परभणीत लाळ्या खुरकूत लसीकरण थंडावले 

परभणी ः जिल्ह्यात लस मात्रा उपलब्ध न झाल्यामुळे जनावरांसाठी लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास विलंब लागत आहे. काही भागांत लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तत्काळ पुरेशा प्रमाणात लसपुरवठा करून लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे. 

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मिळून ३ लाख ९८ हजार एवढ्या पशुधनास लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ४ लाखांवर लसीच्या मात्रांची मागणी केलेली आहे. परंतु अद्याप लसपुरवठा झालेला नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम सुरू करता येत नाही.

दर वर्षी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ही मोहीम राबविली जाते. परंतु यंदा मागणी केलेल्या लसीच्या मात्रा अद्याप प्राप्त न झाल्यामुळे लसीकरण मोहीम सुरू करण्यास विलंब झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.३०) लस मात्रा उपलब्ध होतील. त्यानंतर जिल्ह्यातील ७८ पशुचिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल.

या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना उपचारासाठी नजीकच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुचिकित्सालयाची संपर्क साधावा, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी सांगितले. लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रसार रोखण्याठी पशुसंवर्धन विभागाने तत्काळ लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी शेतकरी अशोक देशमुख यांनी केली आहे.
 
News Item ID: 
820-news_story-1637766528-awsecm-663
Mobile Device Headline: 
परभणीत लाळ्या खुरकूत लसीकरण थंडावले 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Saliva scabies vaccination in Parbhani cooled downSaliva scabies vaccination in Parbhani cooled down
Mobile Body: 

परभणी ः जिल्ह्यात लस मात्रा उपलब्ध न झाल्यामुळे जनावरांसाठी लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास विलंब लागत आहे. काही भागांत लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तत्काळ पुरेशा प्रमाणात लसपुरवठा करून लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे. 

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मिळून ३ लाख ९८ हजार एवढ्या पशुधनास लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ४ लाखांवर लसीच्या मात्रांची मागणी केलेली आहे. परंतु अद्याप लसपुरवठा झालेला नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम सुरू करता येत नाही.

दर वर्षी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ही मोहीम राबविली जाते. परंतु यंदा मागणी केलेल्या लसीच्या मात्रा अद्याप प्राप्त न झाल्यामुळे लसीकरण मोहीम सुरू करण्यास विलंब झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.३०) लस मात्रा उपलब्ध होतील. त्यानंतर जिल्ह्यातील ७८ पशुचिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल.

या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना उपचारासाठी नजीकच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुचिकित्सालयाची संपर्क साधावा, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी सांगितले. लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रसार रोखण्याठी पशुसंवर्धन विभागाने तत्काळ लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी शेतकरी अशोक देशमुख यांनी केली आहे.
 
English Headline: 
Agriculture News in Marathi Saliva scabies vaccination in Parbhani cooled downSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X