‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक किनारपट्टीला धडकले !

पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ दुपारी किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडत आहे. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रुप धारण केले आहे. किनारपट्टीलगत वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढल्याने झाडे उन्मळून, मोडून पडली. जमीनीवर येताच या वादळाचा वेग कमी होत जाणार आहे. वादळाच्या पार्श्र्वभुमीवर किनाऱ्यालगतची गावे, सखल भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.   
 
महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मंगळवारी (ता.२) दुपारी चक्रीवादळाची निर्मिती झाली. बधवारी (ता.३) पहाटेपासून वादळाची तीव्रता आणखी वाढली. ही वादळी प्रणाली वेगाने महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे झेपावत असल्याने सकाळपासूनच समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या. कोकणासह घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला सुरवात झाली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वादळाचे केंद्र अलिबागपासून ६० किलोमीटर, मुंबईपासून ११० किलोमीटर, तर गुजरातच्या सुरतपासून ४१५ किलोमीटर नैर्ऋत्येला असले तरी केंद्राबाहेरील ढगांची भिंत जमीनीवर आली आहे. तासभरात वादळ जमीनीवर उतरणार असून, पुढील तीन तासांमध्ये हे वादळ मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पाचेल. हे वादळ रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यावरून, उत्तर महाराष्ट्र, मध्यप्रदेशकडे जाणार आहे. दरम्यान पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातही सकाळपासूनच वादळाचा प्रभाव वाढू लागला आहे.

News Item ID: 
820-news_story-1591170278-744
Mobile Device Headline: 
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक किनारपट्टीला धडकले !
Appearance Status Tags: 
Mukhya News
‘निसर्ग’चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले‘निसर्ग’चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले
Mobile Body: 

पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ दुपारी किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडत आहे. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रुप धारण केले आहे. किनारपट्टीलगत वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढल्याने झाडे उन्मळून, मोडून पडली. जमीनीवर येताच या वादळाचा वेग कमी होत जाणार आहे. वादळाच्या पार्श्र्वभुमीवर किनाऱ्यालगतची गावे, सखल भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.   
 
महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मंगळवारी (ता.२) दुपारी चक्रीवादळाची निर्मिती झाली. बधवारी (ता.३) पहाटेपासून वादळाची तीव्रता आणखी वाढली. ही वादळी प्रणाली वेगाने महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे झेपावत असल्याने सकाळपासूनच समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या. कोकणासह घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला सुरवात झाली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वादळाचे केंद्र अलिबागपासून ६० किलोमीटर, मुंबईपासून ११० किलोमीटर, तर गुजरातच्या सुरतपासून ४१५ किलोमीटर नैर्ऋत्येला असले तरी केंद्राबाहेरील ढगांची भिंत जमीनीवर आली आहे. तासभरात वादळ जमीनीवर उतरणार असून, पुढील तीन तासांमध्ये हे वादळ मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पाचेल. हे वादळ रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यावरून, उत्तर महाराष्ट्र, मध्यप्रदेशकडे जाणार आहे. दरम्यान पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातही सकाळपासूनच वादळाचा प्रभाव वाढू लागला आहे.

English Headline: 
agriculture news in marathi Nisarga Cyclone landfalls near alibagh and Shrivardhan Shore
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे अरबी समुद्र समुद्र महाराष्ट्र maharashtra निसर्ग अलिबाग किनारपट्टी ऊस पाऊस स्थलांतर कोकण konkan मुंबई mumbai ठाणे रायगड पालघर palghar नगर नाशिक nashik प्रशासन administrations
Search Functional Tags: 
पुणे, अरबी समुद्र, समुद्र, महाराष्ट्र, Maharashtra, निसर्ग, अलिबाग, किनारपट्टी, ऊस, पाऊस, स्थलांतर, कोकण, Konkan, मुंबई, Mumbai, ठाणे, रायगड, पालघर, Palghar, नगर, नाशिक, Nashik, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nisarga Cyclone landfalls near alibagh and Shrivardhan Shore
Meta Description: 
Nisarga Cyclone landfalls near alibagh and Shrivardhan Shore
अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ दुपारी किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडत आहे.Source link

Leave a Comment

X