पंतप्रधानांविरोधात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तेलंगणाचे शेतकरी वाराणसीच्या दिशेने रवाना

आम्ही कास्तकार, निजामाबाद: तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांचा समूह वाराणसीच्या दिशेने रवाना झाला आहे. अशी माहिती या शेतकरी समूहाचे नेता गंगा रेड्डी यांनी दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या समस्यांना वाच्या फोडण्यासाठी हे शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. हळद आणि ज्वारी या पिकांना हमीभाव मिळावा, या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार केला आहे. हे सर्व शेतकरी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. 

याशिवाय हळद मंडळाची स्थापना करण्याची इच्छा असलेले तामिळनाडूमधीलही ५० शेतकरी वाराणसीच्या दिशेने निघाले आहेत. अशी माहितीही गंगा रेड्डी यांनी दिली आहे. दरम्यान, वाराणसी लोकसभा मतदार संघासाठी पाचव्या टप्प्यात १९ मे रोजी मतदान होणार आहे. 

Leave a Comment

X