[ad_1]
धुळे ः जिल्ह्यातील तापी, बोरी नदीवरील चार वाळूगटांची लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात चारपैकी एक गट केवळ शासकीय कामासाठी राखीव ठेवला आहे. त्याचा ठेका लघुपाटबंधारे विभागाला दिला आहे. शिरपूर तालुक्यातील दोन्ही वाळूगटांसाठी एकाच ठेकेदाराच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. या चार गटांच्या लिलावातून जिल्ह्याच्या महसुलात पाच कोटींची भर पडणे अपेक्षित आहे.
तीन वर्षांपूर्वी केवळ अच्छी व उपरपिंड येथील दोनच गटांचा लिलाव होऊन त्यातून दोन कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने प्रशासनाने पर्यावरण विभागाच्या परवानगीनुसार चार वाळूगटांच्या निविदा मागविल्या. त्यात तापी नदीवरील उपरपिंड व लोंढरे (ता. शिरपूर) येथील गटांचा आणि दातर्ती (ता. साक्री) येथील गटासाठी निविदा मागविल्या.
उपरपिंड येथील गटासाठी तीन कोटी १८ लाख, तर लोंढरे येथील वाळू गटासाठी एक कोटी ५९ लाखांची निविदा मंजूर झाली. दातर्ती गटासाठी विलास वाघ यांची २७ लाख ५५ हजारांची निविदा मंजूर झाली. या शिवाय बोरी नदीवरील निमगूळ (ता. शिंदखेडा) येथील गट शासकीय कामासाठी राखीव ठेवला आहे.
ज्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत, त्यांच्याशी करार करताना संबंधित गटांतून किती प्रमाणात वाळूउपसा करावयाचा यांसह इतर नियमानुसार करारनामा करून त्यांना कार्यादेश देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण केली जाईल. या संबंधी चर्चा करण्यासाठी लिलावकर्त्यांची लवकरच बैठक बोलविली जाईल.
– हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, धुळे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.