नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा अहवाल राज्य शासनास सादर

नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करणाऱ्या ‘गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक’ नदी जोड प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला सादर केला आहे. नाशिक-सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ही योजना राबविण्याचा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी केंद्र व राज्य शासनास सन २०१४ मध्ये सुचवला होता, अशी माहिती जाधव यांनी दिली. 

नाशिकला मोठे औद्योगिक प्रकल्प येण्यासाठी केंद्र शासनाच्या दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात नाशिकचा समावेश होणे आवश्यक होते. मात्र पाणी उपलब्ध नसल्याने ‘दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’च्या पहिल्या टप्यात नाशिकऐवजी औरंगाबादचा समावेश झाला होता. आता या नदी-जोडमधून पाणी उपलब्ध होत असल्याने केंद्र सरकारमार्फत आवश्यक निधी ‘दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’च्या माध्यमातून नाशिक-सिन्नर-इगतपुरीसाठी उपलब्ध होणार आहे. 

सिन्नरच्या दुष्काळी भागास हा प्रकल्प वरदान ठरणार असून, तालुक्याचे एकूण २६२८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच तालुक्याची पिण्याच्या पाण्याची सन २०५१ पर्यंतची गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे. संपूर्ण सिन्नर तालुक्याचा दुष्काळ दूर करणारी ही योजना आहे. या नदी जोड प्रकल्पासाठी गेल्या सात वर्षांपासून ते केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. या प्रकल्पास राज्य सरकारने जुलै २०१७ मध्ये तत्त्वतः मान्यता दिली होती. 

तीन महिन्यांपूर्वी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे पुढाकाराने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक होऊन या प्रकल्पाचा डीपीआर ऑक्टोबर-२०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले होते. त्यानुसार या नदी-जोड प्रकल्पाचा अहवाल पूर्ण झाला असून, या प्रकल्पास एकूण सहा हजार सहाशे चाळीस कोटी इतका खर्च येणार आहे. 

या प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये : 
पाणी उपशासाठी दहा ठिकाणी सौरउर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच सर्व धरणे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट या उच्च तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार आहेत. तसेच मोखाडा तालुक्यास सुद्धा ४५० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार असून, आदिवासी भागाचा सुद्धा विकास होणार आहे.  

News Item ID: 
820-news_story-1638274614-awsecm-760
Mobile Device Headline: 
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा अहवाल राज्य शासनास सादर
Appearance Status Tags: 
Section News
Nashik: Sinnar water project report submitted to state governmentNashik: Sinnar water project report submitted to state government
Mobile Body: 

नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करणाऱ्या ‘गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक’ नदी जोड प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला सादर केला आहे. नाशिक-सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ही योजना राबविण्याचा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी केंद्र व राज्य शासनास सन २०१४ मध्ये सुचवला होता, अशी माहिती जाधव यांनी दिली. 

नाशिकला मोठे औद्योगिक प्रकल्प येण्यासाठी केंद्र शासनाच्या दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात नाशिकचा समावेश होणे आवश्यक होते. मात्र पाणी उपलब्ध नसल्याने ‘दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’च्या पहिल्या टप्यात नाशिकऐवजी औरंगाबादचा समावेश झाला होता. आता या नदी-जोडमधून पाणी उपलब्ध होत असल्याने केंद्र सरकारमार्फत आवश्यक निधी ‘दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’च्या माध्यमातून नाशिक-सिन्नर-इगतपुरीसाठी उपलब्ध होणार आहे. 

सिन्नरच्या दुष्काळी भागास हा प्रकल्प वरदान ठरणार असून, तालुक्याचे एकूण २६२८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच तालुक्याची पिण्याच्या पाण्याची सन २०५१ पर्यंतची गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे. संपूर्ण सिन्नर तालुक्याचा दुष्काळ दूर करणारी ही योजना आहे. या नदी जोड प्रकल्पासाठी गेल्या सात वर्षांपासून ते केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. या प्रकल्पास राज्य सरकारने जुलै २०१७ मध्ये तत्त्वतः मान्यता दिली होती. 

तीन महिन्यांपूर्वी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे पुढाकाराने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक होऊन या प्रकल्पाचा डीपीआर ऑक्टोबर-२०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले होते. त्यानुसार या नदी-जोड प्रकल्पाचा अहवाल पूर्ण झाला असून, या प्रकल्पास एकूण सहा हजार सहाशे चाळीस कोटी इतका खर्च येणार आहे. 

या प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये : 
पाणी उपशासाठी दहा ठिकाणी सौरउर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच सर्व धरणे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट या उच्च तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार आहेत. तसेच मोखाडा तालुक्यास सुद्धा ४५० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार असून, आदिवासी भागाचा सुद्धा विकास होणार आहे.  

English Headline: 
agriclture news in marathi,Nashik: Sinnar water project report submitted to state government
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नाशिक nashik विकास जलसंपदा विभाग विभाग sections सिन्नर sinnar खासदार हेमंत गोडसे hemant godse राजेंद्र जाधव मुंबई mumbai सिंचन दुष्काळ वर्षा varsha आमदार पुढाकार initiatives जयंत पाटील jayant patil सौरउर्जा
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, विकास, जलसंपदा विभाग, विभाग, Sections, सिन्नर, Sinnar, खासदार, हेमंत गोडसे, Hemant Godse, राजेंद्र जाधव, मुंबई, Mumbai, सिंचन, दुष्काळ, वर्षा, Varsha, आमदार, पुढाकार, Initiatives, जयंत पाटील, Jayant Patil, सौरउर्जा
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nashik: Sinnar water project report submitted to state government
Meta Description: 
Nashik: Sinnar water project report submitted to state government
नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करणाऱ्या ‘गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक’ नदी जोड प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला सादर केला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment