नगर जिल्ह्यात एक टक्काही पीक कर्जपुरवठा नाही

 नगर  ः खरीप हंगामासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याला यंदा ब्रेक लागला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात यंदा उद्दिष्ठाच्या तुलनेत एक टक्काही कर्जपुरवठा शेतकऱ्यांना झालेला नाही. खरीप पंधरा दिवसावर आलेला असताना कर्जवितरण नसल्याने शेतकरी हतबल आहेत. आतापर्यंत खरिपासाठी ३ हजार ४१० कोटींपैकी अवघे १३९ कोटींचे वाटप झाले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा खरीप, रब्बीसाठी ५ लाख ७८ हजार ५१२ शेतकऱ्यांना ५२५० कोटी ४५ लाख रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ठ आहे. यंदा खरिपासाठी ३ लाख ७४ हजार ४२८ शेतकऱ्यांना ३ हजार ४१० कोटी रुपये वाटपाचे नियोजन आहे. मात्र ‘कोरोना’च्या नावाखाली गेल्या दोन महिन्यांपासून बॅंकांमध्ये बहूतांश कामकाज बंद असल्याने कर्जवाटपही ‘लॉकडाउन’ झाल्यासारखी स्थिती आहे. आतापर्यंत जिल्हा बॅंकेने १२३ कोटी तर अन्य बॅंकांनी १६ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत व खाजगी २७ बॅंकांपैकी ११ बॅंकांनी आतापर्यंत एकही रुपया वाटप केलेला नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कर्ज न मिळाल्यास खते, बियाणांसह अन्य साहित्य खरेदी करण्याला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

यंदा एक टक्काही वाटप नाही
खरीप हंगामाच्या तोंडावर दरवर्षी पीककर्जाचे वाटप केले जाते. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे सर्वच बॅंकांत आधार कार्ड लिंकिंग, कर्जप्रस्ताव करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणे यासह प्रमुख कामे बंद आहेत. त्याचा गंभीर परिणाम कर्जवाटपावर झाल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी खरिपात ३ लाख ४७ हजार १४७ शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ठ होते. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत साडेसातशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जवाटप झाले होते. त्यातुलनेत यंदा अवघे १३९ कोटींचे वाटप झाले आहे.
 
नगर जिल्ह्याची स्थिती

  • खरिपातील कर्जवाटप उद्दिष्ट ः ३४१० कोटी ६८ कोटी
  • शेतकरी संख्या ः ३ लाख ७४ हजार ४२८
  • आतापर्यंत वाटप ः १३९ कोटी ४१ लाख
  • वाटप केलेले शेतकरी ः १५ हजार ८७३
  • वाटपाची टक्केवारी ः ०.६

शेतकरी प्रतिक्रिया
खरिपाच्या तोंडावर कर्ज मिळणे गरजेचे असते. मात्र अजून अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. कर्जमाफी प्रमाणपत्र मिळाले नसल्यानेही अडचणी वाढत आहेत. शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळणे गरजेचे आहे.
– पद्माकर कोरडे, शेतकरी, वाकोडी, जि. नगर.

पीककर्ज मिळणे गरजेचे असताना बॅंकापर्यंत जाणेच अवघड झाले आहे. बॅंकांच्या शाखांतच कामांना बंधन असून केवळ एक कर्मचारी काम करतो. अजून कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज मिळालेले नाही. आता शेतकऱ्यांना लवकर कर्जवाटप केले नाही तर खरीपही संकटात येईल.
– गणेश तोडकर, शेतकरी, वीरगाव ता. अकोले, जि. नगर.
 
News Item ID: 
820-news_story-1589198280-612
Mobile Device Headline: 
नगर जिल्ह्यात एक टक्काही पीक कर्जपुरवठा नाही
Appearance Status Tags: 
Tajya News
crop loan distribution slow in district crop loan distribution slow in district
Mobile Body: 

 नगर  ः खरीप हंगामासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याला यंदा ब्रेक लागला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात यंदा उद्दिष्ठाच्या तुलनेत एक टक्काही कर्जपुरवठा शेतकऱ्यांना झालेला नाही. खरीप पंधरा दिवसावर आलेला असताना कर्जवितरण नसल्याने शेतकरी हतबल आहेत. आतापर्यंत खरिपासाठी ३ हजार ४१० कोटींपैकी अवघे १३९ कोटींचे वाटप झाले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा खरीप, रब्बीसाठी ५ लाख ७८ हजार ५१२ शेतकऱ्यांना ५२५० कोटी ४५ लाख रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ठ आहे. यंदा खरिपासाठी ३ लाख ७४ हजार ४२८ शेतकऱ्यांना ३ हजार ४१० कोटी रुपये वाटपाचे नियोजन आहे. मात्र ‘कोरोना’च्या नावाखाली गेल्या दोन महिन्यांपासून बॅंकांमध्ये बहूतांश कामकाज बंद असल्याने कर्जवाटपही ‘लॉकडाउन’ झाल्यासारखी स्थिती आहे. आतापर्यंत जिल्हा बॅंकेने १२३ कोटी तर अन्य बॅंकांनी १६ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत व खाजगी २७ बॅंकांपैकी ११ बॅंकांनी आतापर्यंत एकही रुपया वाटप केलेला नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कर्ज न मिळाल्यास खते, बियाणांसह अन्य साहित्य खरेदी करण्याला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

यंदा एक टक्काही वाटप नाही
खरीप हंगामाच्या तोंडावर दरवर्षी पीककर्जाचे वाटप केले जाते. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे सर्वच बॅंकांत आधार कार्ड लिंकिंग, कर्जप्रस्ताव करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणे यासह प्रमुख कामे बंद आहेत. त्याचा गंभीर परिणाम कर्जवाटपावर झाल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी खरिपात ३ लाख ४७ हजार १४७ शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ठ होते. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत साडेसातशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जवाटप झाले होते. त्यातुलनेत यंदा अवघे १३९ कोटींचे वाटप झाले आहे.
 
नगर जिल्ह्याची स्थिती

  • खरिपातील कर्जवाटप उद्दिष्ट ः ३४१० कोटी ६८ कोटी
  • शेतकरी संख्या ः ३ लाख ७४ हजार ४२८
  • आतापर्यंत वाटप ः १३९ कोटी ४१ लाख
  • वाटप केलेले शेतकरी ः १५ हजार ८७३
  • वाटपाची टक्केवारी ः ०.६

शेतकरी प्रतिक्रिया
खरिपाच्या तोंडावर कर्ज मिळणे गरजेचे असते. मात्र अजून अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. कर्जमाफी प्रमाणपत्र मिळाले नसल्यानेही अडचणी वाढत आहेत. शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळणे गरजेचे आहे.
– पद्माकर कोरडे, शेतकरी, वाकोडी, जि. नगर.

पीककर्ज मिळणे गरजेचे असताना बॅंकापर्यंत जाणेच अवघड झाले आहे. बॅंकांच्या शाखांतच कामांना बंधन असून केवळ एक कर्मचारी काम करतो. अजून कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज मिळालेले नाही. आता शेतकऱ्यांना लवकर कर्जवाटप केले नाही तर खरीपही संकटात येईल.
– गणेश तोडकर, शेतकरी, वीरगाव ता. अकोले, जि. नगर.
 
English Headline: 
Farming agricultural Business crop loan distribution slow in district Nagar Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कर्ज नगर खरीप मका पीककर्ज आधार कार्ड
Search Functional Tags: 
कर्ज, नगर, खरीप, मका, पीककर्ज, आधार कार्ड
Twitter Publish: 
Meta Keyword: 
crop loan farmers kharip district bank corona Ahmadnagar
Meta Description: 
crop loan distribution slow in district
 नगर  ः खरीप हंगामासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याला यंदा ब्रेक लागला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात यंदा उद्दिष्ठाच्या तुलनेत एक टक्काही कर्जपुरवठा शेतकऱ्यांना झालेला नाही. खरीप पंधरा दिवसावर आलेला असताना कर्जवितरण नसल्याने शेतकरी हतबल आहेत. आतापर्यंत खरिपासाठी ३ हजार ४१० कोटींपैकी अवघे १३९ कोटींचे वाटप झाले आहे.Source link

Leave a Comment

X