परभणीत १ लाख १३ हजार विमा प्रस्ताव

परभणी ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात १ लाख १३ हजार ३६० विमा प्रस्ताव दाखल केले असून शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्‍शाचा ४ कोटी ७५ लाख २८ हजार ८४७ रुपये विमा हप्ता भरला आहे.

एकूण ८९ हजार ९९७ हेक्टरवरील पिकांसाठी ३१६ कोटी ८५ लाख ९० हजार ३३३ रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे. यंदा रब्बी पीकविमा योजनेतील शेतकरी सहभाग दुपटीने वाढला आहे. गतवर्षी (२०२०) एकूण ५५ हजार ८७५ विमा प्रस्ताव दाखल करत ३६ हजार ८६८ हेक्टरवरील पिकांसाठी १ कोटी ८३ लाख ४ हजार ६३५ रुपये एवढा हप्ता भरून १२२ कोटी ३० लाख ९ हजार ६२ रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते.

रब्बी पीकविमा योजनेत ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह उन्हाळी भुईमुगाचा समावेश आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेर पर्यंत २ लाख २ हजार ८४१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक विमा प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे विमा क्षेत्रात देखील दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सर्वाधिक ८९ हजार ५३४ प्रस्ताव दाखल करुन ७७ हजार ५९७ हेक्टरवरील हरभरा संरक्षित करण्यात आला. एकूण २ हजार ७०७ प्रस्तावाद्वारे १ हजार ९७६ हेक्टरवरील ज्वारी पिकासाठी, तर  १९ हजार ६५४ प्रस्तावाद्वारे ९ हजार ७८१ हेक्टरवरील गव्हाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले. परभणी, जिंतूर,  पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या सहा तालुक्यांतील ६३४ हेक्टर भुईमूग पिकासाठी १ हजार ४६५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. यंदा शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकार यांचा एकत्रित २७ कोटी २१ लाख ६६ हजार १५२ रुपये एवढा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

News Item ID: 
820-news_story-1641127407-awsecm-943
Mobile Device Headline: 
परभणीत १ लाख १३ हजार विमा प्रस्ताव
Appearance Status Tags: 
Mukhya News
1 lakh 13 thousand insurance proposal in Parbhani
Mobile Body: 

परभणी ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात १ लाख १३ हजार ३६० विमा प्रस्ताव दाखल केले असून शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्‍शाचा ४ कोटी ७५ लाख २८ हजार ८४७ रुपये विमा हप्ता भरला आहे.

एकूण ८९ हजार ९९७ हेक्टरवरील पिकांसाठी ३१६ कोटी ८५ लाख ९० हजार ३३३ रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे. यंदा रब्बी पीकविमा योजनेतील शेतकरी सहभाग दुपटीने वाढला आहे. गतवर्षी (२०२०) एकूण ५५ हजार ८७५ विमा प्रस्ताव दाखल करत ३६ हजार ८६८ हेक्टरवरील पिकांसाठी १ कोटी ८३ लाख ४ हजार ६३५ रुपये एवढा हप्ता भरून १२२ कोटी ३० लाख ९ हजार ६२ रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते.

रब्बी पीकविमा योजनेत ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह उन्हाळी भुईमुगाचा समावेश आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेर पर्यंत २ लाख २ हजार ८४१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक विमा प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे विमा क्षेत्रात देखील दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सर्वाधिक ८९ हजार ५३४ प्रस्ताव दाखल करुन ७७ हजार ५९७ हेक्टरवरील हरभरा संरक्षित करण्यात आला. एकूण २ हजार ७०७ प्रस्तावाद्वारे १ हजार ९७६ हेक्टरवरील ज्वारी पिकासाठी, तर  १९ हजार ६५४ प्रस्तावाद्वारे ९ हजार ७८१ हेक्टरवरील गव्हाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले. परभणी, जिंतूर,  पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या सहा तालुक्यांतील ६३४ हेक्टर भुईमूग पिकासाठी १ हजार ४६५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

English Headline: 
Agriculture news in Marathi 1 lakh 13 thousand insurance proposal in Parbhani
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
रब्बी हंगाम मात mate गहू wheat गंगा ganga river खेड भुईमूग groundnut कडधान्य
Search Functional Tags: 
रब्बी हंगाम, मात, mate, गहू, wheat, गंगा, Ganga River, खेड, भुईमूग, Groundnut, कडधान्य
Twitter Publish: 
Meta Keyword: 
1 lakh 13 thousand insurance proposal in Parbhani
Meta Description: 
1 lakh 13 thousand insurance proposal in Parbhani
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात १ लाख १३ हजार ३६० विमा प्रस्ताव दाखल केले असून शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्‍शाचा ४ कोटी ७५ लाख २८ हजार ८४७ रुपये विमा हप्ता भरला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment