पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावले

पुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर थंडीस सुरुवात झाली होती. मात्र बुधवारपासून पुन्हा ढगाळ हवामान तयार झाले आहे. यामुळे फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. पाऊस आल्यास पुन्हा नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.  

परतीच्या पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे शेतकरी सावरत होता. तोच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यांच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. एक ते दोन दिवस हवामान ढगाळ राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. आतापर्यंत पावसामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी बागांचे नुकसान झाले. त्यातच आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे या बागा संकटात सापडण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्र आहे. नारायणगाव, बारामती, इंदापूर, दौड या तालुक्यांत द्राक्षाचे मोठे उत्पादन घेतले जाते. ढगाळ वातावरणामुळे अतिरिक्त पावडर फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पुरंदर, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, दौंड, बारामती या भागातही डाळिंब उत्पादक शेतकरी धास्तावले 
आहेत. 

गेल्या एक महिन्यापूर्वी होणारा सततचा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने फवारणीचा खर्च वाढला. अनेक फवारण्या करूनही उपयोग होत नसल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. घड कुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. आता पुन्हा ढगाळ हवामानामुळे नुकसानाची भीती आहे.
– जितेंद्र बिडवई, अध्यक्ष, द्राक्ष उत्पादक संघ.

News Item ID: 
820-news_story-1636292066-awsecm-280
Mobile Device Headline: 
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावले
Appearance Status Tags: 
Tajya News
Farmers in Pune district panicked due to cloudsFarmers in Pune district panicked due to clouds
Mobile Body: 

पुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर थंडीस सुरुवात झाली होती. मात्र बुधवारपासून पुन्हा ढगाळ हवामान तयार झाले आहे. यामुळे फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. पाऊस आल्यास पुन्हा नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.  

परतीच्या पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे शेतकरी सावरत होता. तोच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यांच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. एक ते दोन दिवस हवामान ढगाळ राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. आतापर्यंत पावसामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी बागांचे नुकसान झाले. त्यातच आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे या बागा संकटात सापडण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्र आहे. नारायणगाव, बारामती, इंदापूर, दौड या तालुक्यांत द्राक्षाचे मोठे उत्पादन घेतले जाते. ढगाळ वातावरणामुळे अतिरिक्त पावडर फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पुरंदर, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, दौंड, बारामती या भागातही डाळिंब उत्पादक शेतकरी धास्तावले 
आहेत. 

गेल्या एक महिन्यापूर्वी होणारा सततचा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने फवारणीचा खर्च वाढला. अनेक फवारण्या करूनही उपयोग होत नसल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. घड कुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. आता पुन्हा ढगाळ हवामानामुळे नुकसानाची भीती आहे.
– जितेंद्र बिडवई, अध्यक्ष, द्राक्ष उत्पादक संघ.

English Headline: 
Agriculture news in marathi Farmers in Pune district panicked due to clouds
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे फळबाग horticulture शेती farming थंडी हवामान ऊस पाऊस द्राक्ष डाळ डाळिंब सीताफळ custard apple अंजीर इंदापूर पूर floods शिरूर खेड बारामती जितेंद्र
Search Functional Tags: 
पुणे, फळबाग, Horticulture, शेती, farming, थंडी, हवामान, ऊस, पाऊस, द्राक्ष, डाळ, डाळिंब, सीताफळ, Custard Apple, अंजीर, इंदापूर, पूर, Floods, शिरूर, खेड, बारामती, जितेंद्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmers in Pune district panicked due to clouds
Meta Description: 
Farmers in Pune district panicked due to clouds
पुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर थंडीस सुरुवात झाली होती. मात्र बुधवारपासून पुन्हा ढगाळ हवामान तयार झाले आहे. यामुळे फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. पाऊस आल्यास पुन्हा नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.  Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X