पावसाने वाढली सोयाबीनची आवक 

नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे शेतकऱ्यांनी एकाचवेळी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून, त्यामध्ये उज्जैन, मंदसौर, आष्टा, सिहोर या बाजार समित्यांमध्ये तर रात्रीपासूनच शेतकरी ट्रॅक्‍टरने माल घेऊन येत असल्याने रात्रीदेखील अनेक बाजार समित्यांमधील उलाढाल सुरू होती. काही बाजार समित्यांमध्ये ट्रॅक्‍टरसाठी जागाच नसल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेरच ताटकळत राहावे लागले. 

बियाण्यातील तेजी आणि उपलब्धतेचा अडसर असतानाही देशांतर्गत सोयाबीन लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सात टक्‍के वाढीचा दावा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाकडून केला जात आहे. तरीही शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत. परिणामी दर पडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 
तेलवर्गीय पिकांना मिळणाऱ्या दराच्या परिणामी हे घडल्याचे कारण त्यामागे नोंदविण्यात आले आहे. २०२० या वर्षीच्या खरिपात देशात १२० लाख हेक्‍टर क्षेत्रावर लागवड आणि उत्पादन १०५ लाख टन होते. 

मध्य प्रदेशला सोयाबीनचे हब म्हणून ओळखले जाते. सुमारे ६० लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लावगड या राज्यात राहते. या वर्षी मात्र बियाणे उपलब्धतेमधील अडचणीच्या परिणामी हे क्षेत्र अवघ्या ५५.५८७ हेक्‍टरपर्यंत मर्यादित राहिले. या क्षेत्रातून ५२.२९२ लाख टन उत्पादनाचा अंदाज सोपाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र परतीच्या पावसाने मध्य प्रदेशातही दाणादाण उडविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी, पीक काढणी आणि मळणीनंतर त्याच्या विक्रीचाच विचार केला जात असल्याने बाजारातील आवक वाढली आहे. बाजार समित्या यामुळे हाउसफुल्ल झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही बाजार समित्यांमध्ये ३० हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवक होत असल्याची माहितीदेखील देण्यात आली.

 बाजारात मिळतोय ३८०० ते ५४०० दर 
मध्य प्रदेशातील काही बाजार समित्यांमध्ये अडत्यांकडून रात्रीच शेतकऱ्यांचा माल खाली करून घेतला जात असला तरी लिलावाची प्रक्रिया सकाळीच होत असल्याने इतर शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागत असल्याची स्थिती आहे. पावसाच्या शक्‍यतेने शेतकरी शेतीमाल विकला जात असल्याने बाजारात ३८०० ते ५४०० रुपयांचा दर मिळत आहे.

प्रतिक्रिया

मध्य प्रदेशात २५३ बाजार समित्या आहेत. सुरुवातीला दर तेजीत होते. त्यानंतरच्या काळात मात्र केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली घट त्यासोबतच १२ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात अशा कारणांमुळे दर घसरून आता पूर्वीप्रमाणेच ३८०० ते ५४०० रुपयांवर आले आहेत. दरात आणखी घसरण होईल किंवा पावसामुळे पीक खराब होईल या भीतीमुळे शेतकऱ्यांकडून माल विक्रीसाठी आणला जात आहे. 
– तरुण वेदमुथा (जैन), व्यापारी, आष्टा बाजार समिती, मध्य प्रदेश

News Item ID: 
820-news_story-1634999234-awsecm-611
Mobile Device Headline: 
पावसाने वाढली सोयाबीनची आवक 
Appearance Status Tags: 
Mukhya News
पावसाने वाढली सोयाबीनची आवक  Rainfall increased soybean arrivalsपावसाने वाढली सोयाबीनची आवक  Rainfall increased soybean arrivals
Mobile Body: 

नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे शेतकऱ्यांनी एकाचवेळी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून, त्यामध्ये उज्जैन, मंदसौर, आष्टा, सिहोर या बाजार समित्यांमध्ये तर रात्रीपासूनच शेतकरी ट्रॅक्‍टरने माल घेऊन येत असल्याने रात्रीदेखील अनेक बाजार समित्यांमधील उलाढाल सुरू होती. काही बाजार समित्यांमध्ये ट्रॅक्‍टरसाठी जागाच नसल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेरच ताटकळत राहावे लागले. 

बियाण्यातील तेजी आणि उपलब्धतेचा अडसर असतानाही देशांतर्गत सोयाबीन लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सात टक्‍के वाढीचा दावा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाकडून केला जात आहे. तरीही शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत. परिणामी दर पडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 
तेलवर्गीय पिकांना मिळणाऱ्या दराच्या परिणामी हे घडल्याचे कारण त्यामागे नोंदविण्यात आले आहे. २०२० या वर्षीच्या खरिपात देशात १२० लाख हेक्‍टर क्षेत्रावर लागवड आणि उत्पादन १०५ लाख टन होते. 

मध्य प्रदेशला सोयाबीनचे हब म्हणून ओळखले जाते. सुमारे ६० लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लावगड या राज्यात राहते. या वर्षी मात्र बियाणे उपलब्धतेमधील अडचणीच्या परिणामी हे क्षेत्र अवघ्या ५५.५८७ हेक्‍टरपर्यंत मर्यादित राहिले. या क्षेत्रातून ५२.२९२ लाख टन उत्पादनाचा अंदाज सोपाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र परतीच्या पावसाने मध्य प्रदेशातही दाणादाण उडविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी, पीक काढणी आणि मळणीनंतर त्याच्या विक्रीचाच विचार केला जात असल्याने बाजारातील आवक वाढली आहे. बाजार समित्या यामुळे हाउसफुल्ल झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही बाजार समित्यांमध्ये ३० हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवक होत असल्याची माहितीदेखील देण्यात आली.

 बाजारात मिळतोय ३८०० ते ५४०० दर 
मध्य प्रदेशातील काही बाजार समित्यांमध्ये अडत्यांकडून रात्रीच शेतकऱ्यांचा माल खाली करून घेतला जात असला तरी लिलावाची प्रक्रिया सकाळीच होत असल्याने इतर शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागत असल्याची स्थिती आहे. पावसाच्या शक्‍यतेने शेतकरी शेतीमाल विकला जात असल्याने बाजारात ३८०० ते ५४०० रुपयांचा दर मिळत आहे.

प्रतिक्रिया

मध्य प्रदेशात २५३ बाजार समित्या आहेत. सुरुवातीला दर तेजीत होते. त्यानंतरच्या काळात मात्र केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली घट त्यासोबतच १२ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात अशा कारणांमुळे दर घसरून आता पूर्वीप्रमाणेच ३८०० ते ५४०० रुपयांवर आले आहेत. दरात आणखी घसरण होईल किंवा पावसामुळे पीक खराब होईल या भीतीमुळे शेतकऱ्यांकडून माल विक्रीसाठी आणला जात आहे. 
– तरुण वेदमुथा (जैन), व्यापारी, आष्टा बाजार समिती, मध्य प्रदेश

English Headline: 
Agriculture News in Marathi Rainfall increased soybean arrivals
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मध्य प्रदेश madhya pradesh सोयाबीन नागपूर nagpur जैन बाजार समिती agriculture market committee सकाळ शेती farming व्यापार
Search Functional Tags: 
मध्य प्रदेश, Madhya Pradesh, सोयाबीन, नागपूर, Nagpur, जैन, बाजार समिती, agriculture Market Committee, सकाळ, शेती, farming, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rainfall increased soybean arrivals
Meta Description: 
Rainfall increased soybean arrivals
मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे शेतकऱ्यांनी एकाचवेळी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X