पीकविम्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करा 

यवतमाळ : या वर्षी जोरदार पाऊस बरसला. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्हा अतिवृष्टीग्रस्त घोषित करून पीकविम्यासाठी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

प्रशासनाचे काणतेही अधिकारी, कर्मचारी तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीची पाहणी करण्यास आले नाहीत. विमा कंपन्यांच्या संपर्क क्रमांकावर कोणीही प्रतिसाद देत नाही, अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेत देवानंद पवार यांनी थेट शेताच्या बांधावर जात जिल्हाधिकाऱ्यांशी मोबाइलवरून संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी शिवारातील वास्तव परिस्थितीची त्यांना माहिती दिली. शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रशासनाने कोणतीही हयगय न करता तातडीने पंचनामे करावे, अशी सूचना पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

कारेगाव (यावली) येथील शेतकरी बाबूसिंग नरसिंग चव्हाण यांच्या पाच एकरांतील कापूस व तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासोबतच शंकर जाधव, कोळंबी येथील इंदल राठोड, गौरव जाधव, शंकर पवार, नवीन चव्हाण, कारेगाव परिसरातील शेतकरी बंडू जाधव, प्रेमदास पवार, दिलीप बिलोने, छगन गाडेकर, चिंतामन पायघन, विलास पवार, कुंडलीक जाधव, सीताराम चव्हाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना देखील संततधार पावसाचा फटका बसला. पंचनामे योग्य वेळी न केल्यास नुकसानाचे योग्य आकलन करता येणार नाही. शेतकऱ्यांना शक्‍य तितक्‍या लवकर मदत झाली पाहिजे. यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी देवानंद पवार यांनी केली.

ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पीकविम्यासाठी ऑनलाइन तक्रारी करू शकत नाहीत. त्यामुळे ऑफलाइन तकारी नोंदविण्यासाठी सोय उपलब्ध केल्या जावी यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ऑफलाइन तक्रारी स्वीकारण्यास मान्यता दिली. परिणामी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ऑफलाइन तक्रारी करता येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.  

News Item ID: 
820-news_story-1635684845-awsecm-571
Mobile Device Headline: 
पीकविम्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करा 
Appearance Status Tags: 
Section News
पीकविम्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करा  Meet the technical requirements for crop insuranceपीकविम्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करा  Meet the technical requirements for crop insurance
Mobile Body: 

यवतमाळ : या वर्षी जोरदार पाऊस बरसला. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्हा अतिवृष्टीग्रस्त घोषित करून पीकविम्यासाठी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

प्रशासनाचे काणतेही अधिकारी, कर्मचारी तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीची पाहणी करण्यास आले नाहीत. विमा कंपन्यांच्या संपर्क क्रमांकावर कोणीही प्रतिसाद देत नाही, अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेत देवानंद पवार यांनी थेट शेताच्या बांधावर जात जिल्हाधिकाऱ्यांशी मोबाइलवरून संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी शिवारातील वास्तव परिस्थितीची त्यांना माहिती दिली. शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रशासनाने कोणतीही हयगय न करता तातडीने पंचनामे करावे, अशी सूचना पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

कारेगाव (यावली) येथील शेतकरी बाबूसिंग नरसिंग चव्हाण यांच्या पाच एकरांतील कापूस व तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासोबतच शंकर जाधव, कोळंबी येथील इंदल राठोड, गौरव जाधव, शंकर पवार, नवीन चव्हाण, कारेगाव परिसरातील शेतकरी बंडू जाधव, प्रेमदास पवार, दिलीप बिलोने, छगन गाडेकर, चिंतामन पायघन, विलास पवार, कुंडलीक जाधव, सीताराम चव्हाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना देखील संततधार पावसाचा फटका बसला. पंचनामे योग्य वेळी न केल्यास नुकसानाचे योग्य आकलन करता येणार नाही. शेतकऱ्यांना शक्‍य तितक्‍या लवकर मदत झाली पाहिजे. यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी देवानंद पवार यांनी केली.

ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पीकविम्यासाठी ऑनलाइन तक्रारी करू शकत नाहीत. त्यामुळे ऑफलाइन तकारी नोंदविण्यासाठी सोय उपलब्ध केल्या जावी यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ऑफलाइन तक्रारी स्वीकारण्यास मान्यता दिली. परिणामी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ऑफलाइन तक्रारी करता येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.  

English Headline: 
Agriculture News in Marathi Meet the technical requirements for crop insurance
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
ऊस पाऊस अतिवृष्टी यवतमाळ yavatmal प्रशासन administrations विमा कंपनी कंपनी company कापूस तूर
Search Functional Tags: 
ऊस, पाऊस, अतिवृष्टी, यवतमाळ, Yavatmal, प्रशासन, Administrations, विमा कंपनी, कंपनी, Company, कापूस, तूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Meet the technical requirements for crop insurance
Meta Description: 
Meet the technical requirements for crop insurance
या वर्षी जोरदार पाऊस बरसला. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्हा अतिवृष्टीग्रस्त घोषित करून पीकविम्यासाठी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X