पाच वर्षांत १७ हजार मेगावॉट निर्मितीचे उद्दिष्ट

मुंबई : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाने येत्या पाच वर्षांत १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने अपारंपरिक ऊर्जा धोरण-२०२०ला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मिती व्यतिरिक्त दरवर्षी १ लाख सौर कृषीपंप तसेच अन्य माध्यमातून पारेषणविरहीत मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यामुळे राज्याच्या कृषी, औद्योगिक विकासाला मोठी गती मिळू शकेल, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

 हे धोरण नवीन व नवीकरणीय (अपारंपरिक) ऊर्जास्त्रोतांपासून वीज निर्मितीच्या प्रकल्पांसाठी पारेषण संलग्न आणि पारेषण विरहीत एकत्रित अपारंपरिक ऊर्जा निर्मितीबाबतचे आहे. 
पारेषण संलग्न प्रकल्पांमध्ये १० हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती प्रकल्प, २ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे ग्रीड कनेक्टेड रूफ टॉप सौर प्रकल्प, ५०० मेगावॉट क्षमतेचे शहरी, वॉटर ग्रीड, ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करणे, ३० मेगावॉटचे लघुजल व नळ पाणीपुरवठा करण्यासाठी पारेषण संलग्न सौरपंपाचा वापर, शेतकरी सहकारी संस्था, कंपनी किंवा गट स्थापन करून खासगी गुंतवणुकीद्वारे २५० मेगावॉटचे पारेषण संलग्न सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

दर वर्षी एक लाख सौर कृषिपंप
पारेषण विरहित प्रकल्पांतर्गतही सौरऊर्जेच्या माध्यमातून विविध कारणांसाठी वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये दर वर्षी एक लाख सौर कृषिपंप वाटप करण्यात येणार आहेत. तसेच इमारतीचे छत (रुफटॉप) व जमिनीवरील पारेषण ‍विरहीत/ हायब्रीड सौर विद्युत संचाच्या माध्यमातून ५२ हजार किलोवॅट वीजनिर्मिती, लघुजल व नळ पाणीपुरवठ्यासाठी २ हजार सौर पंप बसविणे, ग्रामीण विद्युतीकरणांतर्गत १० हजार घरांना सौरपॅनेलद्वारे वीजपुरवठा, ५५,००० चौ.मी.चे सौर उष्णजल संयंत्र व स्वयंपाकासाठी सौरऊर्जेवर आधारित संयंत्रे, सौरऊर्जेवर आधारित ८०० शीत साठवणगृहे (कोल्ड स्टोअरेज) उभारणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया
स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीसाठी हे धोरण फायदेशीर ठरणार असून, शेतकऱ्यांना शाश्वत आणि दिवसा वीजपुरवठा, उद्योगांना किफायतशीर दरात वीज तसेच सर्वच घटकांना अखंडित आणि माफक दरात वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट या माध्यमातून साध्य होईल. राज्यात या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. सौर तसेच अन्य वीजप्रकल्पांच्या उभारणीतूनही मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.
– डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

News Item ID: 
820-news_story-1609512741-awsecm-919
Mobile Device Headline: 
पाच वर्षांत १७ हजार मेगावॉट निर्मितीचे उद्दिष्ट
Appearance Status Tags: 
Tajya News
पाच वर्षांत १७ हजार मेगावॉट निर्मितीचे उद्दिष्ट The target is to generate 17,000 MW in five yearsपाच वर्षांत १७ हजार मेगावॉट निर्मितीचे उद्दिष्ट The target is to generate 17,000 MW in five years
Mobile Body: 

मुंबई : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाने येत्या पाच वर्षांत १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने अपारंपरिक ऊर्जा धोरण-२०२०ला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मिती व्यतिरिक्त दरवर्षी १ लाख सौर कृषीपंप तसेच अन्य माध्यमातून पारेषणविरहीत मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यामुळे राज्याच्या कृषी, औद्योगिक विकासाला मोठी गती मिळू शकेल, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

 हे धोरण नवीन व नवीकरणीय (अपारंपरिक) ऊर्जास्त्रोतांपासून वीज निर्मितीच्या प्रकल्पांसाठी पारेषण संलग्न आणि पारेषण विरहीत एकत्रित अपारंपरिक ऊर्जा निर्मितीबाबतचे आहे. 
पारेषण संलग्न प्रकल्पांमध्ये १० हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती प्रकल्प, २ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे ग्रीड कनेक्टेड रूफ टॉप सौर प्रकल्प, ५०० मेगावॉट क्षमतेचे शहरी, वॉटर ग्रीड, ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करणे, ३० मेगावॉटचे लघुजल व नळ पाणीपुरवठा करण्यासाठी पारेषण संलग्न सौरपंपाचा वापर, शेतकरी सहकारी संस्था, कंपनी किंवा गट स्थापन करून खासगी गुंतवणुकीद्वारे २५० मेगावॉटचे पारेषण संलग्न सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

दर वर्षी एक लाख सौर कृषिपंप
पारेषण विरहित प्रकल्पांतर्गतही सौरऊर्जेच्या माध्यमातून विविध कारणांसाठी वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये दर वर्षी एक लाख सौर कृषिपंप वाटप करण्यात येणार आहेत. तसेच इमारतीचे छत (रुफटॉप) व जमिनीवरील पारेषण ‍विरहीत/ हायब्रीड सौर विद्युत संचाच्या माध्यमातून ५२ हजार किलोवॅट वीजनिर्मिती, लघुजल व नळ पाणीपुरवठ्यासाठी २ हजार सौर पंप बसविणे, ग्रामीण विद्युतीकरणांतर्गत १० हजार घरांना सौरपॅनेलद्वारे वीजपुरवठा, ५५,००० चौ.मी.चे सौर उष्णजल संयंत्र व स्वयंपाकासाठी सौरऊर्जेवर आधारित संयंत्रे, सौरऊर्जेवर आधारित ८०० शीत साठवणगृहे (कोल्ड स्टोअरेज) उभारणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया
स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीसाठी हे धोरण फायदेशीर ठरणार असून, शेतकऱ्यांना शाश्वत आणि दिवसा वीजपुरवठा, उद्योगांना किफायतशीर दरात वीज तसेच सर्वच घटकांना अखंडित आणि माफक दरात वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट या माध्यमातून साध्य होईल. राज्यात या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. सौर तसेच अन्य वीजप्रकल्पांच्या उभारणीतूनही मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.
– डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

English Headline: 
Agriculture news in marathiThe target is to generate 17,000 MW in five years
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
वर्षा varsha वीज मुंबई mumbai कृषी agriculture विकास नितीन राऊत nitin raut पाणी water सौर कृषिपंप solar agri pump गुंतवणूक रोजगार employment
Search Functional Tags: 
वर्षा, Varsha, वीज, मुंबई, Mumbai, कृषी, Agriculture, विकास, नितीन राऊत, Nitin Raut, पाणी, Water, सौर कृषिपंप, Solar Agri Pump, गुंतवणूक, रोजगार, Employment
Twitter Publish: 
Meta Keyword: 
पाच वर्षांत १७ हजार मेगावॉट निर्मितीचे उद्दिष्ट The target is to generate 17,000 MW in five years
Meta Description: 
The target is to generate 17,000 MW in five years
अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाने येत्या पाच वर्षांत १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने अपारंपरिक ऊर्जा धोरण-२०२०ला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.Source link

Leave a Comment

X