द्राक्ष बागेतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे, उपाययोजना

दर्जेदार द्राक्ष उत्पादन व वजनासाठी द्राक्ष वेलीत अन्नद्रव्यांचा समतोल राखणे गरजेचे असते. याचाच अर्थ बागेत अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अधिकताही होणे योग्य नव्हे. याकरिता अन्नद्रव्यांची कमतरता व अधिकता यांची पाने, काडी व मण्यावरील लक्षणे बागायतदारांनी माहीत करून घेणे गरजेचे आहे.

दर्जेदार द्राक्ष उत्पादन व वजनासाठी द्राक्ष वेलीत अन्नद्रव्यांचा समतोल राखणे गरजेचे असते. याचाच अर्थ बागेत अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अधिकताही होणे योग्य नव्हे. यामुळे द्राक्षांचा दर्जा घसरतो, वजन कमी मिळते, द्राक्षात साखर कमी राहते, द्राक्षाचा टिकाऊपणा कमी होतो, द्राक्षास आकर्षक रंग न येण्याची समस्या उद्‍भवते. याकरिता अन्नद्रव्यांची कमतरता व अधिकता यांची पाने, काडी व मण्यावरील लक्षणे बागायतदारांनी माहीत करून घेणे गरजेचे आहे. अशा पानावरील लक्षणांची छायाचित्रे काढण्याचे व संकलनाचे काम गेल्या तीन वर्षापासून प्रयोग परिवारातील वासुदेव काठे व अशोक पाटील करत आहेत. काहीवेळा एकाच वेळी पानांवर दोन किंवा तीन अन्नद्रव्यांच्या कमतरता एकत्रित दिसतात, त्याचीही ओळख पटवणारी काही छायाचित्रे मिळवण्यात यश आले आहे. निरीक्षणाअंती काढलेल्या छायाचित्रांची खात्री प्रत्यक्ष पर्ण देठ परिक्षणातून पक्की केल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही माहिती सर्व द्राक्ष बागायतदारांना नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

पालाश (पोटॅश) कमतरता 
छाटणीनंतर साधारणपणे पंचवीस दिवसांपासून पुढे जमिनीत पोटॅशची कमतरता असल्यास पोटॅश कमतरतेची लक्षणे पानांवर दिसायला लागतात. हा फोटोग्राफ्स छाटणीनंतर ४५ दिवसाचा आहे. या ठिकाणी पोटॅश कमतरतेची सुरुवातीची लक्षणे या पानावर दिसत आहे पानांच्या कडा आतमध्ये वळलेल्या आहेत. वेलीत नत्र वाढले तरीही पानात पोटॅश कमतरता दिसायला लागते किंवा अचानक पाऊस होऊन नत्र वाढले तरीही दुसऱ्या दिवशी या प्रमाणे पानाच्या कडा आतमध्ये वळतात व तात्पुरती पोटॅश कमतरता दिसू लागते

कमतरतेची लक्षणे
पालाश कमतरतेची सुरुवातीची लक्षणे दिसू लागताच त्वरित पालाश पुरवठा न केल्यास पाने हळूहळू कडेने पिवळी पडू लागतात. काडीची पक्वता होण्यास उशीर होतो. मण्यात साखर कमी भरते. माल उशिरा तयार होणे यासारखे दुष्परिणाम दिसतात.

उपाययोजना
पालाश कमतरतेची सुरुवातीची लक्षणे दिसताच सल्फेट ऑफ पोटॅश पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे चार दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. जमिनीत कमतरता नियंत्रणात आणण्यासाठी एकरी सात किलो या प्रमाणे तीन वेळा सात दिवसांच्या अंतराने सल्फेट ऑफ पोटॅश (एकूण २० किलो) द्यावे.

स्फुरदची (फॉस्फरस) मध्यम कमतरता 
फॉस्फरसच्या कमतरतेमुळे छाटणीनंतर ४० ते ६० दिवसादरम्यान काडी तळापासून हिरवी न राहता गुलाबी होते. पानांचे देठ ही गुलाबी होतात. याची अल्प प्रमाणातील सुरुवात ही छाटणीनंतर फुटी ८ ते ९ इंच असल्यापासूनच होते. याच वेळी वरील लक्षणे दिसू लागताच फॉस्फरस कमतरता भरून काढण्याकरिता उपाययोजना करावी.

फॉस्फरसची तीव्र कमतरता 
छाटणीनंतर ४० ते ६० दिवसांदरम्यानची तीव्र कमतरता असल्यास काडी तळापासून पुढे सात ते दहा पेरापर्यंत गुलाबी होते. तसेच पानांचे देठ गुलाबी होतात. घडांचे मणी हिरवे न राहता पिवळसर पोपटी होतात. मण्यांची फुगवण मागे पडून कमी राहते.

फॉस्फरस व झिंकच्या अल्प कमतरतेची एकत्रित लक्षणे 
छाटणीनंतर ३० ते ४० दिवसांदरम्यान पानातील फॉस्फरस व झिंकच्या अल्प व सुरुवातीच्या कमतरतेची एकत्रित लक्षणे या पानात दिसत आहे

फॉस्फरस कमतरता
पानांच्या शिरा देठापासून बाहेरच्या बाजूकडे गुलाबी होत चाललेल्या आहेत. पानांचा रंग हिरव्याकडून फिकट हिरव्याकडे झुकत चालला आहे. ही फॉस्फरसच्या कमतरतेची सुरुवात आहे.

झिंक कमतरता
झिंकच्या सुरुवातीच्या कमतरतेच्या लक्षणामध्ये पानाची अर्धी बाजू लहान व अर्धी मोठी दिसते. तसेच पान पुढील बाजूस लांबट झालेले आहे.

उपाययोजना

 • फॉस्फरस कमतरता भरून काढण्यासाठी, १२: ६१ः० हे विद्राव्य खत अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. जमिनीत एकरी ७ किलो या प्रमाणे सात दिवसांच्या अंतराने ३ वेळा द्यावे. निरीक्षणानंतर गरज भासल्यास आणखी एकदा द्यावे.
 • झिंक कमतरता त्वरित भरून काढण्यासाठी, झिंक चिलेटेड (१२%) अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे उन्हे कमी असताना (दुपारी चार नंतर) पानांवर फवारणी करावी. चार दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. जमिनीत झिंक सल्फेट (२१%) एकरी पाच किलो या प्रमाणे चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा (एकूण १० किलो) ठिबकद्वारे द्यावे.

फॉस्फरस, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज व फेरसची एकत्रित कमतरता

 • फॉस्फरस कमतरता- हे पान पूर्ण हिरवे नसून, पिंगट हिरवे असल्यामुळे फॉस्फरसची कमतरता या पानात असल्याचे स्पष्ट होते. तसेच पानाच्या मुख्य देठापासून वरील बाजूने शिरा गुलाबी पडत चालल्या आहेत.
 • मॅग्नेशिअम कमतरता- पानाच्या शिरा हिरव्या व पान पिवळे आहे.
 • मँगेनीज कमतरता-निरोगी पानाच्या तुलनेमध्ये या पानांच्या कडांना जास्त कोन (दातेरी) दिसत आहेत.
 • फेरस कमतरता- या पानाच्या कडेने पिवळटपणा आत मध्ये वाढत चालला आहे. त्यामागून कडेने पांढरटपणाही वाढत आहे. यावरून यात फेरसचीही कमतरता आहे.
 • प्रत्यक्ष पर्ण देठाची अन्नद्रव्य तपासणी केल्यानंतर वरील पानांमध्ये असलेल्या लक्षणाप्रमाणे त्या त्या अन्नद्रव्यांच्या कमतरता असल्याचे पक्की झाले आहे. (याचा अहवाल उपलब्ध आहे.)

उपाययोजना
फॉस्फरस, मॅग्नेशिअम, फेरसची कमतरता भरून काढण्याच्या वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. मॅंगेनीज कमतरता भरून काढण्यासाठी, चिलेटेड मॅंगेनिज (१२%) अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दुपारी ४ नंतर उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर फवारणी करावी. चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. जमिनीतून एकरी पाच किलो मॅंगेनीज सल्फेट सात दिवसांच्या अंतराने दोन वेळा (एकूण दहा किलो) द्यावे.

मॅग्नेशिअम कमतरतेची सुरुवात
पानाच्या मुख्य शिरा हिरव्या राहून पानाच्या शिरामधील भागाचा हिरवेपणा कमी होत जातो. तो पिवळेपणाकडे झुकतो. ही अगदी सुरुवातीची मॅग्नेशिअम कमतरतेची लक्षणे आहेत. ही कमतरता अशीच राहिली तर पुढे तीव्र होत जाते. सुरुवातीच्या अवस्थेत अशी कमतरतेची लक्षणे दिसताच मॅग्नेशिअम फवारणी व जमिनीतून पूर्तता केल्यास ही कमतरता लवकर भरून निघते.
 
– वासुदेव चि. काठे, ९९२२७१९१७१
अशोक ना. पाटील, ९७६५२१९७९५

(दाभोलकर प्रयोग परिवार महाराष्ट्र राज्य)

News Item ID: 
820-news_story-1636546112-awsecm-310
Mobile Device Headline: 
द्राक्ष बागेतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे, उपाययोजना
Appearance Status Tags: 
Section News
Symptoms of nutrient deficiencies in the vineyardSymptoms of nutrient deficiencies in the vineyard
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Symptoms of nutrient deficiencies in the vineyard
Author Type: 
External Author
वासुदेव काठे, अशोक पाटील
द्राक्ष साखर वर्षा varsha ऊस पाऊस गुलाब rose खत fertiliser महाराष्ट्र maharashtra
Search Functional Tags: 
द्राक्ष, साखर, वर्षा, Varsha, ऊस, पाऊस, गुलाब, Rose, खत, Fertiliser, महाराष्ट्र, Maharashtra
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Symptoms of nutrient deficiencies in the vineyard
Meta Description: 
Symptoms of nutrient deficiencies in the vineyard
दर्जेदार द्राक्ष उत्पादन व वजनासाठी द्राक्ष वेलीत अन्नद्रव्यांचा समतोल राखणे गरजेचे असते. याचाच अर्थ बागेत अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अधिकताही होणे योग्य नव्हे. याकरिता अन्नद्रव्यांची कमतरता व अधिकता यांची पाने, काडी व मण्यावरील लक्षणे बागायतदारांनी माहीत करून घेणे गरजेचे आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X