पुणे जिल्ह्यात अठरा हजार हेक्टरवर नुकसानीचा अंदाज

पुणे ः गेल्या तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. रविवारी (ता. १८) सकाळपासून ऊन पडले होते. मात्र, बुधवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात १८ हजार ७४६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती नजरअंदाजाने समोर आली आहे. यामध्ये आणखी वाढ होत असून लवकरच नुकसानीची खरी माहिती पुढे येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात परतीचा मुसळधार पाऊस झाला. पूर्वेकडील इंदापूर, बारामती, दौंड, हवेली, पुरंदर, शिरूर, भोर, मावळ, मुळशी तालुक्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यातच नद्यांना पूरस्थिती आल्याने नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते. काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर अनेक ठिकाणी जनावरे मृत्यू पावली. तर जवळपास १०० हून अधिक झोपड्यांचे नुकसान झाल्याने नागरिकांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या कमी झालेल्या सरीमुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी शेती कामांमध्ये गुंतलेले असल्याचे दिसून आले.जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी बुधवारी झालेल्या पावसाने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.

जिल्ह्यात सोयाबीन, भात, कांदा, बाजरी, भुईमूग, ज्वारी, फुलपीके, चारा पिके, मका, तृणधान्ये, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच पॉलिहाऊस मधील शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन असे पूरक व्यवसायाचेही नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात रविवारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आलेली नव्हती. या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. मात्र, अजूनही पंचनामे करण्यात सुरुवात झाली नाही.

News Item ID: 
820-news_story-1603030736-awsecm-576
Mobile Device Headline: 
पुणे जिल्ह्यात अठरा हजार हेक्टरवर नुकसानीचा अंदाज
Appearance Status Tags: 
Tajya News
Estimated loss on 18,000 hectares in Pune districtEstimated loss on 18,000 hectares in Pune district
Mobile Body: 

पुणे ः गेल्या तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. रविवारी (ता. १८) सकाळपासून ऊन पडले होते. मात्र, बुधवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात १८ हजार ७४६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती नजरअंदाजाने समोर आली आहे. यामध्ये आणखी वाढ होत असून लवकरच नुकसानीची खरी माहिती पुढे येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात परतीचा मुसळधार पाऊस झाला. पूर्वेकडील इंदापूर, बारामती, दौंड, हवेली, पुरंदर, शिरूर, भोर, मावळ, मुळशी तालुक्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यातच नद्यांना पूरस्थिती आल्याने नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते. काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर अनेक ठिकाणी जनावरे मृत्यू पावली. तर जवळपास १०० हून अधिक झोपड्यांचे नुकसान झाल्याने नागरिकांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या कमी झालेल्या सरीमुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी शेती कामांमध्ये गुंतलेले असल्याचे दिसून आले.जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी बुधवारी झालेल्या पावसाने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.

जिल्ह्यात सोयाबीन, भात, कांदा, बाजरी, भुईमूग, ज्वारी, फुलपीके, चारा पिके, मका, तृणधान्ये, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच पॉलिहाऊस मधील शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन असे पूरक व्यवसायाचेही नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात रविवारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आलेली नव्हती. या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. मात्र, अजूनही पंचनामे करण्यात सुरुवात झाली नाही.

English Headline: 
Agriculture news in Marathi Estimated loss on 18,000 hectares in Pune district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे ऊस पाऊस पूर floods इंदापूर शिरूर मावळ maval शेती farming सोयाबीन भुईमूग groundnut चारा पिके fodder crop डाळ डाळिंब शेळीपालन goat farming व्यवसाय profession अजित पवार ajit pawarSource link

Leave a Comment

X