पाटीलवाडीत म्हशीला पांढरे शुभ्र रेडकू

कऱ्हाड ः काळ्या रंगाचे किंवा डोक्यावर एखादे-दुसरा पांढरा ठिपका असणारे म्हशीचे रेडकू आपल्यापैकी अनेकांच्या पाहण्यात आहे. परंतु वाल्मीक पठारावरील पाटीलवाडी (रुवले, ता. पाटण) येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क गाईच्या वासरासारखे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने परिसरात तो औत्सुक्याचा विषय बनला आहे. हे वेगळ्याच प्रकारचे रेडकू बघायला नागरिक संबंधित शेतकऱ्याच्या घरी गर्दी करत आहेत. दरम्यान, गुणसूत्रातील बदलामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वाल्मीक पठारावरील पाटीलवाडी या छोट्याशा गावातील सचिन लक्ष्मण साळुंखे कुटुंबीयांसह मुंबईत स्थायिक होते. परंतु लॉकडाउनच्या काळात नोकरीत अडचणी निर्माण झाल्याने ते गावीच शेतीत रमले आहेत. शेतीला जोड म्हणून  त्यांनी दुग्ध व्यवसाय निवडला आहे. साळुंखे यांच्याकडे तीन म्हशी आहेत. यातील एक म्हैस नुकतीच व्यायली. गायीच्या वासरासारख्या पांढऱ्या शुभ्र रेडकाला त्या म्हशीने जन्म दिल्याने सारेच आश्‍चर्यात पडले आहेत. गावात जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा हे नवल बघायला शेतकऱ्यांनी मोठीच गर्दी केली, अजूनही हा ओघ सुरूच आहे. 

या बाबत बोलताना सचिन साळुंखे म्हणाले, ‘‘ही म्हैस आमच्या घरातीलच दुसऱ्या एका म्हशीची पैदास आहे. कृत्रिम रेतन न करता तिची नैसर्गिक गर्भधारणा झाली होती. डोक्यावर पांढरे ठिपके असलेले किंवा भुरकट रंगांचे रेडकू आतापर्यंत पाहण्यात होते. मात्र असे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने आम्ही सारेच आश्‍चर्यात पडलो आहोत. डॉक्टरांनीही रेडकाची तपासणी केली असून, त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. या वेगळ्या रंगाच्या रेडकाचे चांगले संगोपन करून पुढे कृषी प्रदर्शन किंवा विविध स्पर्धांतून त्याला सहभागी करायचा विचार आहे.’’
 
प्रतिक्रिया
म्हशीला पांढरे शुभ्र रेडकू होणे, हे दुर्मीळ उदाहरण असते. सदोष गुणसूत्र आणि रंगसूत्रातील बदलांमुळे हे घडलेले असते. नेहमीच्या रेडकासारखेच हे रेडकू असते फक्त रंग वेगळा असतो, एवढंच त्याच वेगळेपण असते. बाकी त्याच्या रचना सारख्याच असतात. मात्र अशा घटनांचे प्रमाण फारच कमी असते. 
-डॉ. नितीन मार्कंडेय, पशुवैद्यक शास्त्रज्ञ

News Item ID: 
820-news_story-1637418993-awsecm-271
Mobile Device Headline: 
पाटीलवाडीत म्हशीला पांढरे शुभ्र रेडकू
Appearance Status Tags: 
Mukhya News
In Patilwadi, buffaloes are whitewashedIn Patilwadi, buffaloes are whitewashed
Mobile Body: 

कऱ्हाड ः काळ्या रंगाचे किंवा डोक्यावर एखादे-दुसरा पांढरा ठिपका असणारे म्हशीचे रेडकू आपल्यापैकी अनेकांच्या पाहण्यात आहे. परंतु वाल्मीक पठारावरील पाटीलवाडी (रुवले, ता. पाटण) येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क गाईच्या वासरासारखे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने परिसरात तो औत्सुक्याचा विषय बनला आहे. हे वेगळ्याच प्रकारचे रेडकू बघायला नागरिक संबंधित शेतकऱ्याच्या घरी गर्दी करत आहेत. दरम्यान, गुणसूत्रातील बदलामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वाल्मीक पठारावरील पाटीलवाडी या छोट्याशा गावातील सचिन लक्ष्मण साळुंखे कुटुंबीयांसह मुंबईत स्थायिक होते. परंतु लॉकडाउनच्या काळात नोकरीत अडचणी निर्माण झाल्याने ते गावीच शेतीत रमले आहेत. शेतीला जोड म्हणून  त्यांनी दुग्ध व्यवसाय निवडला आहे. साळुंखे यांच्याकडे तीन म्हशी आहेत. यातील एक म्हैस नुकतीच व्यायली. गायीच्या वासरासारख्या पांढऱ्या शुभ्र रेडकाला त्या म्हशीने जन्म दिल्याने सारेच आश्‍चर्यात पडले आहेत. गावात जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा हे नवल बघायला शेतकऱ्यांनी मोठीच गर्दी केली, अजूनही हा ओघ सुरूच आहे. 

या बाबत बोलताना सचिन साळुंखे म्हणाले, ‘‘ही म्हैस आमच्या घरातीलच दुसऱ्या एका म्हशीची पैदास आहे. कृत्रिम रेतन न करता तिची नैसर्गिक गर्भधारणा झाली होती. डोक्यावर पांढरे ठिपके असलेले किंवा भुरकट रंगांचे रेडकू आतापर्यंत पाहण्यात होते. मात्र असे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने आम्ही सारेच आश्‍चर्यात पडलो आहोत. डॉक्टरांनीही रेडकाची तपासणी केली असून, त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. या वेगळ्या रंगाच्या रेडकाचे चांगले संगोपन करून पुढे कृषी प्रदर्शन किंवा विविध स्पर्धांतून त्याला सहभागी करायचा विचार आहे.’’
 
प्रतिक्रिया
म्हशीला पांढरे शुभ्र रेडकू होणे, हे दुर्मीळ उदाहरण असते. सदोष गुणसूत्र आणि रंगसूत्रातील बदलांमुळे हे घडलेले असते. नेहमीच्या रेडकासारखेच हे रेडकू असते फक्त रंग वेगळा असतो, एवढंच त्याच वेगळेपण असते. बाकी त्याच्या रचना सारख्याच असतात. मात्र अशा घटनांचे प्रमाण फारच कमी असते. 
-डॉ. नितीन मार्कंडेय, पशुवैद्यक शास्त्रज्ञ

English Headline: 
Agriculture News in Marathi In Patilwadi, buffaloes are whitewashed
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
विषय topics कऱ्हाड karhad पशुवैद्यकीय नोकरी शेती farming व्यवसाय profession गाय cow डॉक्टर doctor प्रदर्शन घटना incidents
Search Functional Tags: 
विषय, Topics, कऱ्हाड, Karhad, पशुवैद्यकीय, नोकरी, शेती, farming, व्यवसाय, Profession, गाय, Cow, डॉक्टर, Doctor, प्रदर्शन, घटना, Incidents
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In Patilwadi, buffaloes are whitewashed
Meta Description: 
In Patilwadi, buffaloes are whitewashed
 वाल्मीक पठारावरील पाटीलवाडी (रुवले, ता. पाटण) येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क गाईच्या वासरासारखे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने परिसरात तो औत्सुक्याचा विषय बनला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X