पाण्याचे विज्ञान समजून घ्या – डॉ. राजेंद्रसिंह राणा 

रत्नागिरी : पूर्वी गुजरातमध्ये जलपातळी खाली जात होती. आता ती स्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जलपातळी वाढवण्यासाठी टास्क फोर्स बनवून त्याद्वारे आराखडा आखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी रत्नागिरीत केले. 

जिल्हा जल साक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदातर्फे रत्नागिरीतील अल्पबचत सभागृहात आयोजित एक दिवसीय जल कार्यशाळेच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्‍घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. 
या प्रसंगी राजेंद्रसिंह म्हणाले, ‘‘जागतिक हवामान बदलामुळे पावसाचा पॅटर्न बदलत आहे. ते शेतकऱ्यांच्या समजण्या पलिकडे आहे. त्यामुळे शेतीचे चक्र बिघडले असून, शेतीतून उत्पादन कमी मिळत आहे.

हवामान बदल आणि पाण्याचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. हे समजून घेतले नाही तर महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. अशी व्यवस्था आणण्याची गरज आहे की, शेतीला पाण्याशी जोडले पाहिजे. वातावरणातील बदलांचा अभ्यास करण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांवर सोपवली पाहीजे. त्यात हवामान बदल आणि शेतीची सांगड यावर भर देणे गरजेचे आहे.

जेणकरुन शेती उत्पादन कसे वाढेल याचा वेगळा पॅटर्न बनविता येईल. सध्या महाराष्ट्रातील जलपातळी खालावत आहे. हे शेतकऱ्यांना समजावून सांगावे लागेल. पाण्याचे नियोजन ही तत्काळ करण्याची गोष्ट असून, निसर्गाने त्याचे संकेत दिले आहेत. त्याला प्रतिसाद देऊन नियोजन केले तर महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरेल. महाराष्ट्रात पाण्याचे नियोजन होते, पण आज शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. त्यामुळे जलसाक्षरतेची खरी गरज आहे.’’ 

कोकणात पाण्याचे नियोजन झाले पाहिजे 
कोकणात पाणी भरपूर आहे, पण त्याची किंमत नाही. कोकण हे भगवंताचे सर्वांत लाडके आहे. सर्वाधिक पाऊस पडतो, ती ही भूमी आहे. पंचमहाभुते म्हणजेच भगवंत आहे. त्यामुळेच सर्वांत प्रेयस आहे. भरपूर धरणे झाली. पाण्याची दक्षता घेतली जात नाही. कोकणात पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. बदलते हवामान आणि पाऊस या संदर्भात जल उपयोग दक्षतेसंदर्भात डिग्री कोर्स या वर्षीपासून सुरू करावा. त्याची गरज आहे. त्या शिवाय महाराष्ट्र पाणीदार राज्य बनणार नाही. विद्यापीठात पाण्याचा वापर, सुरू करा. दुसरे असे की, राज्यात पाठ्यपुस्तक मंडळाने प्रत्येक इयत्तेसाठी पाण्याचे महत्त्व व महाराष्ट्राला पाणीदार कसे बनवावे या बाबत धडा घ्यावा, असेही राणा म्हणाले. 

कोकणातील जलसंधारणासाठी बळ देणार 
पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब म्हणाले, ‘‘रत्नागिरी जिल्हा सुजलाम, सुफलाम बनवण्यासाठी पाणी हवे. त्यामुळे शाश्वत पाण्याचे व्यवस्थापन करा. शासन त्यात पूर्ण सहभाग घेऊन ताकद देऊ. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजच्या जल परिषदेतून शाश्वत आराखडा बनवावा, त्याला शासन म्हणून सर्व ती शक्ती देऊ. कोकणातील धरणे उभारणी, पाणी साठवणुकीसाठी आणि योजनांसाठी आर्थिक बळ देऊ.’’ मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठात जलयुक्त अभ्यासक्रम करण्यासंदर्भात आताच कुलगुरुंशी चर्चा केल्याचे सांगितले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना सूचना दिल्या आहेत. ते स्वतः अभ्यास करतील.

News Item ID: 
820-news_story-1635686469-awsecm-600
Mobile Device Headline: 
पाण्याचे विज्ञान समजून घ्या – डॉ. राजेंद्रसिंह राणा 
Appearance Status Tags: 
Section News
पाण्याचे विज्ञान समजून घ्या - डॉ. राजेंद्रसिंह राणा  Understand the science of water - Dr. Rajendrasinh Ranaपाण्याचे विज्ञान समजून घ्या - डॉ. राजेंद्रसिंह राणा  Understand the science of water - Dr. Rajendrasinh Rana
Mobile Body: 

रत्नागिरी : पूर्वी गुजरातमध्ये जलपातळी खाली जात होती. आता ती स्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जलपातळी वाढवण्यासाठी टास्क फोर्स बनवून त्याद्वारे आराखडा आखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी रत्नागिरीत केले. 

जिल्हा जल साक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदातर्फे रत्नागिरीतील अल्पबचत सभागृहात आयोजित एक दिवसीय जल कार्यशाळेच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्‍घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. 
या प्रसंगी राजेंद्रसिंह म्हणाले, ‘‘जागतिक हवामान बदलामुळे पावसाचा पॅटर्न बदलत आहे. ते शेतकऱ्यांच्या समजण्या पलिकडे आहे. त्यामुळे शेतीचे चक्र बिघडले असून, शेतीतून उत्पादन कमी मिळत आहे.

हवामान बदल आणि पाण्याचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. हे समजून घेतले नाही तर महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. अशी व्यवस्था आणण्याची गरज आहे की, शेतीला पाण्याशी जोडले पाहिजे. वातावरणातील बदलांचा अभ्यास करण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांवर सोपवली पाहीजे. त्यात हवामान बदल आणि शेतीची सांगड यावर भर देणे गरजेचे आहे.

जेणकरुन शेती उत्पादन कसे वाढेल याचा वेगळा पॅटर्न बनविता येईल. सध्या महाराष्ट्रातील जलपातळी खालावत आहे. हे शेतकऱ्यांना समजावून सांगावे लागेल. पाण्याचे नियोजन ही तत्काळ करण्याची गोष्ट असून, निसर्गाने त्याचे संकेत दिले आहेत. त्याला प्रतिसाद देऊन नियोजन केले तर महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरेल. महाराष्ट्रात पाण्याचे नियोजन होते, पण आज शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. त्यामुळे जलसाक्षरतेची खरी गरज आहे.’’ 

कोकणात पाण्याचे नियोजन झाले पाहिजे 
कोकणात पाणी भरपूर आहे, पण त्याची किंमत नाही. कोकण हे भगवंताचे सर्वांत लाडके आहे. सर्वाधिक पाऊस पडतो, ती ही भूमी आहे. पंचमहाभुते म्हणजेच भगवंत आहे. त्यामुळेच सर्वांत प्रेयस आहे. भरपूर धरणे झाली. पाण्याची दक्षता घेतली जात नाही. कोकणात पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. बदलते हवामान आणि पाऊस या संदर्भात जल उपयोग दक्षतेसंदर्भात डिग्री कोर्स या वर्षीपासून सुरू करावा. त्याची गरज आहे. त्या शिवाय महाराष्ट्र पाणीदार राज्य बनणार नाही. विद्यापीठात पाण्याचा वापर, सुरू करा. दुसरे असे की, राज्यात पाठ्यपुस्तक मंडळाने प्रत्येक इयत्तेसाठी पाण्याचे महत्त्व व महाराष्ट्राला पाणीदार कसे बनवावे या बाबत धडा घ्यावा, असेही राणा म्हणाले. 

कोकणातील जलसंधारणासाठी बळ देणार 
पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब म्हणाले, ‘‘रत्नागिरी जिल्हा सुजलाम, सुफलाम बनवण्यासाठी पाणी हवे. त्यामुळे शाश्वत पाण्याचे व्यवस्थापन करा. शासन त्यात पूर्ण सहभाग घेऊन ताकद देऊ. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजच्या जल परिषदेतून शाश्वत आराखडा बनवावा, त्याला शासन म्हणून सर्व ती शक्ती देऊ. कोकणातील धरणे उभारणी, पाणी साठवणुकीसाठी आणि योजनांसाठी आर्थिक बळ देऊ.’’ मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठात जलयुक्त अभ्यासक्रम करण्यासंदर्भात आताच कुलगुरुंशी चर्चा केल्याचे सांगितले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना सूचना दिल्या आहेत. ते स्वतः अभ्यास करतील.

English Headline: 
Agriculture News in Marathi Understand the science of water – Dr. Rajendrasinh Rana
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
महाराष्ट्र maharashtra राजेंद्रसिंह रत्नागिरी अल्पबचत उदय सामंत uday samant हवामान शेती farming कृषी विद्यापीठ agriculture university निसर्ग भारत कोकण konkan पाणी water ऊस पाऊस जलसंधारण अनिल परब anil parab जयंत पाटील jayant patil मुंबई mumbai मुंबई विद्यापीठ डॉ. सुहास पेडणेकर dr suhas pednekar
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, राजेंद्रसिंह, रत्नागिरी, अल्पबचत, उदय सामंत, Uday Samant, हवामान, शेती, farming, कृषी विद्यापीठ, Agriculture University, निसर्ग, भारत, कोकण, Konkan, पाणी, Water, ऊस, पाऊस, जलसंधारण, अनिल परब, Anil Parab, जयंत पाटील, Jayant Patil, मुंबई, Mumbai, मुंबई विद्यापीठ, डॉ. सुहास पेडणेकर, Dr Suhas Pednekar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Understand the science of water – Dr. Rajendrasinh Rana
Meta Description: 
Understand the science of water – Dr. Rajendrasinh Rana
पूर्वी गुजरातमध्ये जलपातळी खाली जात होती. आता ती स्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जलपातळी वाढवण्यासाठी टास्क फोर्स बनवून त्याद्वारे आराखडा आखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी रत्नागिरीत केले. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X