पट्टापेर, जोडओळीमध्ये हरभरा लागवड तंत्र

वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोंबरचा दुसरा आठवडा, तर संरक्षित ओलिताची सोय असल्यास दहा नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी करता येते. अपवादात्मक स्थितीत बीटी कपाशीचे शेत खाली झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंतही काही शेतकरी हरभऱ्याची ओलिताखाली पेरणी करताना आढळतात. या हंगामात पावसाळा लांबल्यामुळे कोरडवाहू हरभरा पिकाची लागवडीसाठी फायदा होऊ शकतो.

हरभरा रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. खरिपातील कमी कालावधीच्या पिकांची काढणी झाल्यानंतर कोरडवाहू परिस्थितीत अथवा संरक्षित ओलिताची सोय असल्यास ओलिताखाली हरभऱ्याची लागवड केली जाते. या हंगामात सातत्याने आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या लांबल्या आहेत. सध्या मुबलक ओलावा असल्यामुळे कोरडवाहू स्थितीतही हरभरा पिकाची पेरणी करू शकतात.

कोरडवाहू तसेच ओलिताखालील हरभरा पेरणीसाठी देशी (सुधारित) वाण :
विजय, दिग्विजय, राजविजय-२०२, राजविजय-२०३, जाकी, डॉलर, साकी, आयसीसीव्ही-१०, पीकेव्ही कांचन (एकेजी -११०९), फुले विक्रम, बीडीएनजी-७९७ (आकाश), फुले विक्रांत.

ओलिताखालील काबुली हरभऱ्याचे टपोऱ्या दाण्याचे वाण
 विराट, आयसीसीव्ही-२ (श्वेता), पीकेव्ही काक-२, पीकेव्ही काबुली-४, फुले कृपा, बीडीएनके-७९८.

हिरव्या रंगाचे बियाण्याचे टरफल असलेले वाण
पीकेव्ही हरिता (एकेजी-९३०३-१२), हिरवा चाफा, एकेजीएस-१

गुलाबी रंगाचे बियाण्याचे टरफल असलेले मध्यम टपोऱ्या दाण्याचे वाण
गुलक -१ व डी-८.

देशी (सुधारित) हरभरा वाणांसाठी पेरणीचे अंतर ३० सें.मी. x १० सें.मी. एवढे राखावे. बियाण्याच्या आकारानुसार एकरी ३०-४० किलो बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा. याद्वारे एकरी दीड लाखपर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते.

काबुली हरभरा वाणांसाठी पेरणीचे अंतर ४५ सें.मी. x १० सें.मी.एवढे राखावे. बियाण्याच्या आकारानुसार एकरी ४०-५० किलो बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा. याद्वारे एकरी एक लाखपर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते.

हरभरा पिकाचे काही नवीन वाण हे अधिक उत्पादनक्षम आहेत. या वाणांसाठी संरक्षित ओलिताची सोय असल्यास पेरणीचे दोन ओळीतील अंतर दोन ते सव्वा दोन फुटांपर्यंत वाढवून दोन झाडातील अंतर सारखेच ठेवून (१० सेंमी) ठेवल्यास उत्पादकतेत शाश्वत व हमखास वाढ शक्य होते. या पद्धतीमुळे बियाणे व खर्चात बचत साध्य होते.

हरभऱ्यासाठी सुधारित पेरणी पद्धती 
बीबीएफ प्लँटरने पेरणी 

सोयाबीन पेरणीसाठी वापरले जाणारे बीबीएफ प्लँटर हरभरा पेरणीसाठीही वापरता येते. याद्वारे पेरणी करतानाच प्रत्येक ४ ओळीनंतर दोन्ही बाजूला सऱ्या पडतात. तुषारसंचाद्वारे किंवा सरीद्वारेही पाणी देणे सोईचे होते. रब्बी हंगामात येणाऱ्या अवकाळी पावसापासूनही पिकाचे नुकसान टाळता येते. यामध्ये प्रत्येक पाचवी ओळ खाली राखल्यामुळे बियाण्याचे प्रमाण व बियाणे खर्च, तसेच रासायनिक खत मात्रा व खत खर्चात २० टक्के बचत शक्य होते.

ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राद्वारे पट्टा पेर 
सहा अथवा सात ओळी पट्टापेर 

सोयाबीन प्रमाणेच हरभऱ्यातही पट्टापेर पद्धती उपयुक्त सिद्ध झाली आहे. हरभरा पेरणीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्र सहा दात्यांचे असते. ट्रॅक्टरने पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना सातवी ओळ खाली ठेवावी. यामुळे शेतात सहा – सहा ओळीच्या पट्ट्यात पेरणी होते. प्रत्येक सातवी ओळ खाली राहते. बियाणे, रासायनिक खते व खर्चात सुमारे १५ टक्के बचत होते.

चार ओळी पट्टा पेर
ट्रॅक्टरचलित सहा दात्याच्या पेरणी यंत्राचे दोन्ही काठावरील प्रत्येकी एक छिद्र बोळा कोंबून बंद करावे. यामुळे पेरणीवेळी आपोआपच काठावरील ओळी खाली राहतील. पेरणी करतेवेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना खाली ठेवलेल्या ओळीतच पेरणी यंत्राचे शेवटचे दाते ठेवावे. आपोआपच प्रत्येक चार ओळीनंतर पाचवी ओळ रिकामी राहते. तिथे हलकी सरी तयार होते. या पद्धतीत बियाणे, रासायनिक खते व खर्चात २० टक्के बचत शक्य होते. या पद्धतीत बीबीएफ पेरणी यंत्राप्रमाणेच पेरणी शक्य होते.

ट्रॅक्टर चलित सात दाती पेरणी यंत्र 

 • शेतकऱ्याकडे सात दाती पेरणी यंत्र असले तरी त्यांना सात अथवा सहा ओळींच्या पट्ट्यामध्ये हरभरा पेरणी शक्य होऊ शकते. सात ओळीचा पट्टा ठेवण्यासाठी, पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना दोन ओळीतील राखावयाच्या अंतरानुसार एक ओळ सुटेल एवढी जागा खाली सोडावी. प्रत्येकी आठवी ओळ खाली राहील.
 • सात दाती पेरणी यंत्राने सहा ओळीचा पट्टा राखावयाचा झाल्यास, ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राच्या बियाणे व खत कप्प्यातील मधील म्हणजेच चार नंबरचे छिद्र बोळा कोंबून बंद करावे. पेरणी करताना प्रत्येकवेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना नेहमीप्रमाणे पेरणी करावी. शेतात सहा ओळींच्या पट्ट्यामध्ये पेरणी होते. प्रत्येक सातवी ओळ खाली राहते.

लहान ट्रॅक्टर व चार किंवा पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी 

 • लहान ट्रॅक्टर असल्यास चार किंवा पाच दाती पेरणी यंत्राने चार अथवा पाच ओळींच्या पट्ट्यात हरभरा पिकाची पेरणी शक्य होते. या करिता चार दाती पेरणी यंत्राने पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना पाचवी ओळ खाली राहील इतकी जागा सोडावी.
 • पाच दाती पेरणी यंत्र असल्यास प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना सहावी ओळ खाली राहील, इतकी जागा सोडावी. म्हणजेच शेतात चार अथवा पाच ओळीच्या पट्ट्यात पेरणी शक्य होईल.

छोट्या ट्रॅक्टर व पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी
पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी करताना बियाणे व खत कप्प्यातील मधील म्हणजेच तीन नंबरचे छिद्र बंद करावे. पेरणी करताना प्रत्येकवेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना पेरणीच्या दोन ओळीतील अंतरानुसार एक ओळ खाली सुटेल इतकी जागा मोकळी ठेवावी. त्यातून जोडओळ पद्धतीने पेरणी शक्य होते. यामुळे बियाणे, रासायनिक खत व खर्चात किमान ३३ टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते.

मजुरांद्वारे टोकणीने जोड ओळ 

 • हरभरा पिकाची टोकण पद्धतीने पेरणी करताना जोड ओळ पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनात दिड पटीपर्यंत हमखास वाढ शक्य होते. या करिता बैलजोडीचलित अथवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने संपूर्ण शेतात केवळ सऱ्या पाडून घ्याव्यात. यावेळी पेरणी यंत्राने रासायनिक खताची मात्रा देता येईल. या नंतर मजुरांद्वारे अथवा नावीन्यपूर्ण मानवचलित टोकण यंत्राने हरभरा पिकाची टोकण पद्धतीने पेरणी करावी. पेरणी करतेवेळी दोन ओळी डोबल्यानंतर प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. खाली ठेवलेल्या तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी पिकाची उगवण झाल्यानंतर कोळप्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजेच जोळओळीतील हरभऱ्याचे पीक गादी वाफ्यावर येईल.
 • छोट्या नांगराने अथवा बेडमेकर अथवा तत्सम अवजाराने प्रत्येक तीन अथवा साडेतीन फुटावर सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजे शेतात गादी वाफे तयार होतील. या गादीवाफ्यावर जोड ओळीमध्ये हरभरा पिकाची मजुरांद्वारे टोकण करावी. जोड ओळीमध्ये दोन ओळीतील अंतर एक ते दीड फूट तसेच दोन झाडातील अंतर नेहमीप्रमाणे १० सेंमी असे ठेवावे.
 • ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरलमधील अंतरानुसार लॅटरलच्या दोन्ही बाजूने अर्धा ते पाऊण फूट अंतरावर दोन झाडातील अंतर १० सेंमी राखून टोकण करावी. जोडओळीचे स्वरूप मिळेल.
 • पट्टापेर अथवा जोड ओळ पद्धतीने पेरणी केलेली असल्यास पिकाची उगवण झाल्यानंतर कोळप्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून केवळ खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी दांड अथवा सरी अथवा गाळ पाडून घ्यावा.

फायदे 
बीबीएफ प्लँटर अथवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने पट्टापेर अथवा जोड ओळ पेरणी पद्धतीने पेरणी केल्यास हरभरा पिकाला पुढील प्रमाणे फायदे मिळतात.

 • फवारणीसाठी योग्य जागा उपलब्ध होते.
 • ओलिताची सोय असल्यास सरीद्वारे पाणी देता येते.
 • तुषार सिंचन संच असल्यास स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होते.
 • पिकाची निगराणी, निरिक्षणासाठी फिरणे सोपे होते.
 • शेतात हवा खेळती राहते.
 • सूर्यप्रकाश संपूर्ण पिकावर योग्य रीतीने पडतो.
 • पिकाची अवास्तव वाढ टाळता येते.
 • बियाणे, रासायनिक खते व त्यासाठीच्या खर्चात बचत शक्य होते.

– जितेंद्र दुर्गे, (सहयोगी प्राध्यापक), ९४०३३०६०६७
(कृषी विद्या विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.)

News Item ID: 
820-news_story-1635423747-awsecm-114
Mobile Device Headline: 
पट्टापेर, जोडओळीमध्ये हरभरा लागवड तंत्र
Appearance Status Tags: 
Section News
सहा ओळी पट्टापेर – ट्रॅक्टर चलीत सहा दाती अथवा सात दाती पेरणी यंत्राने पेरणी.सहा ओळी पट्टापेर – ट्रॅक्टर चलीत सहा दाती अथवा सात दाती पेरणी यंत्राने पेरणी.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi article regarding gram cultivation techniques
Author Type: 
External Author
जितेंद्र दुर्गे, सविता कणसे
मात mate कोरडवाहू रब्बी हंगाम कडधान्य ओला आयसीसी बीड beed गुलाब rose सोयाबीन रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser ट्रॅक्टर tractor यंत्र machine ठिबक सिंचन सिंचन खून तुषार सिंचन sprinkler irrigation जितेंद्र विभाग sections
Search Functional Tags: 
मात, mate, कोरडवाहू, रब्बी हंगाम, कडधान्य, ओला, आयसीसी, बीड, Beed, गुलाब, Rose, सोयाबीन, रासायनिक खत, Chemical Fertiliser, खत, Fertiliser, ट्रॅक्टर, Tractor, यंत्र, Machine, ठिबक सिंचन, सिंचन, खून, तुषार सिंचन, sprinkler irrigation, जितेंद्र, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article regarding gram cultivation techniques
Meta Description: 
article regarding gram cultivation techniques
वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोंबरचा दुसरा आठवडा, तर संरक्षित ओलिताची सोय असल्यास दहा नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी करता येते. अपवादात्मक स्थितीत बीटी कपाशीचे शेत खाली झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंतही काही शेतकरी हरभऱ्याची ओलिताखाली पेरणी करताना आढळतात. या हंगामात पावसाळा लांबल्यामुळे कोरडवाहू हरभरा पिकाची लागवडीसाठी फायदा होऊ शकतो.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X