निफाडमध्ये थकीत ऊसबिलासाठी ‘स्वाभिमानी’चे धरणे

नाशिक : निफाडमध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी के. जी. एस कारखान्याला दिलेल्या उसाचे बिल अद्याप दिलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, या साठी  दिवाळीपूर्वी बिल द्यावे, अशी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. निफाडचे प्रांत अधिकारी व तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

तालुक्यातील केजीएससह रानवड कारखाना चालविण्यास घेतलेल्या वैद्यनाथ सह. साखर कारखान्याने शेतकरी व कामगारांचे बिल अद्याप दिलेले नाही. शुगर एक्सपोर्टचे पेमेंट मिळाल्यावर तत्काळ पेमेंट देऊ, असे आश्वासन कारखान्याच्या अध्यक्ष पंकजा मुंडे यांनी दिले. शुगर एक्सपोर्टचे पैसे मिळून सुद्धा अद्याप पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे कामगारांची व शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

आंदोलनावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बोराडे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब तासकर, रासाका कामगार युनियनचे बळवंतराव जाधव, शिवराम रसाळ यासह शेतकरी, साखर कारखाना कामगार उपस्थित होते. 

न्यायालयाने नेमलेल्या साखर आयुक्तालयाच्या प्रतिनिधींशी बोलणे झाल्यानंतर पुढील ३० दिवसात पेमेंट अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी भाजपचे युवा नेते यतीन कदम यांनी आंदोलकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यातील राजकीय नेते हे साखर कारखानदार आहेत. त्यांच्याकडे शेतकरी व कामगाराचे पैसे दिलेले नाहीत. राजकीय घटकांनी आंदोलन करून बेगडीपणा करू नये, अगोदर पैसे द्या, नंतर आंदोलन करा. 
– सोमनाथ बोराडे, सदस्य, राज्य कार्यकारिणी सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना. 
 
News Item ID: 
820-news_story-1635428950-awsecm-841
Mobile Device Headline: 
निफाडमध्ये थकीत ऊसबिलासाठी ‘स्वाभिमानी’चे धरणे
Appearance Status Tags: 
Section News
For tired usbila Holding on to ‘Swabhimani’For tired usbila Holding on to ‘Swabhimani’
Mobile Body: 

नाशिक : निफाडमध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी के. जी. एस कारखान्याला दिलेल्या उसाचे बिल अद्याप दिलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, या साठी  दिवाळीपूर्वी बिल द्यावे, अशी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. निफाडचे प्रांत अधिकारी व तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

तालुक्यातील केजीएससह रानवड कारखाना चालविण्यास घेतलेल्या वैद्यनाथ सह. साखर कारखान्याने शेतकरी व कामगारांचे बिल अद्याप दिलेले नाही. शुगर एक्सपोर्टचे पेमेंट मिळाल्यावर तत्काळ पेमेंट देऊ, असे आश्वासन कारखान्याच्या अध्यक्ष पंकजा मुंडे यांनी दिले. शुगर एक्सपोर्टचे पैसे मिळून सुद्धा अद्याप पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे कामगारांची व शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

आंदोलनावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बोराडे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब तासकर, रासाका कामगार युनियनचे बळवंतराव जाधव, शिवराम रसाळ यासह शेतकरी, साखर कारखाना कामगार उपस्थित होते. 

न्यायालयाने नेमलेल्या साखर आयुक्तालयाच्या प्रतिनिधींशी बोलणे झाल्यानंतर पुढील ३० दिवसात पेमेंट अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी भाजपचे युवा नेते यतीन कदम यांनी आंदोलकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यातील राजकीय नेते हे साखर कारखानदार आहेत. त्यांच्याकडे शेतकरी व कामगाराचे पैसे दिलेले नाहीत. राजकीय घटकांनी आंदोलन करून बेगडीपणा करू नये, अगोदर पैसे द्या, नंतर आंदोलन करा. 
– सोमनाथ बोराडे, सदस्य, राज्य कार्यकारिणी सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना. 
 
English Headline: 
Agriculture news in marathi, For tired usbila Holding on to ‘Swabhimani’
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
ऊस दिवाळी आंदोलन agitation साखर पंकजा मुंडे pankaja munde
Search Functional Tags: 
ऊस, दिवाळी, आंदोलन, agitation, साखर, पंकजा मुंडे, Pankaja Munde
Twitter Publish: 
Meta Keyword: 
For tired usbila Holding on to ‘Swabhimani’
Meta Description: 
For tired usbila Holding on to ‘Swabhimani’
नाशिक : निफाडमध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी के. जी. एस कारखान्याला दिलेल्या उसाचे बिल अद्याप दिलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, या साठी  दिवाळीपूर्वी बिल द्यावे, अशी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X