पंतप्रधान मोदी यांच्याकडून आत्मनिर्भर भारतासाठी २० लाख करोड रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा!


नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०लाख करोड रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. देशातील सर्व वर्गासाठी हे पॅकेज वेगवेगळ्या पध्दतीने वितरित करण्याचा मोदी यांनी संकल्प बोलून दाखवला. २०२० सालातील हे २० लाख करोड चे पॅकेज संपूर्ण देशवासियांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. लघु उद्योग, कुटीर उद्योग, त्याच बरोबर देशातील विविध उद्योग व्यवसाय, मजूर, शेतकरी, श्रमिक तसेच मध्यवर्ग यासर्वांसाठी उपयोगात आणले जाणार आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य वाढविण्याच्या हेतूने हे पॅकेज लागू केले जाणार आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित या पॅकेजची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणावेळी केली. याचे सविस्तर विवरण अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून उद्या (१३ मे) दिले जाईल असेही यावेळी पंतप्रधानांनी घोषित केले. 

Previous articleLIVE पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात

Source link

Leave a Comment

X