पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट

पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी झालेल्या पावसामुळे रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने जवळपास दोन लाख ५६ हजार ६८० हेक्टरवर पेरणी होण्यासाठी नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे जिल्हयात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. तरीही लवकरच शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांच्या पेरण्यांना सुरवात करतील. यंदा परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढण्या रखडल्या होत्या. 

जिल्ह्यातील पूर्व भागातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर या भागात कांदा, कापूस, बाजरी, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर उत्तर भागातील खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, बाजरी अशा पिकांना बऱ्यापैकी फटका बसला आहे. तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यात भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

उशिराने झालेल्या पावसामुळे गहू व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल. मात्र, परतीच्या पावसामुळे अजूनही काही भागात शेतात पाणी असल्याने जमिनीची ओल कमी झालेली नाही. ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, अशा भागात रब्बीच्या कामांना सुरवात झाली असून वेग आला असल्याची स्थिती आहे. गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण आहे. चालू महिन्यात या पेरण्यांना सुरवात होऊन डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या आटोपतील, अशी शक्यता आहे.

News Item ID: 
820-news_story-1634821927-awsecm-893
Mobile Device Headline: 
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट
Appearance Status Tags: 
Section News
Rabi aims to sow 2.5 lakh hectares in Pune districtRabi aims to sow 2.5 lakh hectares in Pune district
Mobile Body: 

पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी झालेल्या पावसामुळे रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने जवळपास दोन लाख ५६ हजार ६८० हेक्टरवर पेरणी होण्यासाठी नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे जिल्हयात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. तरीही लवकरच शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांच्या पेरण्यांना सुरवात करतील. यंदा परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढण्या रखडल्या होत्या. 

जिल्ह्यातील पूर्व भागातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर या भागात कांदा, कापूस, बाजरी, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर उत्तर भागातील खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, बाजरी अशा पिकांना बऱ्यापैकी फटका बसला आहे. तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यात भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

उशिराने झालेल्या पावसामुळे गहू व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल. मात्र, परतीच्या पावसामुळे अजूनही काही भागात शेतात पाणी असल्याने जमिनीची ओल कमी झालेली नाही. ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, अशा भागात रब्बीच्या कामांना सुरवात झाली असून वेग आला असल्याची स्थिती आहे. गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण आहे. चालू महिन्यात या पेरण्यांना सुरवात होऊन डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या आटोपतील, अशी शक्यता आहे.

English Headline: 
Agriculture news in marathi, Rabi aims to sow 2.5 lakh hectares in Pune district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे रब्बी हंगाम कृषी विभाग agriculture department शेती farming ज्वारी jowar गहू wheat पूर floods इंदापूर पुरंदर कापूस खेड शिरूर आंबेगाव सोयाबीन मावळ maval कर्ज
Search Functional Tags: 
पुणे, रब्बी हंगाम, कृषी विभाग, Agriculture Department, शेती, farming, ज्वारी, Jowar, गहू, wheat, पूर, Floods, इंदापूर, पुरंदर, कापूस, खेड, शिरूर, आंबेगाव, सोयाबीन, मावळ, Maval, कर्ज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Decline in import of green chillies in Nashik
Meta Description: 
Rabi aims to sow 2.5 lakh hectares in Pune district
पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी झालेल्या पावसामुळे रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X