परभणी : सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित 

परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटीज) अंतर्गत नुकसाभरपाईसाठी विमा कंपनीकडे चार पद्धतीने एकूण ३ लाख ११ हजार ७७३ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.

गुरुवारी (ता. २१) एकूण १ लाख ८२ हजार २९५ शेतकऱ्यांच्या पीकनुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अजून १ लाख २९ हजार ४७८ शेतकऱ्यांचे पंचनामे प्रलंबित आहेत. तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी विमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे. 

पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसूचना टोल फ्री नंबरद्वारे विमा कंपनीचे कॉल सेंटर, ई-मेल, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर (एनसीआयपी) ऑनलाइन पद्धतीने तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे ऑफलाइन नोंदवीता येतात. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात खरीप पिके विविध अवस्थेत असताना अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. नद्या, नाल्यांच्या पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. काढणीच्या अवस्थेतील उभे सोयाबीन, वेचणीच्या अवस्थेतील कपाशी, उभी तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

नुकसानीच्या पूर्वसूचना दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार विमा कंपनीकडे टोल फ्री नंबरवरून कॉल सेंटरकडे ३६ हजार ६८० पूर्वसूचना, ई-मेलद्वारे ६ हजार ३७ पूर्वसूचना, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर १ लाख ७६ हजार ७५९ पूर्वसूचना, तर शेतकऱ्यांनी स्वतः (ऑफलाइन) विमा कंपनी प्रतिनिधींकडे ९२ हजार २९७ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. 

News Item ID: 
820-news_story-1635084290-awsecm-474
Mobile Device Headline: 
परभणी : सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित 
Appearance Status Tags: 
Section News
सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित  Agriculture News in Marathi Panchnama pending In Parbhaniसव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित  Agriculture News in Marathi Panchnama pending In Parbhani
Mobile Body: 

परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटीज) अंतर्गत नुकसाभरपाईसाठी विमा कंपनीकडे चार पद्धतीने एकूण ३ लाख ११ हजार ७७३ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.

गुरुवारी (ता. २१) एकूण १ लाख ८२ हजार २९५ शेतकऱ्यांच्या पीकनुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अजून १ लाख २९ हजार ४७८ शेतकऱ्यांचे पंचनामे प्रलंबित आहेत. तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी विमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे. 

पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसूचना टोल फ्री नंबरद्वारे विमा कंपनीचे कॉल सेंटर, ई-मेल, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर (एनसीआयपी) ऑनलाइन पद्धतीने तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे ऑफलाइन नोंदवीता येतात. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात खरीप पिके विविध अवस्थेत असताना अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. नद्या, नाल्यांच्या पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. काढणीच्या अवस्थेतील उभे सोयाबीन, वेचणीच्या अवस्थेतील कपाशी, उभी तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

नुकसानीच्या पूर्वसूचना दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार विमा कंपनीकडे टोल फ्री नंबरवरून कॉल सेंटरकडे ३६ हजार ६८० पूर्वसूचना, ई-मेलद्वारे ६ हजार ३७ पूर्वसूचना, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर १ लाख ७६ हजार ७५९ पूर्वसूचना, तर शेतकऱ्यांनी स्वतः (ऑफलाइन) विमा कंपनी प्रतिनिधींकडे ९२ हजार २९७ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. 

English Headline: 
Agriculture News in Marathi Panchnama pending In Parbhani
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पीकविमा लोकल local train विमा कंपनी कंपनी company दिवाळी टोल खरीप सोयाबीन तूर प्रशासन administrations कृषी विभाग agriculture department विभाग sections
Search Functional Tags: 
पीकविमा, लोकल, Local Train, विमा कंपनी, कंपनी, Company, दिवाळी, टोल, खरीप, सोयाबीन, तूर, प्रशासन, Administrations, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Agriculture News in Marathi Panchnama pending In Parbhani
Meta Description: 
Agriculture News in Marathi Panchnama pending In Parbhani
परभणी जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटीज) अंतर्गत नुकसाभरपाईसाठी विमा कंपनीकडे चार पद्धतीने एकूण ३ लाख ११ हजार ७७३ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X