‘दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा’

नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दोन वर्षांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करावे, अशी मागणी स्वराज्य रक्षक संघर्ष समितीचे समन्वयक साईनाथ घोरपडे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात घोरपडे यांनी म्हटले आहे, की आजही मोठ्या प्रमाणावर उद्योग- व्यवसाय सुरू झालेले नाहीत. कोरोना संकटाच्या काळात सर्वांत जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले. बाजार समित्या बंद असल्यामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले. शेतमाल तसाच शेतात सडून गेला. अशा स्थितीत, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना रक्कम भरणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे दोन वर्षांपर्यंतचे कर्जावरील व्याज माफ करावे. कांद्यालाही हमी भाव द्यावा. शेतमजूर, बांधकाम कामगारांसाख्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना जेवणाची व्यवस्था करावी. सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमहिना दीड हजार रुपये भत्ता द्यावा. शहरी भागातील मध्यमवर्गीय नागरिकांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे आणि एका वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी. तसेच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपर्यंतचे वीजबिल माफ करावे, तसेच त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे. 

News Item ID: 
820-news_story-1590693185-399
Mobile Device Headline: 
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा'
Appearance Status Tags: 
Tajya News
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा''दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा'
Mobile Body: 

नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दोन वर्षांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करावे, अशी मागणी स्वराज्य रक्षक संघर्ष समितीचे समन्वयक साईनाथ घोरपडे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात घोरपडे यांनी म्हटले आहे, की आजही मोठ्या प्रमाणावर उद्योग- व्यवसाय सुरू झालेले नाहीत. कोरोना संकटाच्या काळात सर्वांत जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले. बाजार समित्या बंद असल्यामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले. शेतमाल तसाच शेतात सडून गेला. अशा स्थितीत, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना रक्कम भरणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे दोन वर्षांपर्यंतचे कर्जावरील व्याज माफ करावे. कांद्यालाही हमी भाव द्यावा. शेतमजूर, बांधकाम कामगारांसाख्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना जेवणाची व्यवस्था करावी. सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमहिना दीड हजार रुपये भत्ता द्यावा. शहरी भागातील मध्यमवर्गीय नागरिकांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे आणि एका वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी. तसेच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपर्यंतचे वीजबिल माफ करावे, तसेच त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे. 

English Headline: 
agriculture news in marathi wave two years interest on farmers loan : Sainath Ghorpade
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नगर कोरोना corona व्यवसाय profession कर्ज व्याज बेरोजगार पाणी water
Search Functional Tags: 
नगर, कोरोना, Corona, व्यवसाय, Profession, कर्ज, व्याज, बेरोजगार, पाणी, Water
Twitter Publish: 
Meta Keyword: 
wave two years interest on farmers loan : Sainath Ghorpade
Meta Description: 
wave two years interest on farmers loan : Sainath Ghorpade
लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दोन वर्षांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करावे : साईनाथ घोरपडेSource link

Leave a Comment

X