध्य, दक्षिण भारतात म्हणजेच सर्वत्र उत्पादन घटेल. यामुळे कापूस उत्पादनात गेल्या हंगामाच्या तुलनेत घट येईल. देशात यंदा ३२५ ते ३३० लाख गाठींचे उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

सरकी दरावर दबाव 
केंद्राने खाद्यतेलातील तेजी कमी करण्यासाठी विविध निर्बंध लागू केले आहेत. शिवाय सध्या पशुखाद्यामध्ये सरकी ढेपला कमी मागणी आहे. परिणामी देशात सरकीच्या दरावर दबाव काहीसा वाढला आहे. दरात गेल्या काही दिवसांत क्विंटलमागे ४०० रुपयांनी घट नोंदविण्यात आली असून, दर ३००० रुपयांवर स्थिर आहेत. कापूस दरातील वाढही थांबली असून, कापूस दर खानदेशात किंवा लगतच्या भागात ८००० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

News Item ID: 
820-news_story-1636813341-awsecm-349
Mobile Device Headline: 
देशाचे कापूस उत्पादन ३३० लाख गाठींपर्यंतच 
Appearance Status Tags: 
Mukhya News
The country's cotton production is up to 330 lakh balesThe country's cotton production is up to 330 lakh bales
Mobile Body: 

जळगाव : देशाचे कापूस उत्पादन ३६० ते ३७५ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) होईल, असा अंदाज सुरुवातीला विविध संस्थांनी व्यक्त केला होता. आता देशाचे उत्पादन ३२५ ते ३३० लाख गाठीच येईल, असा अंदाज जाणकारांनी जळगाव येथे आयोजित बैठकीत व्यक्त केला आहे. 

या बैठकीला खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, असोसिएशनचे जीवन बयस, ज्ञानेश्‍वर भामरे, मुंबई येथील अरुण चौरसिया, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी संचालक अरुण खेतान, असोसिएशनच्या पीक समितीचे सदस्य अरविंद जैन, व कृषी विभागातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कापूस उत्पादन, गुलाबी बोंड अळी, मागणी, पुरवठा आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. 

उत्तरेकडे प्रथमच बोंड अळीचा उपद्रव 
उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थानात मिळून १४ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. तेथे दर वर्षी ५० लाख गाठींचे उत्पादन येते. पण यंदा तेथे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रथमच दिसून आला आहे. यामुळे तेथे पीक मोडण्यात आले आहे. सप्टेंबरमध्येच तेथे कापूस खरेदी वेगात झाली. तेथे १० लाख गाठींनी उत्पादन कमी येईल, असा अंदाज बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

महाराष्ट्रात मोठी घट 
महाराष्ट्रात चीन, अमेरिकेच्या तुलनेत अधिकची कापूस लागवड केली जाते. देशात सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. पण यंदा महाराष्ट्रातील पिकाला अतिवृष्टी व गुलाबी बोंड अळीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत कमी उत्पादन गेले अनेक वर्षे येत आहे. यंदाही महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत पाच ते सात लाख गाठींनी उत्पादन कमी होऊन ते ७५ लाख गाठी एवढेच येईल. यात खानदेशचा वाटा १५ लाख गाठी एवढा राहील. तर गुजरातमध्ये ८० ते ८२ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. कारण तेथील लागवड २२ लाख हेक्टर एवढी असून, दोन वर्षे लागवडीत सतत घट झाली आहे, असेही जाणकारांनी सांगितले. 

कापूस लागवडीत मोठी घट 
देशातील कापूस लागवड सात लाख हेक्टरने घटली आहे. लागवड १२४ लाख हेक्टरवर झाली आहे. शिवाय नैसर्गिक समस्यांचा फटका कापूस पिकाला सर्वत्र बसला आहे. उत्तर, मध्य, दक्षिण भारतात म्हणजेच सर्वत्र उत्पादन घटेल. यामुळे कापूस उत्पादनात गेल्या हंगामाच्या तुलनेत घट येईल. देशात यंदा ३२५ ते ३३० लाख गाठींचे उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

सरकी दरावर दबाव 
केंद्राने खाद्यतेलातील तेजी कमी करण्यासाठी विविध निर्बंध लागू केले आहेत. शिवाय सध्या पशुखाद्यामध्ये सरकी ढेपला कमी मागणी आहे. परिणामी देशात सरकीच्या दरावर दबाव काहीसा वाढला आहे. दरात गेल्या काही दिवसांत क्विंटलमागे ४०० रुपयांनी घट नोंदविण्यात आली असून, दर ३००० रुपयांवर स्थिर आहेत. कापूस दरातील वाढही थांबली असून, कापूस दर खानदेशात किंवा लगतच्या भागात ८००० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

English Headline: 
Agriculture News in Marathi The country’s cotton production is up to 330 lakh bales
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कापूस जळगाव jangaon खानदेश जैन वन forest मुंबई mumbai कृषी विभाग agriculture department विभाग sections गुलाब rose बोंड अळी bollworm भारत पंजाब राजस्थान महाराष्ट्र maharashtra पशुखाद्य
Search Functional Tags: 
कापूस, जळगाव, Jangaon, खानदेश, जैन, वन, forest, मुंबई, Mumbai, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, गुलाब, Rose, बोंड अळी, bollworm, भारत, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, Maharashtra, पशुखाद्य
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The country’s cotton production is up to 330 lakh bales
Meta Description: 
The country’s cotton production is up to 330 lakh bales
देशाचे कापूस उत्पादन ३६० ते ३७५ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) होईल, असा अंदाज सुरुवातीला विविध संस्थांनी व्यक्त केला होता. आता देशाचे उत्पादन ३२५ ते ३३० लाख गाठीच येईल, असा अंदाज जाणकारांनी जळगाव येथे आयोजित बैठकीत व्यक्त केला आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X