नांदेड जिल्ह्यात आठवडे बाजार बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नांदेड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अंशतः: लॉकडाऊन लागू केला आहे. यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गुजराण होणाऱ्या आठवडी बाजार बंदीमुळे भाजीपाल्याची मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

जिल्ह्यात मार्च महिना उजडताच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. फेब्रुवारीत खालावलेली संख्या मार्च उजडताच दोन अंकावरील संख्या तीन अंकावर पोचली. दरम्यान ११ मार्च रोजी २५० वर संख्या पोचल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी १२ ते २१ मार्च दरम्यान अंशतः: लॉकडाऊनची घोषणा केली.

यात शहरासह ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारावर संक्रांत आली. यामुळे उन्हाळ्याचे नियोजन करून पिकविलेल्या भाजीपाला उत्पादकांसह फळे पिकविणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजार बंद असल्यामुळे व्यापारी टरबुजाचे दर पाडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नांदेड शहरात महादेव दालमील, इतवारा, पूर्णा रोड अशा तीन ठिकाणी आठवडे बाजार भरतात. यासोबतच शहरातील तरोडा नाका भागात दररोजच भाजीपाला बाजारा भरतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही तालुकास्तरासह महसुल मंडळस्तरीय गावे, मुख्य रस्त्यावरील गावात आठवडी बाजार भरतो. परंतु आठवडी बाजार बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला मिळेल त्या ठिकाणी कमी भावाने विक्री करावा लागत आहे. 

शहरात शुक्रवारी (ता. १२) महादेव दालमील भागात भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना बाजारात बसण्यास मज्जाव केला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. काहींनी कवडीमोल दराने भाजीपाला विक्री करून घर गाठले.

शुक्रवारी बाजार बंद असल्यामुळे ग्राहक मिळाले नाहीत. परिणामी, ६० ते ८० रुपये प्रमाणे विकणारा शेवगा २० रुपये किलो प्रमाणे देवून जावे लागले.
– सदाशिव पाटील, मालेगाव, ता. अर्धापूर.

News Item ID: 
820-news_story-1615811344-awsecm-772
Mobile Device Headline: 
नांदेड जिल्ह्यात आठवडे बाजार बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Appearance Status Tags: 
Tajya News
Weekly market ban in Nanded district has caused huge losses to farmersWeekly market ban in Nanded district has caused huge losses to farmers
Mobile Body: 

नांदेड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अंशतः: लॉकडाऊन लागू केला आहे. यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गुजराण होणाऱ्या आठवडी बाजार बंदीमुळे भाजीपाल्याची मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

जिल्ह्यात मार्च महिना उजडताच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. फेब्रुवारीत खालावलेली संख्या मार्च उजडताच दोन अंकावरील संख्या तीन अंकावर पोचली. दरम्यान ११ मार्च रोजी २५० वर संख्या पोचल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी १२ ते २१ मार्च दरम्यान अंशतः: लॉकडाऊनची घोषणा केली.

यात शहरासह ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारावर संक्रांत आली. यामुळे उन्हाळ्याचे नियोजन करून पिकविलेल्या भाजीपाला उत्पादकांसह फळे पिकविणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजार बंद असल्यामुळे व्यापारी टरबुजाचे दर पाडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नांदेड शहरात महादेव दालमील, इतवारा, पूर्णा रोड अशा तीन ठिकाणी आठवडे बाजार भरतात. यासोबतच शहरातील तरोडा नाका भागात दररोजच भाजीपाला बाजारा भरतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही तालुकास्तरासह महसुल मंडळस्तरीय गावे, मुख्य रस्त्यावरील गावात आठवडी बाजार भरतो. परंतु आठवडी बाजार बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला मिळेल त्या ठिकाणी कमी भावाने विक्री करावा लागत आहे. 

शहरात शुक्रवारी (ता. १२) महादेव दालमील भागात भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना बाजारात बसण्यास मज्जाव केला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. काहींनी कवडीमोल दराने भाजीपाला विक्री करून घर गाठले.

शुक्रवारी बाजार बंद असल्यामुळे ग्राहक मिळाले नाहीत. परिणामी, ६० ते ८० रुपये प्रमाणे विकणारा शेवगा २० रुपये किलो प्रमाणे देवून जावे लागले.
– सदाशिव पाटील, मालेगाव, ता. अर्धापूर.

English Headline: 
agriculture news in marathi Weekly market ban in Nanded district has caused huge losses to farmers
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नांदेड nanded कोरोना corona प्रशासन administrations व्यापार पूर floods भाजीपाला बाजार vegetable market महापालिका
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, कोरोना, Corona, प्रशासन, Administrations, व्यापार, पूर, Floods, भाजीपाला बाजार, Vegetable Market, महापालिका
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Weekly market ban in Nanded district has caused huge losses to farmers
Meta Description: 
Weekly market ban in Nanded district has caused huge losses to farmers
नांदेड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अंशतः: लॉकडाऊन लागू केला आहे.Source link

Leave a Comment

X