Take a fresh look at your lifestyle.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या 

0

नाशिक : जिल्ह्याच्या झालेल्या जोरदार पाऊस झाल्यामुळे यंदा रब्बी पिकांना मोठी चालना मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यानुसार दिवाळीपासून अनेक भागात पेरण्या झाल्याचे दिसून येत आहे. मात्र होणाऱ्या पेरण्यांना अजून अपेक्षित गती आलेली नाही. जिल्ह्यात १ लाख १२ हजार ७२९  हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामातील पिकांचे असते. त्यापैकी मंगळवार (ता. १६) अखेर ७ हजार ७४३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाले आहे. 

कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात अद्याप ७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या पेरण्या टप्प्याटप्प्याने होणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील सिन्नर तालुक्याचा काही भाग वगळता सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे चालू वर्षी रब्बी हंगामातील गहू, मका व हरभरा पिकाच्या पेरण्या अधिक प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पेरण्या कळवण, येवला, सुरगाणा व सिन्नर तालुक्यांत पूर्ण झाल्या आहेत. तर इतर ठिकाणी किरकोळ स्वरूपात पेरण्या पूर्ण झाल्याची स्थिती आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात अद्याप पेरण्या नाहीत. जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड व देवळा तालुक्याच्या काही भागांतील शेतकऱ्यांना पाण्याचा ताण बसत असतो. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी गहू व हरभरा पिकाचे नियोजन करत असतात; मात्र चालू वर्षी दमदार पावसामुळे या भागाचे  पाणीसाठा उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने आता पुन्हा एकदा हंगामाला सामोरे जाऊन शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पिके उभी करावी लागणार आहेत. त्यातच नोव्हेंबर महिन्यात सलग दोन दिवस आपण जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झाल्याने पेरण्या लांबणीवर जाणार आहेत. अशा भागात वाफसा अवस्थेनंतरच पेरण्या होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

गळीत धान्य आकडे शेतकऱ्यांची पाठ 
एकेवेळी  जिल्ह्यात सूर्यफुलाचे क्षेत्र अधिक होते, तर शेतकरी आपल्या उपलब्ध क्षेत्राप्रमाणे थोड्याफार प्रमाणात का होईना तेलबिया पिके घ्यायचे. मात्र उत्पादकता नसल्या कारणाने व दर्जेदार बियाणे उपलब्ध होत नसल्याने आता शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवल्याने चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या या पिकांपैकी थोड्याफार प्रमाणात सूर्यफूल होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तेही प्रमाण नगण्य असल्याने हे पीक असून नसल्यासारखेच आहेत. तर जवस, तीळ या पिकांचा पॅटर्न नसल्यासारखाच उरला आहे. 

News Item ID: 
820-news_story-1637324252-awsecm-795
Mobile Device Headline: 
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या 
Appearance Status Tags: 
Section News
Rabbi sowing in 7000 areas in the district till nowRabbi sowing in 7000 areas in the district till now
Mobile Body: 

नाशिक : जिल्ह्याच्या झालेल्या जोरदार पाऊस झाल्यामुळे यंदा रब्बी पिकांना मोठी चालना मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यानुसार दिवाळीपासून अनेक भागात पेरण्या झाल्याचे दिसून येत आहे. मात्र होणाऱ्या पेरण्यांना अजून अपेक्षित गती आलेली नाही. जिल्ह्यात १ लाख १२ हजार ७२९  हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामातील पिकांचे असते. त्यापैकी मंगळवार (ता. १६) अखेर ७ हजार ७४३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाले आहे. 

कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात अद्याप ७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या पेरण्या टप्प्याटप्प्याने होणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील सिन्नर तालुक्याचा काही भाग वगळता सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे चालू वर्षी रब्बी हंगामातील गहू, मका व हरभरा पिकाच्या पेरण्या अधिक प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पेरण्या कळवण, येवला, सुरगाणा व सिन्नर तालुक्यांत पूर्ण झाल्या आहेत. तर इतर ठिकाणी किरकोळ स्वरूपात पेरण्या पूर्ण झाल्याची स्थिती आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात अद्याप पेरण्या नाहीत. जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड व देवळा तालुक्याच्या काही भागांतील शेतकऱ्यांना पाण्याचा ताण बसत असतो. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी गहू व हरभरा पिकाचे नियोजन करत असतात; मात्र चालू वर्षी दमदार पावसामुळे या भागाचे  पाणीसाठा उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने आता पुन्हा एकदा हंगामाला सामोरे जाऊन शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पिके उभी करावी लागणार आहेत. त्यातच नोव्हेंबर महिन्यात सलग दोन दिवस आपण जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झाल्याने पेरण्या लांबणीवर जाणार आहेत. अशा भागात वाफसा अवस्थेनंतरच पेरण्या होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

गळीत धान्य आकडे शेतकऱ्यांची पाठ 
एकेवेळी  जिल्ह्यात सूर्यफुलाचे क्षेत्र अधिक होते, तर शेतकरी आपल्या उपलब्ध क्षेत्राप्रमाणे थोड्याफार प्रमाणात का होईना तेलबिया पिके घ्यायचे. मात्र उत्पादकता नसल्या कारणाने व दर्जेदार बियाणे उपलब्ध होत नसल्याने आता शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवल्याने चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या या पिकांपैकी थोड्याफार प्रमाणात सूर्यफूल होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तेही प्रमाण नगण्य असल्याने हे पीक असून नसल्यासारखेच आहेत. तर जवस, तीळ या पिकांचा पॅटर्न नसल्यासारखाच उरला आहे. 

English Headline: 
agriclture news in marathi,Rabbi sowing in 7000 areas in the district till now
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
ऊस पाऊस दिवाळी रब्बी हंगाम कृषी विभाग agriculture department विभाग sections सिन्नर sinnar गहू wheat त्र्यंबकेश्‍वर पाणी water खरीप मात mate अतिवृष्टी तेलबिया पिके oilseed crops
Search Functional Tags: 
ऊस, पाऊस, दिवाळी, रब्बी हंगाम, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, सिन्नर, Sinnar, गहू, wheat, त्र्यंबकेश्‍वर, पाणी, Water, खरीप, मात, mate, अतिवृष्टी, तेलबिया पिके, Oilseed Crops
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rabbi sowing in 7000 areas in the district till now
Meta Description: 
Rabbi sowing in 7000 areas in the district till now
नाशिक : जिल्ह्याच्या झालेल्या जोरदार पाऊस झाल्यामुळे यंदा रब्बी पिकांना मोठी चालना मिळणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात १ लाख १२ हजार ७२९  हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामातील पिकांचे असते. त्यापैकी मंगळवार (ता. १६) अखेर ७ हजार ७४३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाले आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X