पीएम किसान योजनेच्या नियमांत बदल, आता द्यावी लागणार 'ही' माहिती! - Farming in Marathi - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

पीएम किसान योजनेच्या नियमांत बदल, आता द्यावी लागणार ‘ही’ माहिती! – Farming in Marathi

0
Rate this post

[ad_1]

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 3 हप्त्यांमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये देत असतं.

तर गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलाय. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र अजून 11 वा हप्ता वर्ग करण्याचं काम सुरु आहे.

मात्र आता पीएम किसान योजनेच्या नोंदणीच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे बदल जाणून घेणं महत्वाचं आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे सविस्तर पाहुयात नेमकं काय बदल करण्यात आलेत…

पीएम किसान योजनेत नेमकं बदल काय? : शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना रेशनकार्डची माहिती द्यावी लागणार आहे. त्यासाठी या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्डची माहित देत रेशनकार्डची पीडीएफ अपलोड करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक : केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यास सांगितले आहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 31 जुलै 2022 पर्यंतची मुदत दिलेली आहे.

व्हॉट्सअॅपवर बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link