धोरणात्मक बाबींवरच एकवाक्यता नाही

नवी दिल्ली ः काँग्रेस नेत्यांमध्ये धोरणांबाबत स्पष्टता, एकवाक्यतेबाबत असलेल्या अभावावर पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (मंगळवारी) तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘‘ देशासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाकडून दररोज दिले जाणारे तपशीलवार निवेदन तालुका, जिल्हा स्तरांवरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही हा आपला अनुभव आहे. धोरणात्मक बाबींवर राज्यातील नेत्यांमध्ये स्पष्टता व एकवाक्यता दिसत नाही.’’ अशा खरमरीत शब्दांत सोनियांनी पक्ष नेत्यांना फटकारले आहे. 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होत असून यातील सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी पक्षाचे सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक आज पक्षाच्या मुख्यालयात झाली. या बैठकीत बोलताना सोनिया गांधींनी नेत्यांना सदस्य नोंदणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. या बैठकीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसने विचारसरणीवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. सोनियांनी त्याचाच पुनरुच्चार केला. सोनिया गांधीनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी संघर्ष करताना जनतेसमोर त्यांचा खोटेपणा उघड करणे आवश्यक असल्यावर भर दिला. मात्र, पक्षाचा संदेश पोचविण्यात नेते मंडळी कमी पडत असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी दिल्या. शिस्त आणि एकतेचे धडे देताना सोनियांनी नेत्यांना व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्याचेही आवाहन केले. 

प्रशिक्षणाची आवश्‍यकता 
सोनिया म्हणाल्या, ‘‘काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात होते आहे. देशातील तरुणांना योग्य राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आपले काम आहे. यासाठी सदस्य नोंदणीच्या अर्जांची योग्य छपाई करून प्रत्येक गावात, वॉर्डांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्था करावी. यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आवश्यक असून ही लोकशाही, राज्यघटना आणि पक्षाच्या विचारसरणीच्या रक्षणाची लढाई आहे. भाजप, संघाकडून पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.’’ 

चर्चेनंतर जाहीरनामा निर्मिती 
केंद्र सरकारवर टीका करताना सोनिया म्हणाल्या, की जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी मोदी सरकार सर्व संस्था नष्ट करायला निघाले आहे. हा राज्यघटनेच्या तसेच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वावरील घाला आहे. यासोबतच, उत्तर प्रदेश, पंजाबसह आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा प्रचार तसेच जाहीरनामा पक्षाच्या धोरणानुसार समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करून तयार केला जावा. 
 
News Item ID: 
820-news_story-1635258053-awsecm-759
Mobile Device Headline: 
धोरणात्मक बाबींवरच एकवाक्यता नाही
Appearance Status Tags: 
Mukhya News
There is no consensus on strategic issuesThere is no consensus on strategic issues
Mobile Body: 

नवी दिल्ली ः काँग्रेस नेत्यांमध्ये धोरणांबाबत स्पष्टता, एकवाक्यतेबाबत असलेल्या अभावावर पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (मंगळवारी) तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘‘ देशासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाकडून दररोज दिले जाणारे तपशीलवार निवेदन तालुका, जिल्हा स्तरांवरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही हा आपला अनुभव आहे. धोरणात्मक बाबींवर राज्यातील नेत्यांमध्ये स्पष्टता व एकवाक्यता दिसत नाही.’’ अशा खरमरीत शब्दांत सोनियांनी पक्ष नेत्यांना फटकारले आहे. 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होत असून यातील सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी पक्षाचे सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक आज पक्षाच्या मुख्यालयात झाली. या बैठकीत बोलताना सोनिया गांधींनी नेत्यांना सदस्य नोंदणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. या बैठकीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसने विचारसरणीवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. सोनियांनी त्याचाच पुनरुच्चार केला. सोनिया गांधीनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी संघर्ष करताना जनतेसमोर त्यांचा खोटेपणा उघड करणे आवश्यक असल्यावर भर दिला. मात्र, पक्षाचा संदेश पोचविण्यात नेते मंडळी कमी पडत असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी दिल्या. शिस्त आणि एकतेचे धडे देताना सोनियांनी नेत्यांना व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्याचेही आवाहन केले. 

प्रशिक्षणाची आवश्‍यकता 
सोनिया म्हणाल्या, ‘‘काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात होते आहे. देशातील तरुणांना योग्य राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आपले काम आहे. यासाठी सदस्य नोंदणीच्या अर्जांची योग्य छपाई करून प्रत्येक गावात, वॉर्डांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्था करावी. यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आवश्यक असून ही लोकशाही, राज्यघटना आणि पक्षाच्या विचारसरणीच्या रक्षणाची लढाई आहे. भाजप, संघाकडून पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.’’ 

चर्चेनंतर जाहीरनामा निर्मिती 
केंद्र सरकारवर टीका करताना सोनिया म्हणाल्या, की जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी मोदी सरकार सर्व संस्था नष्ट करायला निघाले आहे. हा राज्यघटनेच्या तसेच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वावरील घाला आहे. यासोबतच, उत्तर प्रदेश, पंजाबसह आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा प्रचार तसेच जाहीरनामा पक्षाच्या धोरणानुसार समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करून तयार केला जावा. 
 
English Headline: 
Agriculture news in Marathi There is no consensus on strategic issues
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
काँग्रेस indian national congress सोनिया गांधी संघटना unions निवडणूक राहुल गांधी rahul gandhi भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रशिक्षण training सरकार government मोदी सरकार
Search Functional Tags: 
काँग्रेस, Indian National Congress, सोनिया गांधी, संघटना, Unions, निवडणूक, राहुल गांधी, Rahul Gandhi, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रशिक्षण, Training, सरकार, Government, मोदी सरकार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
There is no consensus on strategic issues
Meta Description: 
There is no consensus on strategic issues
काँग्रेस नेत्यांमध्ये धोरणांबाबत स्पष्टता, एकवाक्यतेबाबत असलेल्या अभावावर पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (मंगळवारी) तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X