पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल बियाणांची मागणी 

पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३३ हजार ५०० क्विटंल बियाणांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाणांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

यंदा पुरेसा पाऊस झाल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ३५ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात कृषी विभागाने २ लाख ५६ हजार ७७० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. सुमारे १ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ३४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी बियाणाची मागणी मोठी आहे. शेतकऱ्यांना तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे. 

गेल्या तीन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी २४ हजार ५८८ क्विटंल बियाणांची विक्री झाली होती. त्याच धर्तीवर चालू वर्षीही कृषी विभागाने बियाणांचे नियोजन केले आहे. यंदा महाबीजमार्फत सुमारे १० हजार क्विटल बियाणांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी कंपन्याकडून २३ हजार ५०० क्विंटल, उर्वरित बियाणांचा पुरवठा राष्ट्रीय बीज निगमकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामात बियाणांची अडचण भासणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

रब्बी हंगामासाठी बियाणांची केलेली मागणी (क्विंटलमध्ये) 
पीक — बियाणे (क्विंटलमध्ये) 
ज्वारी — ३६८७ 
गहू — २०,२५८ 
हरभरा — ५६६५ 
सुर्यफूल — ८ 
करडई — २ 
मका — १४६३ 
इतर तृणधान्य — १२४ 
इतर कडधान्य — ४९१ 
तीळ — १ 
इतर तेलबिया — ९४१ 
भाजीपाला — ८६२ 
एकूण — ३३,५०० 

News Item ID: 
820-news_story-1635083924-awsecm-629
Mobile Device Headline: 
पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल बियाणांची मागणी 
Appearance Status Tags: 
Section News
रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल बियाणांची मागणी  Demand for 33,500 quintals of seeds for rabbiरब्बीसाठी ३३,५०० क्विंटल बियाणांची मागणी  Demand for 33,500 quintals of seeds for rabbi
Mobile Body: 

पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३३ हजार ५०० क्विटंल बियाणांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाणांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

यंदा पुरेसा पाऊस झाल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ३५ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात कृषी विभागाने २ लाख ५६ हजार ७७० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. सुमारे १ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ३४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी बियाणाची मागणी मोठी आहे. शेतकऱ्यांना तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे. 

गेल्या तीन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी २४ हजार ५८८ क्विटंल बियाणांची विक्री झाली होती. त्याच धर्तीवर चालू वर्षीही कृषी विभागाने बियाणांचे नियोजन केले आहे. यंदा महाबीजमार्फत सुमारे १० हजार क्विटल बियाणांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी कंपन्याकडून २३ हजार ५०० क्विंटल, उर्वरित बियाणांचा पुरवठा राष्ट्रीय बीज निगमकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामात बियाणांची अडचण भासणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

रब्बी हंगामासाठी बियाणांची केलेली मागणी (क्विंटलमध्ये) 
पीक — बियाणे (क्विंटलमध्ये) 
ज्वारी — ३६८७ 
गहू — २०,२५८ 
हरभरा — ५६६५ 
सुर्यफूल — ८ 
करडई — २ 
मका — १४६३ 
इतर तृणधान्य — १२४ 
इतर कडधान्य — ४९१ 
तीळ — १ 
इतर तेलबिया — ९४१ 
भाजीपाला — ८६२ 
एकूण — ३३,५०० 

English Headline: 
Agriculture News in Marathi Demand for 33,500 quintals of seeds for rabbi
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे रब्बी हंगाम विभाग sections कृषी आयुक्त agriculture commissioner कृषी विभाग agriculture department ऊस पाऊस ओला मात mate ज्वारी jowar वर्षा varsha गहू wheat सुर्यफूल sunflower तृणधान्य cereals कडधान्य
Search Functional Tags: 
पुणे, रब्बी हंगाम, विभाग, Sections, कृषी आयुक्त, Agriculture Commissioner, कृषी विभाग, Agriculture Department, ऊस, पाऊस, ओला, मात, mate, ज्वारी, Jowar, वर्षा, Varsha, गहू, wheat, सुर्यफूल, Sunflower, तृणधान्य, cereals, कडधान्य
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Demand for 33,500 quintals of seeds for rabbi
Meta Description: 
Demand for 33,500 quintals of seeds for rabbi
पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३३ हजार ५०० क्विटंल बियाणांची मागणी केली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X