नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा; १४ विषय मंजूर

नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा झाली. त्यात एकूण सर्व १४ विषय मंजूर करण्यात आले. त्यातील चार विषयांना १०० टक्के मते मिळाली.

कोरोनामुळे जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय सभा झाली नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच अंदाजपत्रक मंजूर करून घेतले. अजूनही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे सभा घेणे शक्‍य नसल्याने, तसेच विकासकामे मंजूर होणे गरजेचे असल्यामुळे लेखी प्रतिपादन सभा घेण्याचे ठरले. त्यानुसार, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. त्यात श्रीरामपूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची निविदा स्वीकृतीस मंजुरी देणे, ६४ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील शासकीय रुग्णवाहिकेवर कंत्राटी वाहनचालक सेवा पुरविण्याच्या ४० लाख ८० हजारांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देणे, शेवगाव-पाथर्डी पाणीयोजनेच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चास मंजुरी देणे, आदी विषय होते.

सर्व सदस्यांना विषयपत्रिका पाठवून त्यावर मान्य व अमान्य, अशी मते मागविण्यात आली. त्यात चार विषयांना बहुमताने सदस्यांनी मान्यता दिली. उर्वरित काही विषयांवर काहींनी अमान्य, तर काहींनी कोणतेच मत व्यक्त केले नाही. त्यामुळे सर्व विषयांना मंजुरीसाठी १०० टक्के मते मिळाली नाहीत. मात्र, ७५ ते ९९ टक्के मते मिळाल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले.

सदस्यांकडून सभेबाबत नाराजी
चर्चेला वाव न मिळाल्याने, अनेक सदस्यांनी सभेविषयी नाराजी व्यक्त केली. विषय समित्यांच्या सभा सोशल मिडियातून घेण्यात आल्या. तशीच ही सभाही लेखी प्रतिपादन घेऊन सदस्यांना सोशल माध्यमातून मते व्यक्त करण्याची संधी देणे गरजेचे होते. मात्र, तशी संधी उपलब्ध करून न दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

News Item ID: 
820-news_story-1590694038-652
Mobile Device Headline: 
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा; १४ विषय मंजूर
Appearance Status Tags: 
Tajya News
zp_Nagar_1.jpgzp_Nagar_1.jpg
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Ahmednagar ZP sanctions fourteen proposals in meeting
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नगर कोरोना corona जिल्हा परिषद विषय topics पंचायत समिती आरोग्य health पाणी water
Search Functional Tags: 
नगर, कोरोना, Corona, जिल्हा परिषद, विषय, Topics, पंचायत समिती, आरोग्य, Health, पाणी, Water
Twitter Publish: 
Meta Keyword: 
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा; १४ विषय मंजूर
Meta Description: 
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा; १४ विषय मंजूर
कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने नगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा झाली. त्यात एकूण सर्व १४ विषय मंजूर करण्यात आले. त्यातील चार विषयांना १०० टक्के मते मिळाली.Source link

Leave a Comment

X