नाशिक जिल्ह्यात हलक्या सरींमुळे शेतकऱ्यांची तारांबळ

नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी (ता.११) दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्री येवला तालुक्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे गहू व कांदा उत्पादकांची तारांबळ उडाली.

सध्या गहू, लेट खरीप व द्राक्ष काढणी हंगामाच्या कामकाजात गती आली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी गहू सोंगणी, कांदा काढणी केली आहे. त्यांची शेतीमाल झाकण्यासाठी धावपळ उडाली.  

जिल्ह्याच्या अनेक भागात गुरुवारी ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. सध्या गहू व हरभरा काढणीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचा गहू काढणी बाकी आहे. त्यांनी शुक्रवारी (ता.१२) सकाळी लवकरपासून काढणीसाठी एकच घाई केल्याचे दिसून आले. पाऊस झाल्यास नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काढणीसाठी लगबग केली आहे.

जिल्ह्याच्या कांदा उत्पादक पट्ट्यात सध्या लेट खरिपासह उन्हाळ कांदा काढणीच्या कामांना गती आली आहे. त्यातच येवला तालुक्यातील पूर्व भागात गुरूवारीरात्री ९ वाजेदरम्यान सायगाव, अंगुलगाव, अंदरसुल, नगरसुल परिसरात तुरळक थेंब सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. काढलेले कांदे जमा करून प्लास्टिक कागद टाकून झाकवून ठेवावे लागले. 

येवला, मालेगाव तालुक्यात देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण व काही अंशी अवकाळी पाऊस अडचणीचा ठरतो की काय? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. मालेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गाळणे, डोंगराळे, करंजगव्हाण परिसरात तुरळक थेंब पडले आहेत. सध्या पाऊस कमी असला तरी भीतीचे सावट कायम आहे. नाशिक तालुक्यातही काही भागात तुरळक थेंब पडले. चांदवड, सटाणा ढगाळ वातावरण होते,मात्र पाऊस झालेला नाही. 

द्राक्ष उत्पादक चिंतेत

शेतकऱ्यांनी खर्च करून पिकांचे नियोजन केले. त्यातच अतिवृष्टी, अवकाळी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच सध्या दरात मोठी घसरण आहे. मात्र पुन्हा पावसाचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. 
 
News Item ID: 
820-news_story-1615552467-awsecm-345
Mobile Device Headline: 
नाशिक जिल्ह्यात हलक्या सरींमुळे शेतकऱ्यांची तारांबळ
Appearance Status Tags: 
Tajya News
Farmers in Nashik district suffering due to light rainsFarmers in Nashik district suffering due to light rains
Mobile Body: 

नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी (ता.११) दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्री येवला तालुक्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे गहू व कांदा उत्पादकांची तारांबळ उडाली.

सध्या गहू, लेट खरीप व द्राक्ष काढणी हंगामाच्या कामकाजात गती आली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी गहू सोंगणी, कांदा काढणी केली आहे. त्यांची शेतीमाल झाकण्यासाठी धावपळ उडाली.  

जिल्ह्याच्या अनेक भागात गुरुवारी ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. सध्या गहू व हरभरा काढणीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचा गहू काढणी बाकी आहे. त्यांनी शुक्रवारी (ता.१२) सकाळी लवकरपासून काढणीसाठी एकच घाई केल्याचे दिसून आले. पाऊस झाल्यास नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काढणीसाठी लगबग केली आहे.

जिल्ह्याच्या कांदा उत्पादक पट्ट्यात सध्या लेट खरिपासह उन्हाळ कांदा काढणीच्या कामांना गती आली आहे. त्यातच येवला तालुक्यातील पूर्व भागात गुरूवारीरात्री ९ वाजेदरम्यान सायगाव, अंगुलगाव, अंदरसुल, नगरसुल परिसरात तुरळक थेंब सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. काढलेले कांदे जमा करून प्लास्टिक कागद टाकून झाकवून ठेवावे लागले. 

येवला, मालेगाव तालुक्यात देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण व काही अंशी अवकाळी पाऊस अडचणीचा ठरतो की काय? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. मालेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गाळणे, डोंगराळे, करंजगव्हाण परिसरात तुरळक थेंब पडले आहेत. सध्या पाऊस कमी असला तरी भीतीचे सावट कायम आहे. नाशिक तालुक्यातही काही भागात तुरळक थेंब पडले. चांदवड, सटाणा ढगाळ वातावरण होते,मात्र पाऊस झालेला नाही. 

द्राक्ष उत्पादक चिंतेत

शेतकऱ्यांनी खर्च करून पिकांचे नियोजन केले. त्यातच अतिवृष्टी, अवकाळी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच सध्या दरात मोठी घसरण आहे. मात्र पुन्हा पावसाचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. 
 
English Headline: 
agriculture news in marathi Farmers in Nashik district suffering due to light rains
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नाशिक nashik गहू wheat खरीप द्राक्ष मका maize शेती farming सकाळ ऊस पाऊस प्लास्टिक मालेगाव malegaon अवकाळी पाऊस
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, गहू, wheat, खरीप, द्राक्ष, मका, Maize, शेती, farming, सकाळ, ऊस, पाऊस, प्लास्टिक, मालेगाव, Malegaon, अवकाळी पाऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmers in Nashik district suffering due to light rains
Meta Description: 
Farmers in Nashik district suffering due to light rains
नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी (ता.११) दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.Source link

Leave a Comment

X