निवडणुकीत होणार महाविकास आघाडी?

सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बॅंक निवडणुकीतही महाविकास आघाडी झाल्याचे चित्र दिसेल का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात राज्यभर सत्ता संघर्ष पेटला आहे. एकमेकांवर टीकेच्या फैरी सुरू आहेत. कार्यकर्ते समाज माध्यमांवरून खुन्नस देत आहेत. मात्र जिल्ह्यातील नेतेमंडळी मात्र फारसे एकमेकाला अंगावर न घेता कलाकलाने राजकारण करताना दिसतात. मात्र आता निवडणूकच असल्याने लुटूपुटूची का असेना लढाईची भाषा करावी लागत आहे. जिल्हा बॅंकेचे नेतृत्व जयंतरावांकडे आहे. राज्यात सत्ता बदलली तरी इथे सर्वपक्षीय ‘कारभार’ सुरूच होता.

आता ही निवडणूक बिनविरोध करून बॅंकेवरील पकड मजबूत करण्याच्या ते तयारीत होते. त्यासाठी त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही बनवला होता. मात्र आता राज्यातील वातावरण चिघळल्याने इथे काय करावे? असा त्यांच्यासमोर पेच आहे. नेहमीप्रमाणे ‘आर्थिक संस्थेत राजकारण नको’ अशी ढाल पुढे करीत हा संघर्ष टाळण्याचा त्यांचा पवित्रा होता. येथील भाजप नेहमीच ‘जयंत जनता पार्टी’ म्हणजेच ‘जेजेपी’ असायची. मात्र आता भाजपमधील एक गट जयंत पाटील यांच्या समवेत जाण्यास तयार आहे आणि एका गटाने अजून भूमिका जाहीर केलेली नाही. 

 जयंतराव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाच्या धोरणाचाच भाग असणार आहे. राज्यभर स्वतंत्रपणे पक्ष वाढीसाठी ते दौरे करीत आहेत. त्यामुळे येथेही त्यांना भाजप नेत्यांसोबतचे सख्य विसरून लढावे लागेल, असे संकेत आहेत. हा पेच जसा जयंतरावांसमोर आहे तसाच येथील भाजप नेत्यांसमोरही आहे. त्यांना वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानून महाविकास आघाडीशी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मौनात असलेल्या नेत्यांना येत्या आठवडाभरात वाचा फुटण्याची शक्यता आहे. अर्थात ते एकमेकांची उणी-दुणी कशी काढणार हा पेच आहेच कारण जे काही झाले आहे, त्याची सामुहिक जबाबदारी सर्वांवरच आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत फटाके फुटतील.

News Item ID: 
820-news_story-1635168354-awsecm-537
Mobile Device Headline: 
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी?
Appearance Status Tags: 
Section News
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? Will Mahavikas lead in elections?निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? Will Mahavikas lead in elections?
Mobile Body: 

सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बॅंक निवडणुकीतही महाविकास आघाडी झाल्याचे चित्र दिसेल का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात राज्यभर सत्ता संघर्ष पेटला आहे. एकमेकांवर टीकेच्या फैरी सुरू आहेत. कार्यकर्ते समाज माध्यमांवरून खुन्नस देत आहेत. मात्र जिल्ह्यातील नेतेमंडळी मात्र फारसे एकमेकाला अंगावर न घेता कलाकलाने राजकारण करताना दिसतात. मात्र आता निवडणूकच असल्याने लुटूपुटूची का असेना लढाईची भाषा करावी लागत आहे. जिल्हा बॅंकेचे नेतृत्व जयंतरावांकडे आहे. राज्यात सत्ता बदलली तरी इथे सर्वपक्षीय ‘कारभार’ सुरूच होता.

आता ही निवडणूक बिनविरोध करून बॅंकेवरील पकड मजबूत करण्याच्या ते तयारीत होते. त्यासाठी त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही बनवला होता. मात्र आता राज्यातील वातावरण चिघळल्याने इथे काय करावे? असा त्यांच्यासमोर पेच आहे. नेहमीप्रमाणे ‘आर्थिक संस्थेत राजकारण नको’ अशी ढाल पुढे करीत हा संघर्ष टाळण्याचा त्यांचा पवित्रा होता. येथील भाजप नेहमीच ‘जयंत जनता पार्टी’ म्हणजेच ‘जेजेपी’ असायची. मात्र आता भाजपमधील एक गट जयंत पाटील यांच्या समवेत जाण्यास तयार आहे आणि एका गटाने अजून भूमिका जाहीर केलेली नाही. 

 जयंतराव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाच्या धोरणाचाच भाग असणार आहे. राज्यभर स्वतंत्रपणे पक्ष वाढीसाठी ते दौरे करीत आहेत. त्यामुळे येथेही त्यांना भाजप नेत्यांसोबतचे सख्य विसरून लढावे लागेल, असे संकेत आहेत. हा पेच जसा जयंतरावांसमोर आहे तसाच येथील भाजप नेत्यांसमोरही आहे. त्यांना वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानून महाविकास आघाडीशी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मौनात असलेल्या नेत्यांना येत्या आठवडाभरात वाचा फुटण्याची शक्यता आहे. अर्थात ते एकमेकांची उणी-दुणी कशी काढणार हा पेच आहेच कारण जे काही झाले आहे, त्याची सामुहिक जबाबदारी सर्वांवरच आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत फटाके फुटतील.

English Headline: 
Agriculture News in Marathi Will Mahavikas lead in elections?
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सांगली sangli काँग्रेस indian national congress राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party सरकार government विकास भाजप कला राजकारण politics निवडणूक जयंत पाटील jayant patil दिवाळी
Search Functional Tags: 
सांगली, Sangli, काँग्रेस, Indian National Congress, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, सरकार, Government, विकास, भाजप, कला, राजकारण, Politics, निवडणूक, जयंत पाटील, Jayant Patil, दिवाळी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Will Mahavikas lead in elections?
Meta Description: 
Will Mahavikas lead in elections?
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बॅंक निवडणुकीतही महाविकास आघाडी झाल्याचे चित्र दिसेल का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X