Take a fresh look at your lifestyle.

पीकविम्यासाठी संघर्ष दिंडी सुरू 

0

परळी, जि. बीड : शेतकऱ्यांना खरीप पीकविमा तत्काळ मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संघर्ष दिंडीला शुक्रवारी (ता. २९) सिरसाळा येथून सुरुवात झाली. या वेळी शेतकऱ्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. हातात लाल झेंडा घेऊन शेतकरी बीडच्या दिशेने निघाले आहेत. 

खरीप २०२०चा पीकविमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी अखिल भारतीय किसान सभेने जुलै २०२१ ते आजतागायत परळी, बीड, पुणे व मुंबई या ठिकाणी विविध आंदोलने केली आहेत. शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी विमा मिळेल, असे अश्वासन दिले. सोबतच विमा कंपनीला निर्देश देऊन देखील, २०२१ संपत आले तरी अद्याप २०२०ची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे किसान सभेच्या सिरसाळा ते बीड या चार दिवसांच्या पीकविमा संघर्ष दिंडीचा प्रारंभ शुक्रवारी सिरसाळा येथून झाला.

शेतकऱ्यांना २०२०चा पीकविमा नाही, २०२१च्या विम्याच्या पंचनाम्याचे गोंधळ, अतिवृष्टीमुळे जाहीर झालेली तुटपुंजी मदत आणि त्यातच बीड जिल्ह्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार व विमा कंपनी यांच्यातील दावे-प्रतिदाव्यात मात्र शेतकरी भरडला जात आहे. यावर धोरणात्मक निर्णय होत नसल्याने प्रचंड रोष आहे. या वर्षी सरकार व विमा कंपनीने आमची दिवाळी हिरावून घेतलीय. आता आम्हाला या वर्षीची दिवाळी सरकार दरबारी साजरी करू द्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. या मागणीला अनुसरूनच किसान सभेने जिल्हाधिकारी, राज्याचे कृषी आयुक्त, बीड जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कृषिमंत्री, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांची भेट घेउन किसान सभेने मागील चार महिन्यांपासून पीकविमा मिळावा यासाठी पाठपुरावा केलेला आहे. 

…असा असेल दिंडीचा प्रवास 
सिरसाळा येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शेतकऱ्यांची पीकविमा संघर्ष दिंडी सुरू झाली आहे. पहिला मुक्काम शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी तेलगाव येथे होईल. माजलगाव व धारूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन संघर्ष दिंडी दुसरा मुक्काम वडवणी जवळील मैदा-पोखरी येथे करेल.

वडवणी तालुक्यातील आणि बीड तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन ३१ तारखेला रात्री बीडजवळ येऊन थांबेल, १ नोव्हेंबरला सकाळी तेथून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. सिरसाळा येथुन सुरू होणाऱ्या पायी संघर्ष दिंडीत किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब, कॉ. रूस्तुम माने यांच्यासह शेकडो शेतकरी लाल झेंडा हातात घेउन मार्गक्रमण करीत आहेत. 

News Item ID: 
820-news_story-1635514895-awsecm-854
Mobile Device Headline: 
पीकविम्यासाठी संघर्ष दिंडी सुरू 
Appearance Status Tags: 
Section News
पीकविम्यासाठी संघर्ष दिंडी सुरू  The struggle for crop insurance continuesपीकविम्यासाठी संघर्ष दिंडी सुरू  The struggle for crop insurance continues
Mobile Body: 

परळी, जि. बीड : शेतकऱ्यांना खरीप पीकविमा तत्काळ मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संघर्ष दिंडीला शुक्रवारी (ता. २९) सिरसाळा येथून सुरुवात झाली. या वेळी शेतकऱ्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. हातात लाल झेंडा घेऊन शेतकरी बीडच्या दिशेने निघाले आहेत. 

खरीप २०२०चा पीकविमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी अखिल भारतीय किसान सभेने जुलै २०२१ ते आजतागायत परळी, बीड, पुणे व मुंबई या ठिकाणी विविध आंदोलने केली आहेत. शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी विमा मिळेल, असे अश्वासन दिले. सोबतच विमा कंपनीला निर्देश देऊन देखील, २०२१ संपत आले तरी अद्याप २०२०ची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे किसान सभेच्या सिरसाळा ते बीड या चार दिवसांच्या पीकविमा संघर्ष दिंडीचा प्रारंभ शुक्रवारी सिरसाळा येथून झाला.

शेतकऱ्यांना २०२०चा पीकविमा नाही, २०२१च्या विम्याच्या पंचनाम्याचे गोंधळ, अतिवृष्टीमुळे जाहीर झालेली तुटपुंजी मदत आणि त्यातच बीड जिल्ह्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार व विमा कंपनी यांच्यातील दावे-प्रतिदाव्यात मात्र शेतकरी भरडला जात आहे. यावर धोरणात्मक निर्णय होत नसल्याने प्रचंड रोष आहे. या वर्षी सरकार व विमा कंपनीने आमची दिवाळी हिरावून घेतलीय. आता आम्हाला या वर्षीची दिवाळी सरकार दरबारी साजरी करू द्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. या मागणीला अनुसरूनच किसान सभेने जिल्हाधिकारी, राज्याचे कृषी आयुक्त, बीड जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कृषिमंत्री, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांची भेट घेउन किसान सभेने मागील चार महिन्यांपासून पीकविमा मिळावा यासाठी पाठपुरावा केलेला आहे. 

…असा असेल दिंडीचा प्रवास 
सिरसाळा येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शेतकऱ्यांची पीकविमा संघर्ष दिंडी सुरू झाली आहे. पहिला मुक्काम शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी तेलगाव येथे होईल. माजलगाव व धारूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन संघर्ष दिंडी दुसरा मुक्काम वडवणी जवळील मैदा-पोखरी येथे करेल.

वडवणी तालुक्यातील आणि बीड तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन ३१ तारखेला रात्री बीडजवळ येऊन थांबेल, १ नोव्हेंबरला सकाळी तेथून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. सिरसाळा येथुन सुरू होणाऱ्या पायी संघर्ष दिंडीत किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब, कॉ. रूस्तुम माने यांच्यासह शेकडो शेतकरी लाल झेंडा हातात घेउन मार्गक्रमण करीत आहेत. 

English Headline: 
Agriculture News in Marathi The struggle for crop insurance continues
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
खरीप भारत बीड beed पुणे मुंबई mumbai आंदोलन agitation विमा कंपनी कंपनी company अतिवृष्टी सरकार government कृषी आयुक्त agriculture commissioner सकाळ भारतरत्न bharat ratna बाबा baba जिल्हाधिकारी कार्यालय
Search Functional Tags: 
खरीप, भारत, बीड, Beed, पुणे, मुंबई, Mumbai, आंदोलन, agitation, विमा कंपनी, कंपनी, Company, अतिवृष्टी, सरकार, Government, कृषी आयुक्त, Agriculture Commissioner, सकाळ, भारतरत्न, Bharat Ratna, बाबा, Baba, जिल्हाधिकारी कार्यालय
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The struggle for crop insurance continues
Meta Description: 
The struggle for crop insurance continues
शेतकऱ्यांना खरीप पीकविमा तत्काळ मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संघर्ष दिंडीला शुक्रवारी (ता. २९) सिरसाळा येथून सुरुवात झाली. या वेळी शेतकऱ्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. हातात लाल झेंडा घेऊन शेतकरी बीडच्या दिशेने निघाले आहेत. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X