Take a fresh look at your lifestyle.

पाटीलवाडीत समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा

0

रत्नागिरी ः तालुक्यातील जाकिमि‍ऱ्या गावातील पाटीलवाडी येथे शनिवारी (ता. २०) समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. सुमारे २५ फुटांहून अधिक लांबीचा महाकाय व्हेल पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर लागलेल्या व्हेलचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

कोकण किनारपट्टीवर व्हेलचा वावर वाढल्याचा अंदाज गेले काही महिने अभ्यासकांकडून केला जात आहे. गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात मृतावस्थेतील व्हेल सापडल्याच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यात जाकिमिऱ्या येथील सापडलेल्या व्हेलची भर पडली आहे. पौर्णिमेच्या उधाणाबरोबर हा महाकाय व्हेल मध्यरात्रीच्या सुमारास किनारी भागाला लागला. सुरुवातीला तो पाण्यात दिसून आला. लाटांबरोबर तो वाळूत आला. ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या माशाची लांबी २५ फूट आहे. त्याचा मृत्यू समुद्रातच झाला होता. मृतावस्थेत तो वाहत मिऱ्या किनाऱ्यावर आला. काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्यामुळे तो सडलेल्या अवस्थेत होता. त्याची वैद्यकीय तपासणीही करणे अशक्य होते. त्यामुळे माशाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. किनाऱ्यावर खड्डा खोदून त्याला पुरण्यात आले.

जाकिमिऱ्या पाटीलवाडी येथील समुद्र किनारी मृतावस्थेतील व्हेल दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. तो मासा पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आढळला. प्रचंड वास येत असल्यामुळे किनाऱ्यावरील वाळूतच त्याला पुरण्यात आले.
– प्रियांका लगड, वनाधिकारी.

News Item ID: 
820-news_story-1637500024-awsecm-529
Mobile Device Headline: 
पाटीलवाडीत समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा
Appearance Status Tags: 
Section News
Beach at Patilwadi Dead whale foundBeach at Patilwadi Dead whale found
Mobile Body: 

रत्नागिरी ः तालुक्यातील जाकिमि‍ऱ्या गावातील पाटीलवाडी येथे शनिवारी (ता. २०) समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. सुमारे २५ फुटांहून अधिक लांबीचा महाकाय व्हेल पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर लागलेल्या व्हेलचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

कोकण किनारपट्टीवर व्हेलचा वावर वाढल्याचा अंदाज गेले काही महिने अभ्यासकांकडून केला जात आहे. गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात मृतावस्थेतील व्हेल सापडल्याच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यात जाकिमिऱ्या येथील सापडलेल्या व्हेलची भर पडली आहे. पौर्णिमेच्या उधाणाबरोबर हा महाकाय व्हेल मध्यरात्रीच्या सुमारास किनारी भागाला लागला. सुरुवातीला तो पाण्यात दिसून आला. लाटांबरोबर तो वाळूत आला. ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या माशाची लांबी २५ फूट आहे. त्याचा मृत्यू समुद्रातच झाला होता. मृतावस्थेत तो वाहत मिऱ्या किनाऱ्यावर आला. काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्यामुळे तो सडलेल्या अवस्थेत होता. त्याची वैद्यकीय तपासणीही करणे अशक्य होते. त्यामुळे माशाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. किनाऱ्यावर खड्डा खोदून त्याला पुरण्यात आले.

जाकिमिऱ्या पाटीलवाडी येथील समुद्र किनारी मृतावस्थेतील व्हेल दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. तो मासा पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आढळला. प्रचंड वास येत असल्यामुळे किनाऱ्यावरील वाळूतच त्याला पुरण्यात आले.
– प्रियांका लगड, वनाधिकारी.

English Headline: 
Agriculture news in marathi, Beach at Patilwadi Dead whale found
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
समुद्र कोकण konkan किनारपट्टी वन forest विभाग sections घटना incidentsSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X