[ad_1]
नगर : यंदा रब्बीत बोगस आणि भेसळ असलेले बियाणे विक्री करून नगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कृषी विभाग गांभीर्याने दखल घेत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, टाकळीमियाँ, वळण, केंदळ येथे शेतकऱ्यांची कांदा बियाण्यात फसवणूक झाली. गावरान लाल कांद्याचे बियाणे खरेदी केले असता, प्रत्यक्षात उत्पादनात पांढरा कांदा निघाला. कृषी सेवा केंद्राचे उंबरठे झिजवूनही नुकसानभरपाई काही मिळाली नाही. नेवासा तालुक्यातही गोगलगाव व अन्य गावांत कांदा बियाण्यांत फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.
आतापर्यंत वीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असून, कृषी दुकानदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ७० ते ८० किलो बियाणे विक्री झाल्याचा अंदाज आहे. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी माहिती दिली. दगडू शेळके, रमेश लांडगे (रा. टाकळीमियाँ) यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. त्यांच्या बियाण्यात भेसळ आढळल्याचे श्री. ठोकळ म्हणाले.
देवळाली प्रवरा येथील नितीन बबन खांदे, रोहित विठ्ठल शेटे यांनी बाजार समिती आवारातील कृषी सेवा केंद्रातून २ ऑक्टोबर २०२० रोजी ३५ हजार रुपये किंमतीचे खासगी कंपनीचे लाल गावरान कांद्याचे बियाणे खरेदी केले. मशागत करून कांदा लागवड केली. योग्य प्रमाणात औषध फवारणी, खतांचा वापर केला. शेतात कांदापीक बहरले. परंतु कांदा मोठा होऊ लागला, तसा पांढरा आढळून येऊ लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधला. केंद्र चालकाने बियाणे कंपनीशी संपर्क साधला. कंपनीच्या प्रतिनिधीने नुकसानभरपाई देऊ, असे सांगून नंतर फोन उचलणेही बंद केले. अखेर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेत लेखी तक्रार केली.
प्रतिक्रिया…
यंदा गावराण कांद्याचे बियाणे म्हणून खरेदी केले. मात्र त्यात अन्य भेसळीचे बियाणे मिसळल्याचे आता दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात डेंगळे निघाले असून, पावसाळ्यात लावला जाणारा कांदाही आहे. त्यामुळे यंदा चाळीस टक्के आर्थिक फटका बसणार आहे. याबाबत आम्ही कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.
– सुनील मते, शेतकरी, गोगलगाव, ता. नेवासा, जि. नगर

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.