निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातक्षम फळनिर्मिती हा पर्याय आहे. मात्र त्यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन सुधारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन दया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

वनामती येथील सभागृहात विदर्भ निर्यातक्षम संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, केळी, उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. आमदार गिरीश व्यास, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी, वनामतीचे अतिरिक्‍त संचालक डॉ. उदय पाटील, अर्चना कडू, आयोजक तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्‍वर वानखडे, डॉ. डी. एम. पंचभाई, केळी तज्ज्ञ के. बी. पाटील, डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. विलास तांबे या वेळी उपस्थित होते. 

मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत लाख रुपयांचे उत्पन्न होते म्हणून फळांच्या दर्जाकडे दुर्लक्ष होते. मात्र एखाद्या हंगामात मागणी नसल्यास दरात मोठी घसरण होते. अशावेळी उत्पादन खर्चही निघत नाही; परिणामी नुकसान सोसावे लागते. असे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फळांचा दर्जा राखण्यात सातत्य ठेवले पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड न केल्यास हंगामात स्थानिकस्तरावर दर कमी असतील अशावेळी देशाच्या इतर राज्यात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करून जादा दर मिळविणे शक्‍य होईल. त्याकरिता तज्ज्ञांनी संपर्क वाढवावा, तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावरील फळ उत्पादनक्षेत्रातील घडामोडींची माहिती विविध माध्यमांतून आत्मसात करावी.’’ 

डॉ. मायी यांनी देखील क्वांटिटी ऐवजी क्वालिटीवर लक्ष्य देण्याचे आवाहन केले. या वेळी रमेश जिचकार, मनोज जवंजाळ, प्रवीण ठाकरे यांच्यासह फळ उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. 
 
News Item ID: 
820-news_story-1636480807-awsecm-543
Mobile Device Headline: 
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Appearance Status Tags: 
Tajya News
मनोज जवंजाळ यांचा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. मनोज जवंजाळ यांचा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
Mobile Body: 

नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातक्षम फळनिर्मिती हा पर्याय आहे. मात्र त्यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन सुधारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन दया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

वनामती येथील सभागृहात विदर्भ निर्यातक्षम संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, केळी, उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. आमदार गिरीश व्यास, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी, वनामतीचे अतिरिक्‍त संचालक डॉ. उदय पाटील, अर्चना कडू, आयोजक तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्‍वर वानखडे, डॉ. डी. एम. पंचभाई, केळी तज्ज्ञ के. बी. पाटील, डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. विलास तांबे या वेळी उपस्थित होते. 

मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत लाख रुपयांचे उत्पन्न होते म्हणून फळांच्या दर्जाकडे दुर्लक्ष होते. मात्र एखाद्या हंगामात मागणी नसल्यास दरात मोठी घसरण होते. अशावेळी उत्पादन खर्चही निघत नाही; परिणामी नुकसान सोसावे लागते. असे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फळांचा दर्जा राखण्यात सातत्य ठेवले पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड न केल्यास हंगामात स्थानिकस्तरावर दर कमी असतील अशावेळी देशाच्या इतर राज्यात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करून जादा दर मिळविणे शक्‍य होईल. त्याकरिता तज्ज्ञांनी संपर्क वाढवावा, तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावरील फळ उत्पादनक्षेत्रातील घडामोडींची माहिती विविध माध्यमांतून आत्मसात करावी.’’ 

डॉ. मायी यांनी देखील क्वांटिटी ऐवजी क्वालिटीवर लक्ष्य देण्याचे आवाहन केले. या वेळी रमेश जिचकार, मनोज जवंजाळ, प्रवीण ठाकरे यांच्यासह फळ उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. 
 
English Headline: 
agriculture news in marathi The economic well-being of the farmers depends on the production of exportable fruits
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नागपूर nagpur वन forest नितीन गडकरी nitin gadkari विदर्भ vidarbha लिंबू lemon सीताफळ custard apple आमदार गिरीश व्यास girish vyas कृषी विद्यापीठ agriculture university उत्पन्न
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, वन, forest, नितीन गडकरी, Nitin Gadkari, विदर्भ, Vidarbha, लिंबू, Lemon, सीताफळ, Custard Apple, आमदार, गिरीश व्यास, Girish Vyas, कृषी विद्यापीठ, Agriculture University, उत्पन्न
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The economic well-being of the farmers depends on the production of exportable fruits
Meta Description: 
The economic well-being of the farmers depends on the production of exportable fruits
नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातक्षम फळनिर्मिती हा पर्याय आहे. मात्र त्यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन सुधारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन दया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X