पंचनाम्यानुसार भरपाईची रक्कम जमा होणार ः भुसे

जालना : ‘‘पंचनाम्याची माहिती शासनास जशा प्रमाणात प्राप्त होईल, त्याप्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल,’’ अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, भाऊसाहेब घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे आदी उपस्थित होते. 

भुसे म्हणाले, ‘‘शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. शेतीपिकांच्या नुकसानीच्या मदतीपोटी जिरायतसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर, बागायतसाठी १५ हजार रुपये, तर फळबागांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर देण्याचा शासनाने निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यांत ३५० कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार ६०० कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.’’ 

‘‘जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. येणाऱ्या काळात सामूहिक शेततळे योजनेस प्रोत्साहन देण्यात येईल. मनरेगाद्वारे अस्तरीकरणाचा प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल. शेतकऱ्यांना लागवडीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जिल्ह्यात शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीककर्ज मिळाले, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांचा आढावा घ्यावा,’’ असेही भुसे म्हणाले. बांधावर खतेवाटप अभियानाचा प्रारंभ हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. 
 
News Item ID: 
820-news_story-1635249146-awsecm-204
Mobile Device Headline: 
पंचनाम्यानुसार भरपाईची रक्कम जमा होणार ः भुसे
Appearance Status Tags: 
Section News
Compensation amount will be collected as per Punchnama: Bhuse Compensation amount will be collected as per Punchnama: Bhuse
Mobile Body: 

जालना : ‘‘पंचनाम्याची माहिती शासनास जशा प्रमाणात प्राप्त होईल, त्याप्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल,’’ अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, भाऊसाहेब घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे आदी उपस्थित होते. 

भुसे म्हणाले, ‘‘शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. शेतीपिकांच्या नुकसानीच्या मदतीपोटी जिरायतसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर, बागायतसाठी १५ हजार रुपये, तर फळबागांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर देण्याचा शासनाने निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यांत ३५० कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार ६०० कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.’’ 

‘‘जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. येणाऱ्या काळात सामूहिक शेततळे योजनेस प्रोत्साहन देण्यात येईल. मनरेगाद्वारे अस्तरीकरणाचा प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल. शेतकऱ्यांना लागवडीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जिल्ह्यात शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीककर्ज मिळाले, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांचा आढावा घ्यावा,’’ असेही भुसे म्हणाले. बांधावर खतेवाटप अभियानाचा प्रारंभ हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. 
 
English Headline: 
Agriculture news in marathi, Compensation amount will be collected as per Punchnama: Bhuse
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
दादा भुसे dada bhuse जिल्हाधिकारी कार्यालय आमदार विजय victory ऊस शेती farming फळबाग horticulture दिवाळी वन forest शेततळे farm pond पीककर्ज
Search Functional Tags: 
दादा भुसे, Dada Bhuse, जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार, विजय, victory, ऊस, शेती, farming, फळबाग, Horticulture, दिवाळी, वन, forest, शेततळे, Farm Pond, पीककर्ज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Compensation amount will be collected as per Punchnama: Bhuse
Meta Description: 
Compensation amount will be collected as per Punchnama: Bhuse
जालना : ‘‘पंचनाम्याची माहिती शासनास जशा प्रमाणात प्राप्त होईल, त्याप्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल,’’ अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X