Take a fresh look at your lifestyle.

नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार संघातर्फे ऑनलाईन चर्चासत्र

0

नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेतर्फे दरवर्षी पुणे, नाशिक, सांगली व सोलापूर असे विभागनिहाय खरड छाटणी चर्चासत्रे आयोजित केली जातात. मात्र, चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चासत्रे आयोजित करणे शक्य नाही. द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन होण्यासाठी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली. 

या चर्चासत्रांत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दोन दिवस झालेल्या या चर्चासत्रांत एकूण ४ सत्रे झाली. पहिल्या दिवशी गुरुवारी (ता.१४) सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी ‘कॅनोपी व्यवस्थापनातून शाश्वत घडनिर्मिती’ यावर, तर दुसऱ्या सत्रात ११.३० ते १२.३० दरम्यान मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय यांनी ‘शाश्वत घडनिर्मितीकरिता अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन केले. 

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.) १५ तिसऱ्या सत्रात सकाळी १० ते ११ दरम्यान वनस्पती शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुजोय सहा यांनी ‘खरड छाटणीनंतरचे रोग व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. अखेरच्या चौथ्या सत्रात ११ ते १२ वाजेदरम्यान किटकशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. यादव यांनी ‘खरड छाटणीनंतरचे कीड व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन केले. 
नाशिकमध्ये

द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्ष शेतीतील विभागनिहाय समस्यांचा आढावा घेऊन त्याबाबतचे प्रश्न व विषय सहभागी तज्ज्ञांना कळविले होते. त्यानुसार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेवटी सहभागी द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली. 

News Item ID: 
820-news_story-1589528381-951
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार संघातर्फे ऑनलाईन चर्चासत्र
Appearance Status Tags: 
Tajya News
नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार संघातर्फे ऑनलाईन चर्चासत्र नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार संघातर्फे ऑनलाईन चर्चासत्र
Mobile Body: 

नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेतर्फे दरवर्षी पुणे, नाशिक, सांगली व सोलापूर असे विभागनिहाय खरड छाटणी चर्चासत्रे आयोजित केली जातात. मात्र, चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चासत्रे आयोजित करणे शक्य नाही. द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन होण्यासाठी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली. 

या चर्चासत्रांत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दोन दिवस झालेल्या या चर्चासत्रांत एकूण ४ सत्रे झाली. पहिल्या दिवशी गुरुवारी (ता.१४) सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी ‘कॅनोपी व्यवस्थापनातून शाश्वत घडनिर्मिती’ यावर, तर दुसऱ्या सत्रात ११.३० ते १२.३० दरम्यान मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय यांनी ‘शाश्वत घडनिर्मितीकरिता अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन केले. 

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.) १५ तिसऱ्या सत्रात सकाळी १० ते ११ दरम्यान वनस्पती शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुजोय सहा यांनी ‘खरड छाटणीनंतरचे रोग व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. अखेरच्या चौथ्या सत्रात ११ ते १२ वाजेदरम्यान किटकशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. यादव यांनी ‘खरड छाटणीनंतरचे कीड व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन केले. 
नाशिकमध्ये

द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्ष शेतीतील विभागनिहाय समस्यांचा आढावा घेऊन त्याबाबतचे प्रश्न व विषय सहभागी तज्ज्ञांना कळविले होते. त्यानुसार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेवटी सहभागी द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली. 

English Headline: 
Agriculture news in marathi Seminar on Facebook Live by the Grape Growers Association in Nashik
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
महाराष्ट्र maharashtra द्राक्ष पुणे सांगली sangli सोलापूर sections कोरोना corona सकाळ शेती farming
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, द्राक्ष, पुणे, सांगली, Sangli, सोलापूर, Sections, कोरोना, Corona, सकाळ, शेती, farming
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Seminar, Facebook, Live, Grape, Growers, Association, Nashik
Meta Description: 
Seminar on Facebook Live by the Grape Growers Association in Nashik
नाशिक : द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन होण्यासाठी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली. Source link

X