नाशिक : रब्बी हंगामातील पिकांची पीक स्पर्धा जाहीर 

नाशिक : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीच्या कार्य पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे. 

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांच्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान १० आर हेक्टर सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 

पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्‍चित केला असून, ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र एक हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक, तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. भाग घेण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी, प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. 

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हा व राज्य पातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असल्याने त्यासाठी एकदाच ३०० रुपये प्रति शेतकरी, प्रति पीक प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून असलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. पारितोषिकांच्या रकमेमध्ये देखील भरीव वाढ करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. 

राज्यांतर्गत विविध पिकांच्या पीक स्पर्धा रब्बी हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले अर्ज विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तंत्रअधिकारी गोकूळ अहिरे यांनी केले आहे. 

News Item ID: 
820-news_story-1641032641-awsecm-846
Mobile Device Headline: 
नाशिक : रब्बी हंगामातील पिकांची पीक स्पर्धा जाहीर 
Appearance Status Tags: 
Section News
Rabbi season crop competition announcedRabbi season crop competition announced
Mobile Body: 

नाशिक : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीच्या कार्य पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे. 

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांच्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान १० आर हेक्टर सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 

पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्‍चित केला असून, ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र एक हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक, तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. भाग घेण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी, प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. 

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हा व राज्य पातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असल्याने त्यासाठी एकदाच ३०० रुपये प्रति शेतकरी, प्रति पीक प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून असलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. पारितोषिकांच्या रकमेमध्ये देखील भरीव वाढ करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. 

राज्यांतर्गत विविध पिकांच्या पीक स्पर्धा रब्बी हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले अर्ज विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तंत्रअधिकारी गोकूळ अहिरे यांनी केले आहे. 

English Headline: 
agriclture news in marathi,Rabbi season crop competition announced
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
विभाग sections रब्बी हंगाम गहू wheat स्पर्धा day
Search Functional Tags: 
विभाग, Sections, रब्बी हंगाम, गहू, wheat, स्पर्धा, Day
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rabbi season crop competition announced
Meta Description: 
Rabbi season crop competition announced
नाशिक : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीच्या कार्य पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment