पीकविमाधारक शेतकऱ्यांना  २५ टक्के आगाऊ भरपाई मिळणार 

अकोला ः ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून देण्यास पीकविमा कंपनीने सहमती दिली. जिल्हा प्रशासनाने ऑगस्टमध्ये अधिसूचना काढून हा प्रस्ताव पाठविला होता. राज्यात अकोला जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे नुकसान भरपाई मिळत असून, आता राज्यातील अन्य १९ जिल्ह्यांतही हीच प्रक्रिया राबविली जात आहे. 

यंदा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३३ महसूल मंडलांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर जिल्ह्यात कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री बच्चू कडू यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणीही केली होती. शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीत २५ टक्के आगाऊ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री बच्चू कडू व इतरांनी केली होती. 

या बाबत विधिमंडळ तसेच मंत्रिमंडळ पातळीवर बच्चू कडू यांनी सर्वप्रथम मुद्दा मांडून चर्चा झाली होती. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात ११ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली होती. मात्र विमा कंपनी त्यास अमान्य करीत होती. वारंवार त्रुटी दर्शविण्यात येत होत्या. त्याची पूर्तताही होत होती. अखेर पालकमंत्री कडू यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांच्या समवेत बैठक झाली.

या बैठकीत विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले असून, लवकरात लवकर ३३ महसूल मंडळालांतील पीक विमाधारक शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाईची रक्कम मिळेल. दिवाळीच्या आधी ही रक्कम मिळावी, असे निर्देशही विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती माहिती डॉ. खोत यांनी दिली. 

बैठकांवर बैठका 
शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई देण्याबाबत राज्यात प्रथमच अकोल्यातून प्रस्ताव दिल्या गेला होता. या नंतर विमा कंपनीने वारंवार त्रुट्या काढत हा विषय रेंगाळत ठेवला. या अनुषंगाने तीन ते चार वेळा बैठकाही झाल्या. प्रत्येक वेळी त्रुटी दाखवत कंपनीचे अधिकारी असहमती दर्शवित होते. आता हा विषय चिघळण्याची शक्यता पाहता विमा कंपनीच्या वरिष्ठांनी ही बाब मान्य केल्याने मार्ग निघाला. परिणामी अकोल्याप्रमाणेच राज्यातील १९ जिल्ह्यांमध्येही अशा पद्धतीनेच शेतकऱ्यांना आगाऊ नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत.  
 
News Item ID: 
820-news_story-1635338308-awsecm-644
Mobile Device Headline: 
पीकविमाधारक शेतकऱ्यांना  २५ टक्के आगाऊ भरपाई मिळणार 
Appearance Status Tags: 
Section News
पीकविमाधारक शेतकऱ्यांना  २५ टक्के आगाऊ भरपाई मिळणार  To crop insured farmers 25 percent advance compensationपीकविमाधारक शेतकऱ्यांना  २५ टक्के आगाऊ भरपाई मिळणार  To crop insured farmers 25 percent advance compensation
Mobile Body: 

अकोला ः ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून देण्यास पीकविमा कंपनीने सहमती दिली. जिल्हा प्रशासनाने ऑगस्टमध्ये अधिसूचना काढून हा प्रस्ताव पाठविला होता. राज्यात अकोला जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे नुकसान भरपाई मिळत असून, आता राज्यातील अन्य १९ जिल्ह्यांतही हीच प्रक्रिया राबविली जात आहे. 

यंदा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३३ महसूल मंडलांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर जिल्ह्यात कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री बच्चू कडू यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणीही केली होती. शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीत २५ टक्के आगाऊ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री बच्चू कडू व इतरांनी केली होती. 

या बाबत विधिमंडळ तसेच मंत्रिमंडळ पातळीवर बच्चू कडू यांनी सर्वप्रथम मुद्दा मांडून चर्चा झाली होती. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात ११ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली होती. मात्र विमा कंपनी त्यास अमान्य करीत होती. वारंवार त्रुटी दर्शविण्यात येत होत्या. त्याची पूर्तताही होत होती. अखेर पालकमंत्री कडू यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांच्या समवेत बैठक झाली.

या बैठकीत विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले असून, लवकरात लवकर ३३ महसूल मंडळालांतील पीक विमाधारक शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाईची रक्कम मिळेल. दिवाळीच्या आधी ही रक्कम मिळावी, असे निर्देशही विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती माहिती डॉ. खोत यांनी दिली. 

बैठकांवर बैठका 
शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई देण्याबाबत राज्यात प्रथमच अकोल्यातून प्रस्ताव दिल्या गेला होता. या नंतर विमा कंपनीने वारंवार त्रुट्या काढत हा विषय रेंगाळत ठेवला. या अनुषंगाने तीन ते चार वेळा बैठकाही झाल्या. प्रत्येक वेळी त्रुटी दाखवत कंपनीचे अधिकारी असहमती दर्शवित होते. आता हा विषय चिघळण्याची शक्यता पाहता विमा कंपनीच्या वरिष्ठांनी ही बाब मान्य केल्याने मार्ग निघाला. परिणामी अकोल्याप्रमाणेच राज्यातील १९ जिल्ह्यांमध्येही अशा पद्धतीनेच शेतकऱ्यांना आगाऊ नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत.  
 
English Headline: 
Agriculture News in Marathi To crop insured farmers 25 percent advance compensation
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
आग विमा कंपनी कंपनी company प्रशासन administrations अकोला akola अतिवृष्टी सोयाबीन मूग उडीद तूर कापूस दादा भुसे dada bhuse बच्चू कडू हवामान मंत्रिमंडळ जिल्हाधिकारी कार्यालय दिवाळी विषय topics
Search Functional Tags: 
आग, विमा कंपनी, कंपनी, Company, प्रशासन, Administrations, अकोला, Akola, अतिवृष्टी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, दादा भुसे, Dada Bhuse, बच्चू कडू, हवामान, मंत्रिमंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, दिवाळी, विषय, Topics
Twitter Publish: Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X