नाविन्यपूर्ण योजना 2022 अर्ज सुरु | Navinya Purna Yojana Online Application - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

नाविन्यपूर्ण योजना 2022 अर्ज सुरु | Navinya Purna Yojana Online Application

0
Rate this post

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशनचे डाउनलोड करा  :

AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअर)  application link
navinya purna yojana online application 2021 – असा करा तुमच्या मोबईल वरून अर्ज 

स्टेप १ : वरील अँप डाउनलोड केल्यानंतर ते अँप्लिकेशन उघडा,आणि अर्जदार नोंदणी या ऑपशन वर क्लिक करा.

नाविन्यपूर्ण योजना 2021 अर्ज सुरु | Navinya Purna Yojana Online Application
  • क्लिक केल्या नंतर महत्वाची माहिती दिसते, ते वाचून बंद करा या ऑपशन वर क्लिक करा .

स्टेप २ : क्लीक केल्या नंतर आपल्या समोर अर्ज उघडेल त्यामध्ये आपली वयक्तिक माहिती भरायची आहे . त्यामध्ये तुमचा आधार नंबर ,वय , नाव (इंग्लिश /मराठी ),  मोबाईल नंबर , लिंग, जिल्हा, तालुका . गाव , जात ,दिव्यांग, दारिद्र्य रेषा , शैक्षणिक पात्रता, राशन कार्ड नंबर,

स्टेप ३: अर्जदाराच्या बँकेचा तपशील यामध्ये 

  • बँकेचे नाव
  • खाते क्रमांक
  • IFSC क्रमांक
  • शाखा

स्टेप ४ : अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी 

  • अर्जदाराचा फोटो ८० kb च्या आत अपलोड करा.
  • आणि स्वाक्षरी ४० kb च्या आत अपलोड करा.

स्टेप ५ : अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा

  • अर्जदाराने एकूण कुटूंब संकेतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे राशन कार्ड वर दिल्या प्रमाणे भरवीत.
  • आणि नियम व अटी मला मान्य आहेत या बॉक्स ला टिक करून पुढे चला या बटण वर क्लिक करा.
  • पुढे मी रोबोर्ट नसून मनुष्य आहे हे सिद्ध करण्यासाठी फोटो कॅप्टचा सांगेल त्या फोटो सिलेक्ट करा.
  • त्यानंतर आपली माहिती जतन केली जाईल. माहिती जतन झाल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर आधार कार्ड क्रमांक आणि आपला पासवर्ड येईल.

स्टेप ६ : आलेला पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे .

  • लॉगिन केल्यानंतर परत एकदा आपल्या समोर कॅप्चा कोडे येईल तो भरा . कॅप्चा भरल्या नंतर आपल्याला verify वर क्लिक करा .
  • verify केल्या नंतर लॉगिन होईल आणि आपल्या पुढे आपण भरलेली माहिती येईल जसे कि आपले नाव , मोबाईल नंबर , जात प्रवर्ग ही  माहिती दिसेल .
  • त्याच खाली आपल्याला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा ते निवडायचे आहे. सगळ्या योजनांसाठी एकदाच अर्ज भरू शकता त्यासाठी सगळ्या दिसतील त्या योजनांना टिक करून सिलेक्ट करा.
  • आणि खालील सूचना वाचून बंद करा या बटण वर क्लिक करा.

स्टेप ७ : पुढे आपण सिलेक्ट केलेल्या योजना दाखवल्या जातील , खाली दिलेल्या पुढे चला या बटण वर क्लिक करा. नंतर पुढे तुम्हाला होय /नाही या पद्धतीच्या १० प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. ते प्रश्न वाचून होय /नाही जो बरोबर असेल तो पर्याय सेलेक्ट करून पुढे चला या बटण वर क्लिक करा. अशा प्रकारे पुढील सर्व प्रश्नांची ऊत्तरे द्या .

  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर पुढे चला या ऑपशन वर क्लिक करा.
  • नंतर तुमच्या समोर येईल नियम व अटी वाचून वरील नियम व अटी मला मान्य आहेत याला टिक करून पुढे चला वर क्लिक करा.
  • क्लिक केल्या नंतर आपल्या पुढे आपला भरलेला अर्ज दिसेल त्या फॉर्म वर आपण भरलेली सर्व माहिती दाखवली जाईल. माहिती वाचून बरोबर आहे का याची खात्री करा आणि जर काही बदल करायचे असतील तर आताच बदल करू शकता आणि माहिती बरोबर असेल तर जतन करा या ऑपशन वर क्लिक करा.
  • जतन केल्या नंतर पुढे तुम्हाला मला मान्य आहे या ऑपशन ला टिक करून जतन करा या ऑपशन वर क्लिक करा.
  • जतन वर क्लिक केल्या नंतर आपल्या समोर कॅप्चा कोडे येईल तो verify केल्यानंतर आपला अर्ज save होईल .
  • आता आपण फॉर्म ची प्रिंट काढू शकता. किंवा याबद्दल ची माहिती स्टोअर करून ठेवू शकता.
  • नंतर फॉर्म उघडून पाहण्यासाठी सुरुवातीला दिलेला आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता.

तुमची निवड झाल्या नंतर खाली दिलेली बंध पत्राचे नमुने दिले आहेत ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून आपल्या कागद्पत्रा सोबत देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता


अधिक माहिती साठी

टोल फ्री क्रमांक : १९६२ किंवा १८००-२३३-०४१८

  • योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या टोल फ्री नंबर वर कॉल करा 
  • किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

नाविन्यपूर्ण योजना 2021 अर्ज सुरु | Navinya Purna Yojana Online Application
Share via
Copy link