परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा (२०२१) जून ते आॅक्टोंबर या (वार्षिक) कालावधीत ११९६.४० मिमी म्हणजेच १४२.६१ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यंदा सरासरीपेक्षा ३५७.४ मिमी जास्त पाऊस झाला आहे. अनेक वर्षांनंतरचा जिल्ह्यातील हा पावसाचा उच्चांक आहे.

२०१९ पर्यंत परभणी जिल्ह्याची जून ते आॅक्टोंबर या कालावधीत (वार्षिक) पडणाऱ्या पावसाची सरासरी ७७४.५९ मिमी होती.२०२० च्या मे महिन्यातील शासन निर्णयानुसार वार्षिक सरासरीत सुधारणा करण्यात आली. त्यानुसार  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी ९३०.३० मिमी, तर जून ते आॅक्टोंबर या कालावधीतील  सरासरी ८३८.९० मिमी आहे. मोसमी पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ७६१.३ मिमी आहे. परंतु यंदा ११०२.१ (१४४.८ टक्के) पाऊस झाला. आॅक्टोंबर महिन्याची सरासरी ७७.६० मिमी आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात ९४.६१ मिमी पाऊस झाला. 

जिल्ह्यात २०१२ ते २०२१ या दहा वर्षाच्या कालावधीतील पाच वर्षात सरासरीपेक्षा कमी, तर पाच वर्षात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यंदा ऑगस्ट महिना वगळता सर्व महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. आॅगस्टमध्ये २२७.८० मिमी अपेक्षित असताना १४१.४ मिमी (६२.१ टक्के) पाऊस झाला. 

यंदा जिल्ह्यात २५ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत २२ दिवसांचा, तर २३ ते २९ आॅगस्ट या कालावधीत ७ दिवस असा एकूण २९ दिवस पावसाचा खंड 
होता. 

हिंगोली जिल्ह्यात ११९०.७ मिमी पाऊस

हिंगोली जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी ८५९.६ मिमी आहे. यंदा (२०२१) प्रत्यक्षात ११९०.७ मिमी (१३८.५टक्के) म्हणजेच सरासरीपेक्षा ३३१.१ मिमी जास्त पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात सरासरी २४१.२० मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५६.२ मिमी (६४.८ टक्के) पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात ३० जून ते ७ जुलै, २६ जुलै ते ८ ऑगस्ट, २४ ते ३० ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड होता.

News Item ID: 
820-news_story-1635769483-awsecm-369
Mobile Device Headline: 
परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस
Appearance Status Tags: 
Section News
Above average rainfall for the third year in a row in Parbhani districtAbove average rainfall for the third year in a row in Parbhani district
Mobile Body: 

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा (२०२१) जून ते आॅक्टोंबर या (वार्षिक) कालावधीत ११९६.४० मिमी म्हणजेच १४२.६१ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यंदा सरासरीपेक्षा ३५७.४ मिमी जास्त पाऊस झाला आहे. अनेक वर्षांनंतरचा जिल्ह्यातील हा पावसाचा उच्चांक आहे.

२०१९ पर्यंत परभणी जिल्ह्याची जून ते आॅक्टोंबर या कालावधीत (वार्षिक) पडणाऱ्या पावसाची सरासरी ७७४.५९ मिमी होती.२०२० च्या मे महिन्यातील शासन निर्णयानुसार वार्षिक सरासरीत सुधारणा करण्यात आली. त्यानुसार  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी ९३०.३० मिमी, तर जून ते आॅक्टोंबर या कालावधीतील  सरासरी ८३८.९० मिमी आहे. मोसमी पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ७६१.३ मिमी आहे. परंतु यंदा ११०२.१ (१४४.८ टक्के) पाऊस झाला. आॅक्टोंबर महिन्याची सरासरी ७७.६० मिमी आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात ९४.६१ मिमी पाऊस झाला. 

जिल्ह्यात २०१२ ते २०२१ या दहा वर्षाच्या कालावधीतील पाच वर्षात सरासरीपेक्षा कमी, तर पाच वर्षात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यंदा ऑगस्ट महिना वगळता सर्व महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. आॅगस्टमध्ये २२७.८० मिमी अपेक्षित असताना १४१.४ मिमी (६२.१ टक्के) पाऊस झाला. 

यंदा जिल्ह्यात २५ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत २२ दिवसांचा, तर २३ ते २९ आॅगस्ट या कालावधीत ७ दिवस असा एकूण २९ दिवस पावसाचा खंड 
होता. 

हिंगोली जिल्ह्यात ११९०.७ मिमी पाऊस

हिंगोली जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी ८५९.६ मिमी आहे. यंदा (२०२१) प्रत्यक्षात ११९०.७ मिमी (१३८.५टक्के) म्हणजेच सरासरीपेक्षा ३३१.१ मिमी जास्त पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात सरासरी २४१.२० मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५६.२ मिमी (६४.८ टक्के) पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात ३० जून ते ७ जुलै, २६ जुलै ते ८ ऑगस्ट, २४ ते ३० ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड होता.

English Headline: 
Agriculture news in marathi Above average rainfall for the third year in a row in Parbhani district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
परभणी parbhabi ऊस पाऊस
Search Functional Tags: 
परभणी, Parbhabi, ऊस, पाऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Above average rainfall for the third year in a row in Parbhani district
Meta Description: 
Above average rainfall for the third year in a row in Parbhani district
परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा (२०२१) जून ते आॅक्टोंबर या (वार्षिक) कालावधीत ११९६.४० मिमी म्हणजेच १४२.६१ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X