पंढरपुरात आज कार्तिकीचा सोहळा 

सोलापूर : कोरोनामुळे गत सुमारे वीस महिन्यांच्या कालावधीत आलेल्या आषाढी आणि कार्तिकी वारी रद्द झाल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा प्रथमच सोमवारी (ता. १५) कार्तिकी वारीचा सोहळा होणार आहे. परंपरेप्रमाणे सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. 

यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे. पण तुलनेने वारकऱ्यांची संख्या कमीच आहे. बऱ्याच कालावधीनंतर पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. चंद्रभागा नदीसह शहरातील विविध धर्मशाळा, मठ आणि मंदिरांमध्ये टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू आहे. काही ठिकाणी कीर्तने आणि प्रवचनेही सुरू आहेत. आज एकादशीच्या आदल्या दिवशीचे दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने पहाटेपासूनच चंद्रभागातिरी वारकऱ्यांची रीघ दिसून आली. त्या शिवाय मंदिर आणि परिसरासह प्रदक्षिणा मार्गावरही वारकऱ्यांचा अखंड नामघोष सुरू आहे. 

तासाला अडीच हजार वारकऱ्यांना मिळणार दर्शन 
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पारंपरिक पदस्पर्श दर्शन कोरोनामुळे बंद करण्यात आलेले आहे. जवळपास ४० फूट अंतरावरून देवाचे मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनाची रांग वेगाने पुढे सरकत आहे. सध्या मंदिरात प्रतितासाला अडीच हजारांपर्यंत वारकरी दर्शन घेत आहेत. सध्या २१ तास दर्शन सुरू असून, नित्योपचार करण्यासाठी सुमारे तीन तास दर्शन बंद राहते आहे. 

एसटीच्या बंदचा परिणाम 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सर्वाधिक एसटीने येत असतात. पण यंदा एसटी कामगारांच्या बंदमुळे वारकऱयांना पंढरपूरला येण्यात अडचण आली आहे. खासगी वाहनाने वारकरी येत आहेत. पण ही संख्या मर्यादित आहे. कधी नव्हे ती वारीला परवानगी मिळाली. परंतु आता एसटी अभावी वारकऱयांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे. 
 
News Item ID: 
820-news_story-1636898642-awsecm-317
Mobile Device Headline: 
पंढरपुरात आज कार्तिकीचा सोहळा 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Karthiki ceremony in Pandharpur todayKarthiki ceremony in Pandharpur today
Mobile Body: 

सोलापूर : कोरोनामुळे गत सुमारे वीस महिन्यांच्या कालावधीत आलेल्या आषाढी आणि कार्तिकी वारी रद्द झाल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा प्रथमच सोमवारी (ता. १५) कार्तिकी वारीचा सोहळा होणार आहे. परंपरेप्रमाणे सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. 

यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे. पण तुलनेने वारकऱ्यांची संख्या कमीच आहे. बऱ्याच कालावधीनंतर पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. चंद्रभागा नदीसह शहरातील विविध धर्मशाळा, मठ आणि मंदिरांमध्ये टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू आहे. काही ठिकाणी कीर्तने आणि प्रवचनेही सुरू आहेत. आज एकादशीच्या आदल्या दिवशीचे दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने पहाटेपासूनच चंद्रभागातिरी वारकऱ्यांची रीघ दिसून आली. त्या शिवाय मंदिर आणि परिसरासह प्रदक्षिणा मार्गावरही वारकऱ्यांचा अखंड नामघोष सुरू आहे. 

तासाला अडीच हजार वारकऱ्यांना मिळणार दर्शन 
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पारंपरिक पदस्पर्श दर्शन कोरोनामुळे बंद करण्यात आलेले आहे. जवळपास ४० फूट अंतरावरून देवाचे मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनाची रांग वेगाने पुढे सरकत आहे. सध्या मंदिरात प्रतितासाला अडीच हजारांपर्यंत वारकरी दर्शन घेत आहेत. सध्या २१ तास दर्शन सुरू असून, नित्योपचार करण्यासाठी सुमारे तीन तास दर्शन बंद राहते आहे. 

एसटीच्या बंदचा परिणाम 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सर्वाधिक एसटीने येत असतात. पण यंदा एसटी कामगारांच्या बंदमुळे वारकऱयांना पंढरपूरला येण्यात अडचण आली आहे. खासगी वाहनाने वारकरी येत आहेत. पण ही संख्या मर्यादित आहे. कधी नव्हे ती वारीला परवानगी मिळाली. परंतु आता एसटी अभावी वारकऱयांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे. 
 
English Headline: 
Agriculture News in Marathi Karthiki ceremony in Pandharpur today
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कोरोना corona वारी सोलापूर पूर floods अजित पवार ajit pawar एसटी st
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, वारी, सोलापूर, पूर, Floods, अजित पवार, Ajit Pawar, एसटी, ST
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Karthiki ceremony in Pandharpur today
Meta Description: 
Karthiki ceremony in Pandharpur today
कोरोनामुळे गत सुमारे वीस महिन्यांच्या कालावधीत आलेल्या आषाढी आणि कार्तिकी वारी रद्द झाल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा प्रथमच सोमवारी (ता. १५) कार्तिकी वारीचा सोहळा होणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X