‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेत बदल; आता आधारकार्ड अनिवार्य नाही

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेत बदल; आता आधारकार्ड अनिवार्य नाही

'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेत बदल; आता आधारकार्ड अनिवार्य नाही

आम्ही कास्तकार, नवी दिल्ली केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेत बदल करण्यात आलाय. योजनेचा दुसरा हफ्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ‘आधारकार्ड’ची गरज नाही. असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याआधी या योजनेअंतर्गत पहिला हफ्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधारकार्डची सक्ती करण्यात आली होती. परंतु, सरकारच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना आधारकार्ड दाखवणे अनिवार्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील कित्येक शेतकऱ्यांचा आधार कार्डवर चुकीची माहिती असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पहिला हफ्ता मिळवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांच्या आधार कार्डवर चुकीची माहिती असल्यामुळे त्यांच्या खात्यावरील पैसे काढताना त्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने आधार कार्ड अनिवार्य नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेचा दुसरा हफ्ता (२ हजार रुपये) १ एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

Leave a Comment

X