पशुपालकांना पडणारे प्रश्न : गोचीडनाशक रसायनांचा वापर कसा करावा?

पशुपालकांना पडणारे प्रश्न : गोचीडनाशक रसायनांचा वापर कसा करावा?

उत्तर: गोडिचनाशक रसायने पशुंच्या शरीरावर लावली/फवारली असता अशा पशुंना उन्हात बांधणे फारच धोकादायक आणि चुकीचे आहे कारण यामुळे त्यांना विषबाधा होण्याची मोठी शक्यता असते म्हणून रसायने थंड हवामानाच्या वेळीच लावावीत. कोणत्याही प्रकारचे रसायने त्यांना चाटू देऊ नयेत.

पशुंच्या शरीरावरील गोचिड/उवा/लिखा/तांबवा/चावर्या माश्यांचा बंदोबस्त करण्याकरिता जेव्हा रसायने लावली जातात. त्यावेळीच त्यांना बाहेर बांधून शेडमध्ये जास्त पॉवरचे (संपृक्त) रसायन फवारणे आवश्यक आहे. पशुच्या शरीरावर जेवढ्या प्रमाणांत हे रक्त शोषण करणारे बाह्यकिटक असतात. त्याच्या पाचपट ते गोठ्यातील विविध भागात लपलेले असतात.

-डॉ. वासुदेव सिधये, पशुतज्ज्ञ

Leave a Comment

X