पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू करण्याचे आदेश 

पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 
कोरोना आढावा बैठकीत शुक्रवारी (ता. २२) पवार यांनी या सूचना दिल्या. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने १ कोटी १७ लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लसीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे.’’ 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘आठवडे बाजारासाठी परिसरातील गावातून नागरिक येतात. त्यापैकी काहींना माहिती नसल्याने त्यांनी लस न घेतली असल्याची शक्यता असते. त्यांच्या लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अशा शिबिरांच्या आयोजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी. कोविड उपचारासाठीच्या देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतर कमी केलेल्या देयकाबाबत रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करावी.’’ 

लसीकरणासाठी विशेष मोहीम 
बैठकीत राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे ७ ते ११ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू करण्यात आली आहे. मागील ३ आठवड्यांत पुणे महानगरपालिका क्षेत्रात आणि १५ ऑक्टोबर रोजी पुणे ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ठिकाणी वीकेएण्ड कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून, ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरण नियोजनास सुरूवात करण्यात आली आहे. ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत ८ ते २० ऑक्टोबर दरम्यान ४ लाख २७ हजार लसीकरण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

News Item ID: 
820-news_story-1634912400-awsecm-979
Mobile Device Headline: 
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू करण्याचे आदेश 
Appearance Status Tags: 
Section News
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू करण्याचे आदेश  Weekly market in Pune district Order to startपुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू करण्याचे आदेश  Weekly market in Pune district Order to start
Mobile Body: 

पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 
कोरोना आढावा बैठकीत शुक्रवारी (ता. २२) पवार यांनी या सूचना दिल्या. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने १ कोटी १७ लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लसीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे.’’ 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘आठवडे बाजारासाठी परिसरातील गावातून नागरिक येतात. त्यापैकी काहींना माहिती नसल्याने त्यांनी लस न घेतली असल्याची शक्यता असते. त्यांच्या लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अशा शिबिरांच्या आयोजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी. कोविड उपचारासाठीच्या देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतर कमी केलेल्या देयकाबाबत रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करावी.’’ 

लसीकरणासाठी विशेष मोहीम 
बैठकीत राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे ७ ते ११ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू करण्यात आली आहे. मागील ३ आठवड्यांत पुणे महानगरपालिका क्षेत्रात आणि १५ ऑक्टोबर रोजी पुणे ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ठिकाणी वीकेएण्ड कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून, ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरण नियोजनास सुरूवात करण्यात आली आहे. ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत ८ ते २० ऑक्टोबर दरम्यान ४ लाख २७ हजार लसीकरण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

English Headline: 
Agriculture News in Marathi Weekly market in Pune district Order to start
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अजित पवार ajit pawar दिवाळी पुणे खासदार श्रीरंग बारणे shrirang barne अमोल कोल्हे मुरलीधर मोहोळ जिल्हा परिषद विभाग sections लसीकरण vaccination भारत
Search Functional Tags: 
अजित पवार, Ajit Pawar, दिवाळी, पुणे, खासदार, श्रीरंग बारणे, Shrirang Barne, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद, विभाग, Sections, लसीकरण, Vaccination, भारत
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Weekly market in Pune district Order to start
Meta Description: 
Weekly market in Pune district
Order to start
कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X