[ad_1]
सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान काहीसे संथ झाले. पण दुपारच्या सत्रात मतदानाने वेग घेतला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के इतके मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली. पण गर्दी टाळण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी काठीचा धाकही दाखवावा लागला. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सातला मतदान सुरू झाले. आज उन्हाची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे मतदान संथ गतीने सुरू होते. पण दुपारी दोननंतर काहीसा वेग आला.
या निवडणुकीसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही तालुक्यांत ५२४ इतकी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रांवर स्वच्छता साहित्य ठेवण्यात आले होते. पोलिसही अधिकची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष ठेवून होते. ती हटवण्याचे प्रयत्न सातत्याने होत होते. काही ठिकाणी थेट काठीचा धाकही पोलिसांना दाखवावा लागला. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदारांपैकी १ लाख १२ हजार ८९३ मतदारांनी मतदान केले. याआधीच ३ हजार २२९ इतके टपाली मतदानही झाले आहे. दुपार चारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के इतके मतदान झाले.
दोन मे रोजी निकाल
महाविकास आघाडीकडून भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके आणि भाजपकडून समाधान आवताडे हे रिंगणात आहेत. त्याशिवाय अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटीलही मैदानात आहेत. याशिवाय अन्य १४ असे १९ जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात रंगत आणली होती. कोरोना परिस्थिती असतानाही प्रचारसभांना झालेली गर्दी आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने प्रचार चांगलाच गाजला. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी येत्या २ मे रोजी होणार आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.